दुष्काळात पचवतात विषही
नामिबियातील जेम्सबॉक प्राणी तग धरण्यासाठी अवलंबितात धोक्याचा मार्ग
दुष्काळामध्ये गवतावर जगणारे प्राणी मिळेल ते गवत चारा म्हणून खात आपली उदरनिर्वाह भागवतात. मात्र नामिबिया येथील वाळवंटी प्रदेशात आढळणारा जेम्सबॉक (Oryx gazella gazella) हा प्राणी दुष्काळामध्ये अधिकाधिक विषारी वनस्पतींचे सेवन करत असल्याचे आढळले आहे. त्याचा दुष्काळामध्ये तग धरून राहण्यासाठी फायदा होत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
जागतिक तापमान बदलाच्या कालावधीमध्ये दुष्काळांच्या प्रमाणात वाढ होत आहे. वाळवंटाचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभुमीवर वन्य प्राण्याच्या खाद्यसवयीमध्ये होणाऱ्या बदलाविषयी माहिती मिळवणे आवश्यक आहे. कारण जेम्सबॉ आणि स्प्रिंगबॉक या सारखे प्राणी हे स्थानिक लोकांसाठी प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत. त्यामुळे या प्राण्यांच्या खाद्यसवयीविषयी जर्मनीतील लेबनिझ प्राणीशास्त्र आणि वन्य जीवन संशोधन संस्थेमध्ये अभ्यास करण्यात आला आहे. त्या विषयी माहिती देताना संशोधक डेव्हिड लेहमन यांनी सांगितले, की जेम्बॉकमधील तग धरण्यासाठी अन्य प्राण्यांच्या विपरीत वर्तनामागील रहस्य जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्यात आला. नामिबियातील कुनेनेसारख्या प्रतिकूल रहिवासात राहत असलेल्या या प्राण्यासाठी खाद्याच्या स्रोतामध्ये प्रचंड बदल होत असतात. तेव्हा जगण्यासाठी खाद्यामध्ये हंगामानुसार किंवा परिस्थितीनुसार बदल केले जातात. मात्र खाद्यामध्ये विषारी घटकांचे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे बाब अभ्यासात समोर आली आहे.
असे आहे संशोधन
या आधी नामिबिया विद्यापीठ आणि अन्य संस्थांनी केलेल्या संशोधनामध्ये प्रत्यंक हंगामानुसार जेम्सबॉक आपल्या खाद्यात बदल करत असल्याचे दिसून आले होते. दुष्काळी कालावधीमध्ये अनेक प्राणी खाण्यास योग्य नसलेल्या वनस्पतींचे 30 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात खाद्यात समावेश करत असल्याचे दिसून आले होते. मात्र, जम्सबॉक हे प्राणी दमारा मिल्क बुश (Euphorbia damarana) या नावाने ओळखल्या जात असलेल्या, आणि वर्षभर उपलब्ध असलेल्या विषारी वनस्पतींचा 25 टक्क्यांपेक्षा अधिक समावेश करत असल्याचे दिसून आले. या वनस्पतीमधून त्यांना एकाच वेळी पाणी आणि अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. ज्या वेळी खाद्याची उपलब्धता असते, त्यावेळी गवते आणि बिनविषारी वनस्पतींना प्राधान्य दिले जाते.
जर्नल संदर्भ -
David Lehmann, John Kazgeba Elijah Mfune, Erick Gewers, Johann Cloete, Conrad Brain, Christian Claus Voigt. Dietary Plasticity of Generalist and Specialist Ungulates in the Namibian Desert: A Stable Isotopes Approach. PLoS ONE, 2013; 8 (8): e72190 DOI: 10.1371/journal.pone.0072190
छायाचित्र ः नामिबियातील कुनेने प्रांतातील जेम्सबॉक (Oryx gazella gazella) दुष्काळामध्ये आपल्या खाद्यात विषारी वनस्पतींचाही समावेश करतो. (स्रोत ः डेव्हिड लेहमन)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा