उत्क्रांतीमध्ये स्वार्थीपणाला नाही भविष्य
उत्क्रांतीमध्ये केवळ स्वार्थीपणा केल्यास उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये त्याची शिक्षा मिळत असल्याचे मिशीगन विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनामध्ये समोर आले आहे. एकूणच उत्क्रांतीची प्रक्रिया ही स्वार्थीपणाला थारा देन नसल्याचे पुरावे संशोधकांना मिळाल्याने या आधी लोकप्रिय असलेले अनेक उत्क्रांतीचे सिद्धांताना हादरा बसणार आहे. तात्पुरत्या प्रवासात अधिक फायदा असला तरी स्वार्थीपणा सहकारासमोर टिकू शकणार नाही. हे संशोधन नेचर कम्युनिकेशन मध्ये प्रकाशित झाले आहे.
उत्क्रांतीच्या नियमानुसार, जो अधिक ताकदवान, तोच अधिक तग धरणार, असे मानले जाते. उत्क्रांती म्हणजे केवळ स्वतःचा विकास नव्हे, तर पुर्ण प्रजातीचा विकास. या प्रक्रियेचा अभ्यास करणारे मिशीगन विद्यापीठातील सूक्ष्म जीवशास्त्र आणि मुलद्रव्यीय जनुकशास्त्र विषयातील प्राध्यापक ख्रिस्तोफ ऍडमी यांनी सांगितले, की थोड्याशा काळासाठी विचार केला असता स्वार्थी असलेला जीव जगण्याच्या शर्यतीत पुढे असल्याचे दिसून आले तरी, स्वार्थीपणा हा उत्क्रांतीच्या दिर्घकालीन प्रवासामध्ये उपयुक्त ठरत नाही.
जीवशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि अन्य शास्त्रामध्ये स्वार्थीपणाची एक गेम थिअरी कायम वापरली जाते. त्याला 2012 मध्ये प्रकाशित संशोधनामध्ये झिरो डिटरमिनंट असे म्हटले जाते. त्यामध्ये सहकार्याने वाढणाऱ्या जिवांपेक्षा स्वार्थीपणाने काम करणाऱ्या सजिव अधिक वेगाने पुढे जात असल्याचे मत मांडण्यात आले होते.
या थिअरीबाबत गेल्या 30 वर्षापासून याच विषयावर संशोधन करत असलेल्या संशोधन ऍडमी आणि हिट्झे यांना शंका होत्या. झिरो डिटरमिनंट (ZD) पद्धती यशस्वी असेल, तर आजवर सहकार्य भावना आणि सहजिवी पद्धती नामशेष व्हायला हव्या होत्या. मात्र एकपेशीय सजीवापासून प्रगत अशा माणसांपर्यंत सहकार्य आणि सहजिवी पद्धत दिसून येते. म्हणून त्यांनी अधिक अभ्यास सुरू केला असता, ZD पद्धती ही ZD पद्धती न वापरणाऱ्याविरुद्ध फायदा मिळवून देत असली तरी दुसऱ्या ZD पद्धती वापरणाऱ्या सजिवांविरुद्ध त्यात यश मिळेलच असे नाही.
अशी आहे ZD पद्धती
ZD पद्धती विषयी अधिक माहिती देताना संशोधन ऍडमी म्हणाले, की उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये अनेक पद्धतीचा वापर सजीव करत असतात. वसाहती करणारे, एकटे राहणारे, काही कामासाठी एकत्र येणारे, पुर्ण वेळ एकत्र राहणारे अशा रहिवासाच्या अनेक पद्धती आहेत. त्यात स्वार्थीपणा हा एक भाग आहेच. मात्र केवळ स्वार्थीपणा करणाऱ्या ZD पद्धती या ज्या वेळी विरोधक कोण आहे, याची माहिती असताना वापरल्या जातात. त्यातही अशी पद्धती वापरणारा जीव दुसऱ्या ZD पद्धतीवाल्याशी एका प्रकारे वागतो, आणि सहकाराने जगणाऱ्या सजीवांशी वेगळ्या प्रकारे वागत असल्याचे दिसून आले आहे.
दीर्घकालीन विचारात सहकार्य भावनाच ठरेल उपयोगी
ZD पद्धती वापरण्यासाठी विरोधक कोण आहे, हे माहिती असणे आवश्यक असते. निसर्गामध्ये प्रत्येक वेळा आपला विरोधक कोण आहे, याचा अंदाज येईलच असे नाही. तसेच ZD पद्धतीमध्ये यस मिळत असले तरी भविष्यात ज्या वेळी केवळ स्वार्थापणाने वागणारे जीव शिल्लक राहिल्यानंतर, त्यांना एकमेंकावर मात करण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील. त्यातूनच पुन्हा हे सजीव ZD पद्धतीकडून सहकाराकडे वळण्याची शक्यता आहे. कदाचित ते अधिक सहकार्यांची भावना असलेले असू शकतील, असे ऍडमी यांनी सांगितले.
जर्नल संदर्भ ः
Christoph Adami, Arend Hintze. Evolutionary instability of zero-determinant strategies demonstrates that winning is not everything. Nature Communications, 2013; 4 DOI: 10.1038/ncomms3193
फोटोओळी - स्वार्थापणा उत्क्रांतीच्या प्रवासात दिर्घकाळासाठी फायदेशीर ठरत नाही. (स्रोत ः जी.एल. कोहूथ)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा