साध्या कॅमेऱ्यानेही मिळतील त्रिमितीय प्रतिमा
सध्या कॅमेरा किंवा सुक्ष्म दर्शकाच्या साह्याने द्विमितीय प्रतिमा घेता येतात. त्रिमितीय प्रतिमा घेण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक भिंग असलेल्या विशिष्ट कॅमेराची गरज पडते. मात्र हॉर्वर्ड अभियांत्रिकी व उपयोजित शास्त्र विद्यालयातील संशोधकांनी एका भिंगाच्या साह्याने त्रिमितीय प्रतिमा मिळविण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यामुळे कॅमेरा न हलविताही त्रिमितीय प्रतिमा घेणे शक्य होणार आहे. त्याचा लाभ छायाचित्रकार आणि सुक्ष्म जीवशास्त्रज्ञ यांना होणार आहे. हे संशोधन ऑप्टिक्स लेटर्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
काय आहे हे तंत्रज्ञान
एक डोळा झाकल्यानंतर आपल्याला वस्तूचे अंतर किंवा खोली दिसणे अवघड होते. एका वेळी एकाच बाबीवर लक्ष केंद्रित केले जाते. अन्य वस्तू पाहायची असल्यास आपल्याला डोके हलवावे लागते. तसेच दोन वस्तूतूल अंतराचाही वेध घेणे शक्य होत नाही.
- सूक्ष्मदर्शकामध्ये एका ठिकाणी लक्ष केंद्रित करावे लागते. त्यावेळी अधिक आव्हानात्मक होते. त्यावर संशोधक क्रोझियर आणि त्यांचे विद्यार्थी ऍन्टोनी ओर्थ यांनी एकाच प्रतिमेच्या वेगवेगळ्या कोनातून दिसणाऱ्या दृश्यावर अभ्यास केला. त्यासाठी कॅमेरामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रकाशाच्या कोनावर लक्ष केद्रित केले. त्यासाठी त्यांनी कॅमेरामध्ये माय्कोरलेन्स अरे आणि हादरे सहन करणारे मास्क प्रकाशाची दिशा मोजण्यासाठी वापरले. त्यातून मिळालेले निष्कर्ष चांगले होते. मात्र हे परिमाम सामान्य कॅमेराच्या साह्याने कोणत्याही नव्या हार्डवेअरचा वापर न करता मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
- एकाच कॅमेरातून जागा न बदलता केवळ फोकसिंग बदलत दोन प्रतिमा घेण्यात आल्या. त्या दोन्ही प्रतिमातील अंतराचा गणितीय अभ्यास संगणकांच्या साह्याने करून नवी प्रतिमा मिळवली. या दोन्ही प्रतिमांचे एकत्रीकरण करून त्रिमितीय परिणाम मिळवण्यात त्यांना यश आले आहे. या प्रक्रियेतला त्यांनी लाईट फिल्ड मोमेंट इमेजिंग असे नाव दिले. मात्र त्याची अधिक उच्च दर्जाच्या लेन्सच्या साह्याने अशा प्रतिमा मिळविण्याच्या लाईट फिल्ड कॅमेराशी गफलत करण्याची गरज नाही. या दोन्ही वेगळ्या पद्धती आहेत.
- या संशोधनाचा व्हिडिओ http://youtube/Zn4ov_W4_l0 इथे पाहता येईल.
--------------------------------------
कोट ः
हे तंत्रज्ञान गणितीय पद्धती व संगणकिय प्रणालीतून तयार करण्यात आलेले असल्याने कॅमेरामध्ये किंवा सूक्ष्मदर्शकामध्ये कोणतेही बदल करावे लागत नाहीत. हे अगदी एक डोळा झाकून द्विमितीय प्रतिमा पाहण्याइतके सोपे आहे. यासाठी कोणत्याही अतिरीक्त लेन्सचा वापर करावा लागत नाही.
-केनेथ बी. क्रोझियर, जॉन एल. लोयब, मुख्य संशोधक, हार्वर्ड अभियांत्रिकी व उपयोजित शास्त्र विद्यालय.
-----------
असे होतील याचे फायदे
- पारदर्शक किंवा अर्धपारदर्शक स्नायूंच्या त्रिमितीय प्रतिमा मिळवता येतील.
- सध्या अधिक उच्च दर्जाचे सूक्ष्मदर्शक फारसे उपलब्ध होत नसल्याने साध्या सूक्ष्मदर्शकांच्या साह्याने अधिक स्पष्टपणे अभ्यास करणे शक्य होईल. अगदी शाळेच्या पातळीवरही त्याचा फायदा होऊ शकतो.
- या पद्धतीने घेतलेल्या प्रतिमांचे पडद्यावर प्रक्षेपणही करता येईल.
- अगदी साध्या कॅमेराच्या साह्याने त्रिमितीय सिनेमा बनविणे शक्य होईल. आता या तंत्रासाठी अधिक खर्च होतो. तो वाचविता येईल.
- ओर्थ यांनी 50 मीमी लेन्स असलेल्या मोबाईल कॅमेराच्या साह्याने घेतलेल्या प्रतिमांना त्रिमितीय प्रतिमाचा परिणाम दिला आहे.
जर्नल संदर्भ ः
Antony Orth, Kenneth B. Crozier. Light field moment imaging. Optics Letters, 2013; 38 (15): 2666 DOI: 10.1364/OL.38.002666
फोटो ः ऍन्टोनी ओर्थ आणि केनेथ क्रोझियर यांनी त्रिमितीय परिणाम साध्या कॅमेराच्या साह्याने मिळविण्यासाठी तंत्रज्ञान शोधले आहे. (स्रोतः इलिझा ग्रिन्नेल, हार्वर्ड)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा