वनस्पती तेलातील घटक वाढवितात डोळ्यांच्या नसांची कार्यक्षमता
वार्ध्यक्यतील दृष्टीदोष रोखण्यासाठी उपयुक्त संशोधन
वाढत्या वयामध्ये विशेषतः वृद्धत्वामध्ये डोळ्यांतील नसा कमजोर होऊन दृष्टी अधू होत जाते. या नसा ( रेटिनल पिगमेंट इपिथेलियम) पेशी कमजोर होण्यापासून वाचविण्यासाठी शेरब्रुक विद्यापीठामध्ये संशोधन करण्यात आले असून, वनस्पती तेलात पेशींच्या प्रतलामध्ये जैवरासायनिक आणि भौतिक बदल घडविण्याची क्षमता दिसून आली आहे. या बदलामुळे रेटिनोपॅथी तयार होण्याची प्रक्रिया सावकाश होते किंवा रोखली जात असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन जर्नल ऑफ फिजिओलॉजी आणि फार्माकोलॉजी या कॅनडीयन संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
विकसनशील देशामध्ये वृद्धत्वामध्ये अंधत्वाचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या वयामध्ये दृष्टीदोषांचे प्रमाणही वाढत असून, त्यामध्ये डोळ्यांची नसांची लवचिकता कमी होणे, हे प्रमुख कारण दिसून आले आहे. या समस्येवर शेरब्रुक येथील गेरियाट्रिक्स संस्थेमधील आरोग्य आणि सामाजिक सेवा केंद्रामध्ये संशोधन करण्यात येत आहे. वनस्पती तेलामध्ये डोळ्यातील नसांची लवचिकता वाढविण्याची क्षमता दिसून आली आहे. या संशोधनाबाबत माहिती देताना संशोधक अब्दुल खलील यांनी सांगितले, की प्रतलाच्या लवचिकता कमी झाल्याने त्याचा परिणाम प्रतलासोबतच अन्य जैव मुलद्रव्यावर होतो. त्यामुळे प्रतलाची लवचिकता वाढविल्यास प्रकाशाचे परावर्तन डोळ्यातील बाहुल्यातून योग्य प्रकारे होऊ शकते. त्यासाठी रेटीना पेशींमध्ये समाविष्ट होऊ शकेल, अशा प्रकारच्या वनस्पती तेलातील मेदाम्लाचा शोध घेण्यात आला आहे. या मेदाम्लामुळे प्रतलाच्या लवचिकता वाढण्यास मदत होते.
असेही होतील या संशोधनाचे फायदे
- संशोधकांनी केलेल्या अभ्यासात ओमेगा 3 मेदाम्लांनी युक्त आहार, तसेच बदाम तेलाचा आहारातील वापराने रेटिनोपॅथीचा धोका कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
- तसेच डोळ्यामध्ये वापरावयाच्या औषधामध्ये उदासीन प्रकारच्या विशिष्ट तेलांचा वापर केला जातो. त्याऐवजी डोळ्यांसाठी उपयुक्त अशा वनस्पती तेलातील घटकांचा वापर करणे शक्य होईल. त्याचा लाभ डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी होऊ शकेल.
जर्नल संदर्भ ः
Toihiri Said, Jennifer Tremblay-Mercier, Hicham Berrougui, Patrice Rat, Abdelouahed Khalil. Effects of vegetable oils on biochemical and biophysical properties of membrane retinal pigment epithelium cells. Canadian Journal of Physiology and Pharmacology, 2013; : 1 DOI: 10.1139/cjpp-2013-0036

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा