शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

उपग्रहाच्या माहितीची अचूकता वाढविण्यासाठी जमिनीवर निरीक्षणे

उपग्रहाच्या माहितीची अचूकता वाढविण्यासाठी जमिनीवर निरीक्षणे

उपग्रहाद्वारे मिळालेल्या मातीतील आर्द्रतेची अचूकता मिळविण्यासाठी प्रत्यक्ष निरीक्षणाचा घेतला जातोय आधार

उपग्रहावर लावलेल्या विविध संवेदकाद्वारे मातीतील आर्द्रतेचे प्रमाण मिळवले जाते. मात्र त्याची अचूकता तपासण्यासाठी सध्या अमेरिकी कृषी विभाग चार पाणलोट क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष जमिनीवर निरीक्षणे घेत आहे. त्यांचे हे प्रयोग गेल्या वर्षापासून दररोज प्रत्येक तासाला निरीक्षणे घेत सुरू आहे. अत्यूच्च तंत्रज्ञानाची अचूकता वाढविण्यासाठी हा तुलनात्मक अभ्यास फायदेशीर ठरणार आहे.

2002 या वर्षी युरोपिय स्पेस एजन्सीने पाठवलेल्या उपग्रहाद्वारे सॉईल मॉईश्चर ऍण्ड ओसियन सॅलिनिटी (SMOS) हे अभियान राबवले जात आहे. त्यावर बसवलेल्या अत्याधुनिक संवेदकाद्वारे मातीतील आर्द्रतेच्या प्रमाणाची प्रचंड माहिती उपलब्ध होत आहे. या माहितीचा प्रत्यक्षामध्ये वापर करण्यापूर्वी तिच्या अचूकतेचा अभ्यास करणे गरजेचे होते. त्यासाठी चार पाणलोट क्षेत्रामध्ये दिर्घकालीन मातीतील पाण्याच्या प्रमाणाची निरीक्षणे अमेरिकी कृषी विभागाचे बेल्टसव्हिले येथील जलतज्ज्ञ टॉम जॅकसन घेत आहेत.
- नव्या संवेदकामुळे मातीतील आर्द्रतेचे प्रमाण चार टक्क्यांपर्यंत अचूक मोजता येत असल्याचे मानले जाते. मात्र त्याची पडताळणी प्रत्यक्ष अभ्यास व निरीक्षणातून मिळविण्यासाठी अमेरिकी कृषी विभागाचे जलतज्ज्ञ टॉम जॅकसन यांनी चार पाणलोट क्षेत्रामध्ये निरीक्षणे करत असून, प्रत्येक तासागणिक मातीमधील आर्द्रतेचे प्रमाण प्रत्यक्षामध्ये मोजण्यात येत आहे. तसेच एसएमओएस या उपग्रहाद्वारे मिळालेल्या या पाणलोटातील पाण्याच्या प्रमाण आणि अन्य उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचाही तुलनात्मक अभ्यास करत आहेत.

अभ्यासातील निष्कर्ष ः
- गेल्या एक वर्षाच्या तुलनात्मक अभ्यासातून उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीची अचूकता 95 टक्क्यांपर्यत मिळत असल्याचे दिसून आले आहे.
- अचूकता कमी होण्याच्या काळातील वातावरण आणि त्यातील बदलाची माहिती मिळाली आहे.
- या तुलनात्मक अभ्यासातून उपग्रहाच्या माहितीमध्ये योग्य प्रकारे अचुकता मिळवण्यासाठी नवी पद्धती तयार करण्यात येत आहे.
- या अभ्यासाबाबत अधिक माहिती ऑगस्ट महिन्याच्या ऍग्रीकल्चरल रिसर्च मॅगजीन मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

------------------------------------------
फोटोओळ ः मातीतील पाण्याचे अचूक प्रमाण मिळविण्यासाठी संशोधक टॉम जॅकसन आणि त्यांची विद्यार्थिनी पार्मेसिया जोन्स विविध पद्धतीचा वापर करत आहेत. या तुलनात्मक अभ्यासातून उपग्रहाद्वारे मिळालेली माहिती अधिक अचूक करणे शक्य होईल.
--------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा