छायाचित्र ः
ताणामध्ये पेशीमध्ये होणाऱ्या बदलांसाठी कार्यरत यंत्रणा उलगडण्यात संशोधकाना यश आले आहे. ताणाच्या परिस्थितीमध्ये प्रथिनांच्या आकारामध्ये बदल होऊन त्यांच्या काम थांबवले जाते. पेशी संरक्षण कामांना प्राधान्य देतात. एलओएन हे विकर प्रथिनांचा काही भाग वापरून ताणांमध्ये पेशींचे संरक्षण करण्याचे काम करते. मात्र, ज्या वेळी आकारात बदल झालेल्या प्रथिनांची संख्या अधिक असते, त्यावेळी हे विकर चांगल्या प्रथिनांना नष्ट करण्याचे काम करते. (स्रोत ः पीटर चियेन, मॅसेच्युसेटस विद्यापीठ)
------------------------------------------------
ताणामध्ये थांबते पेशींची वाढ
- ताणाच्या परिस्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या विकरांची कार्य पद्धती उलगडण्यात आले यश
- मॅसेच्युसेटस विद्यापीठातील संशोधन
ताणाची परिस्थिती माणसांप्रमाणे अन्य प्राणी आणि सूक्ष्म जीवांवरही विपरीत परिणाम करत असल्याचे मॅसेच्युसेटस विद्यापीठातील संशोधनामध्ये समोर आले आहे. अत्युच्च तापमानासारख्या विपरीत परिस्थितीचे पेशींच्या वाढीवर होणाऱ्या परिणामामागे कार्यरत असलेली यंत्रणा उलगडण्यात यश आले आहे.
ताणाच्या परिस्थितीमध्ये काही प्रथिनांच्या आकारात बदल होतात, तर काही दुमडली जातात. त्यांच्या कार्य थांबवले जाते. त्या बाबत माहिती देताना संशोधक चियेन यांनी सांगितले, की हे आकारातील बदल आपल्याला तापमानामधील नेहमीची घटना वाटू शकते. मात्र जिवाणू अशा ताणाच्या परिस्थितीमध्ये प्रथिनांचा नाश करतात. विशेषतः काही विशिष्ट प्रकारचे जिवाणू उच्च तापमानाला डिएनए च्या पुनरावृत्तीसाठी गरजेच्या असलेल्या प्रथिनांचा नाश करत असल्याचे आम्हाला प्रयोगादरम्यान दिसून आले आहे. या वेळी ते आपली वाढ थांबवितात. प्रथिनांच्या नाशासाठीचा संदेश त्यांना ताणामुळे बदललेल्या प्रथिनांकडून उपलब्ध होतो.
वाढीसाठी योग्य असलेल्या वातावरणामध्ये पेशी वेगाने वाढत असतात. त्यावेळी डिएनए च्या पुनरावृत्तीही वेगाने होत असतात. मात्र, ताणाच्या परिस्थितीमध्ये ही डिएनए ची पुनरावृत्ती रोखली जाऊन संरक्षणात्मक बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते. त्या बाबत चियेन यांनी स्पष्ट केले, की जिवाणूंसहीत प्रत्येक पेशीमध्ये प्रथिने व मुलद्रव्यांचे मोठ्या प्रमाणात वैविध्य असते. त्याद्वारे जीवनासाठी आवश्यक विविध रासायनिक प्रक्रिया केल्या जातात.प्रथिनांच्या आकारावरून प्रथिन कोणते कार्य करते, हे ठरवले जाते.
असे आहे संशोधन
- पर्यावरणातील ताण अथव अनुकूलता यांची माहिती पेशींतील यंत्रणांपर्यंत कशा प्रकारे पोचते, या विषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती. मात्र, चियेन यांच्या मार्गदर्शनाखाली जिंग लियू यांनी कौलोबॅक्टर (Caulobacter) या जिवाणूंमधील ताणांच्या परिस्थितीमध्ये संरक्षणासाठी कार्यरत होणारे एलओएन हे विकर शोधले आहे. हे विकर आकार बदललेल्या प्रथिनांचा नाश करते. मात्र, ज्यावेळी नाश करण्यासाठी आकार बदललेली प्रथिने उपलब्ध नसतात, त्यावेळी वाढीसाठी आवश्यक चांगल्या प्रथिनांना नष्ट करण्यास सुरुवात करते. या प्रथिनांचा नाश झाल्याने पेशींची वाढ थांबते.
- जेव्हा ताण कमी होतो, तेव्हा चांगल्या प्रथिनांचा नाश करणे थांबवले जाते. पेशींचा वाढ पुन्हा सुरू होते.
ताणांची परिस्थिती आणि ताण निवळल्यानंतरची परिस्थिती या दोन्ही घटनांना जिवाणू अत्यंत त्वरीत प्रतिसाद देते.
- ताण आणि प्रथिनांचे दुमडणे हा जीवनांचा एक वैश्विक भाग आहे. त्यामुळे जीवाणूंतील ही प्रक्रिया उलगडल्याने प्रत्येक पेशीतील ताणाची परिस्थितीशी कशा प्रकारे सामना करतात, हे लक्षात येण्यास मदत होते.
- या संशोधनासाठी राष्ट्रीय आरोग्य संस्था, हॉवर्ड ह्युजेस वैद्यकिय संस्था आणि मॅसेट्युसेटस ऍमहेरेस्ट विद्यापीठ यांनी अर्थसाह्य केले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा