अन्नसाखळीमध्ये शिरताहेत अतिसूक्ष्म कण
ताज्या फळातील अतिसूक्ष्म कणांचा शोध घेण्यासाठी शोधली पद्धती,
मिसौरी विद्यापीठातील संशोधन
गेल्या काही वर्षापासून पाण्याच्या शुद्धीकरणांची प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, कीडनाशके, प्रसाधने या सारख्या विविध उद्योगामध्ये अतिसूक्ष्म कणांचा वापर वाढत आहे. या अतिसूक्ष्म कणांचा शिरकाव मानवी अन्नसाखळीमध्ये होत असून त्याचे पर्यावरण आणि माणसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. अमेरिकेतील मिसौरी विद्यापीठामध्ये ताजे उत्पादन व अन्य अन्न पदार्थांमधील चांदीच्या अतिसूक्ष्म कणांचे प्रमाण ओळखण्यासाठी विश्वासार्ह पद्धती विकसित केली आहे. हे संशोधन जर्नल ऑफ ऍग्रीकल्चरल ऍण्ड फूट केमिस्ट्री मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
बाजारात उपलब्ध असलेल्या 100 पेक्षा अधिक पदार्थामध्ये अतिसूक्ष्म कणांचा वापर केलेला आहे. या कणांच्या विषारीपणाबाबत अद्याप फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे ही माहिती उपलब्ध करण्यासाठी अन्नपदार्थांतील अतिसूक्ष्म कण शोधणे, ओळखणे, आणि त्याचे प्रमाण मोजणे या सोबतच विषारीपणाचा अभ्यास मिसौरी विद्यापीठातील कृषी, अन्न व नैसर्गिक स्रोत महाविद्यालयातील संशोधकांनी केला आहे.
कीडनाशकांमध्ये चांदीच्या सूक्ष्म कणांचा वापर सूक्ष्म जिवांना रोखण्यासाठी केलेला असतो. अशा कीडनाशकांचा वापर फवारणीसाठी केला असता, हे सूक्ष्म कण वनस्पतीमध्ये शिरतात. प्रा. मेंगशी लिन आणि त्यांच्या सहकाऱयांनी पीअर फळांच्या सालीमध्ये असलेल्या चांदीच्या अतिसूक्ष्म कणांचे अवशेषाबाबत अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी पीअर फळे चांदीचे अतिसूक्ष्म कण असलेल्या द्रावणामध्ये बुडवून बाहेर काढून चांगल्या पाण्यामध्ये धुतले. ही क्रिया वारंवार करण्यात आली. चार दिवसानंतर पीअर फळांच्या सालीवर, सालीच्या आत अतिसूक्ष्म कण आढळून आले. त्यातील काही कण पीअरच्या गरापर्यंत पोचल्याचे दिसून आले. त्यामुळे कणांना ओळखण्यासाठी डायनॅमिक लाइट स्कॅटरिंग या पद्धतीचा त्यांनी वापर केला आहे. ही पद्धती सोने, चांदी यांच्या अतिसूक्ष्म कणांना शोधण्यासाठी उपयुक्त पडत असल्याचे दिसून आले. आहे.
अतिसूक्ष्म कण असलेल्या अशा फळांचा खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर झाल्यास हे कण मानवी शरीरात पचनानंतरही तसेच राहू शकतात. इंजेक्शनद्वारे चांदीच्या अतिसूक्ष्म कण टोचले असता रक्तातून हे कण शरीराच्या मेंदू, यकृत आणि ह्रद्य या सारख्या महत्त्वाच्या भागामध्ये पोचू शकतात.
जर्नल संदर्भ ः
Zhong Zhang, Mengshi Lin, Sha Zhang, Bongkosh Vardhanabhuti. Detection of Aflatoxin M1 in Milk by Dynamic Light Scattering Coupled with Superparamagnetic Beads and Gold Nanoprobes. Journal of Agricultural and Food Chemistry, 2013; 61 (19): 4520 DOI: 10.1021/jf400043z
छायाचित्र ः
संशोधनामध्ये सहभागी असलेले विद्यार्थी झाँग झांग यांनी चांदीच्या अतिसूक्ष्म कणांचा फळावर वापर केला आहे. या कणांचे संभाव्य धोक्याचा अभ्यास करण्यासाठी त्याचे प्रमाण शोधणारी पद्धती विकसित केली आहे. (स्रोत ः मिसौरी विद्यापीठ)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा