युजी 99 रोगासाठी प्रतिकारक जनुक सापडले
गव्हावरील युजी 99 धोकादायक रोगाच्या नियंत्रणासाठी मुलद्रव्यीय साधन विकसित करणे शक्य
अमेरिकी कृषी विभागाच्या संशोधकांनी गहू पिकातील तांबेरा किंवा युजी 99 या रोगाच्या नियंत्रणासाठी मुलद्रव्यीय साधन विकसित केले आहे. युजी 99 या रोगासाठी प्रतिकारक जनुक शोधले असून, त्याची नक्कल करण्यात संशोधकांना यश आले आहे. हे संशोधन सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
1999 मध्ये प्रथम युगांडा येथे आढळलेल्या गव्हावरील तांबेरा (युजी 99 ) या रोगाचा अनेक आफ्रिकी देश आणि मध्य पूर्वेतील देशात प्रादुर्भाव आढळतो. जगातील गव्हाच्या उत्पादनावर या रोगामुळे विपरीत परिणाम होत असून सुमारे 70 टक्क्यांपर्यत नुकसान होते.
जगभरामध्ये लागवड होत असलेल्या सुमारे 90 टक्के जाती या रोगासाठी संवेदनशील असून
रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होऊन अन्न सुरक्षिततेसाठी धोका निर्माण होऊ शकतो.
मिन्निसोटा येथील तृणधान्य रोग प्रयोगशाळेतील कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांनी गहू पीक आणि त्यांच्या जंगली जातीतून युजी 99 या रोगासासाठी प्रतिकारक असे जनुक एसआर35 (Sr35 ) शोधले आहे. हे जनुक गव्हाच्या Triticum monococcum या जातीतून मिळाले आहे. संशोधक कान्सास राज्य विद्यापीठातील संशोधक एडवर्ड अखुनोव्ह आणि कॅलिफोर्निया डेव्हिय विद्यापीठातील संशोधक जॉर्ज डुब्कोव्हस्की यांनी या जनुकाची नक्कल केली आहे.
या संशोधनाचे फायदे
- या प्रकल्पाचा भाग म्हणून मॅट राऊज यांनी युजी 99 च्या प्रतिकारतेसाठी गहू जातींचे विश्लेषण केले.
- Sr35 या जनुकाचा अंतर्भाव व्यावसायिक गहू जाती करण्यात येणार आहे. सध्या या जनुकाची नक्कल करण्यात यश आले आहे. त्या जैवतंत्रज्ञानाच्या वापरातून युजी 99 या रोगाचे नियंत्रण करण्यात यश येऊ शकते.
- तांबेरा रोग आणि गहू पिक यांच्यातील संबंधाचे मुलद्रव्यीय यंत्रणा शोधण्यासाठी सामायिक व्यासपीठ तयार होण्यास मदत मिळेल.
- तसेच कार्यक्षम रोग नियंत्रण पद्धती विकसित करणे शक्य होईल.
- See more at: http://blogs.usda.gov/2013/06/27/scientists-discover-gene-to-combat-devastating-wheat-rust/#sthash.dZdUCyUr.dpuf

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा