तापमानावरून वा
तापमानावरून किडींच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेण्यासाठी प्रारुप विकसित
तापमान बदलाने वाढतोय किडींचा प्रादुर्भाव,
आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाचे संशोधन
तापमानात होणाऱ्या बदलामुळे किडीच्या प्रादुर्भावाच्या पॅटर्नमध्ये बदल होत असल्याचे दिसून आले आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने टी टॉरट्रिक्स या पतंगावर केलेल्या अभ्यासामध्ये ही बाब पुढे आली आहे. या संशोधनातील निष्कर्ष कीडनियंत्रण आणि तापमान बदलामुळे होणाऱ्या सजीवांवरील परिणामाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार आहे. हे संशोधन सायन्स एक्सप्रेस मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
सध्या कृषी तज्ज्ञ किडींच्या प्रादुर्भावाचा अंदाज मिळविण्यासाठी तापमानाचा विचार करतात. त्यासाठी किडीच्या जीवनसाखलीतील अवस्था, त्यांचा कालावधी आणि आवश्यक अनुकूल तापमान यांचा अभ्यास केला जातो. त्यावर आधारीत कीडनियंत्रणाचे वेळापत्रक बनविणे शक्य असते. मात्र या गृहितकाचा आधार घेऊन संशोधकांनी तापमानाची व किडीच्या दिसण्याची प्रत्येक हंगामामध्ये निरीक्षणे घेण्यात आली. तरीही किडीच्या वाढीची सातत्यपूर्ण आणि वेळोवेळी होणाऱ्या प्रजनन प्रक्रियेचा योग्य अंदाज मिळत नव्हता. किडीच्या प्रत्येक पिढीच्या वाढीची अवस्था व त्यांचा कालावधी माहिती असणे, ही कीडनियंत्रणातील महत्त्वाची बाब असते. कारण बहुतांश किडनाशके ही किडीच्या एका किंवा दोन अवस्थांवर कार्य करतात. या संशोधनाबाबत माहिती देताना पेनसल्व्हानिया विद्यापीठातील किटकशास्त्र विभागातील प्राध्यापक ओत्तर एन जोर्नस्टॅड यांनी सांगितले, की तापमानाचे एका किडीच्या जीवनावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास आजवर केला जात होता. मात्र तापमानातील बदलामुळे त्यांच्या संख्येमध्ये किंवा प्रजननाच्या साखळीमध्ये होणाऱ्या बदलांवर या संशोधनामध्ये लक्ष केद्रिंत करण्यात आले. किडीच्या प्रादुर्भावाचा अंदाज येण्यासाठी तापमानात होणाऱ्या बदलांचाही उपयोग होऊ शकतो.
तापमान आणि किडींचा प्रादुर्भाव यांचा संबंध योग्य प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न या संशोधनात करण्यात आला आहे. तापमानामध्ये किडींच्या वाढीच्या अवस्थेवर परिणाम करण्याची मोठी क्षमता असल्याचे दिसून आल्या आहेत. जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर किडींच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेण्यासाठी हे प्रारुप उपयुक्त ठरू शकेल. तापमान वाढीमुळे किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, त्यांच्या संख्येत वेगाने वाढ होऊ शकते.
...असा झाला अभ्यास
संशोधकांनी टी टॉरट्रिक्स या मुलतः जपानी असलेल्या पतंगाच्या बाबतीत गेल्या 50 वर्षांची माहितीचा अभ्यास केला. त्यावरून संख्येचे किंवा प्रादुर्भावाचे एक प्रारुप तयार केले. या प्रारुपाच्या आधाराने या किडीच्या सातत्यपुर्ण आणि हंगामी संख्या वाढीचा अंदाज मिळविण्याचा प्रयत्न केला.
- या पतंगासारखे स्प्रुस बड मॉथ, लाईड ब्राऊन ऍपल मॉथ, समर फ्रुट टॉरट्रिक्स असे अनेक पतंग उत्तर अमेरिकेमध्ये आढळून येतात.
- जपान येथील कोगोशिमा येथील चहाच्या मळ्यामधून दर पाच दिवसांनी तापमान आणि किडीच्या प्रादुर्भावाची माहिती गोळा करण्यात आली. ही कीड हिवाळ्यामध्ये सुप्तावस्थेमध्ये जाते आणि वसंतामध्ये योग्य तापमान मिळताच सुप्तावस्थेमधून बाहेर येते. तापमान मिळताच पहिल्या पिढीची संख्या वेगाने वाढते.
- गेल्या 51 वर्षामध्ये 200 पेक्षा अधिक वेळा टी टॉरट्रिक्स या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे.
- जोर्नस्टॅड यांनी सांगितले, की टि टॉरट्रिक्स या किडींविषयी गोळा केलेली माहितीतून अनेक नाविन्यपूर्ण बाबी पुढे आल्या. उत्तर अमेरिकेमध्ये हिवाळ्यामध्ये आम्हाला एकाचवेळी अनेक पिढ्या आढळून येत. त्याच वेळी वर्षभर अनेक पिढ्या दिसत असत.
-उन्हाळ्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव अधिक दिसून येई. तापमान अधिक असताना त्यांचा प्रजननाचा दर अधिक असून वाढीचा दरही सर्वाधिक असे. या किडींची संख्या वेगाने वाढून, त्यांच्या पिकावरील प्रादुर्भावामध्ये प्रचंड वाढ होते. एका विशिष्ट तापमानानंतर, संख्येमध्ये होणारी ही प्रचंड वाढ आणि त्यानंतर येणारी नवी पिढीचीही त्यात भर पडते.
असे आहे हे प्रारुप
- टी टॉरट्रिक्स आणि अन्य किडीच्या संख्येवर तापमानाचा होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी संशोधकांनी एक गणितीय संख्या प्रारुप तयार केले. त्यासाठी त्या किडीच्या जीवनसाखळीतील वाढीच्या अवस्था, त्या अवस्थेवरील तापमानाचे परिणाम यांचा वापर केला. या प्रारुपांद्वारे किडींच्या संख्येचा किंवा प्रादुर्भावाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.
- या प्रारुपाबद्दल सांगताना संशोधक विल्यम नेल्सन म्हणाले, की या प्रारुपातून किडीचे संपुर्ण जीवशास्त्र उलगडू शकते. हे प्रारुप वास्तवावर आधारीत, पुर्णपणे विकसित आणि कोणत्याही प्रक्षेत्र माहितीशिवाय किडीच्या प्रादुर्भावाचा अंदाज देऊ शकते. प्रयोगशाळेतील माहिती, निरीक्षण यावर आधारीत हे प्रारुप पुर्णपणे स्वतंत्र आहे. अगदी जपानी माहितीसाठ्यापासूनही स्वतंत्र आहे.
जर्नल संदर्भ ः
William A. Nelson, Ottar N. Bjørnstad, and Takehiko Yamanaka. Recurrent Insect Outbreaks Caused by Temperature-Driven Changes in System Stability. Science, 1 August 2013 DOI: 10.1126/science.1238477
फोटो ः चहाच्या मळ्यामध्ये टि टॉरट्रिक्स चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
(स्रोत ः हिरोशी सुइनागा)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा