पाण्याच्या शुद्धीकरणासाठी संकरीत माती
पाण्यामध्ये विविध जड धातूंचे प्रदुषण वाढत असून त्याचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. हे जड धातू पाण्यातून दूर करण्यासाठी (केओलिनाईट क्ले) माती आणि पपईंच्या बियांची पावडर उपयुक्त ठरत असल्याचे संशोधन एसीएस सस्टेनेबल केमिस्ट्री ऍंण्ड इंजिनिअरींग मध्ये प्रकाशित झाले आहे. हे संशोधन जर्मनी आणि नायजेरीया येथील संशोधकांनी संयुक्तरित्या केले आहे.
पाण्यामध्ये विविध प्रकारच्या जड धातूचे प्रदुषण वाढत्या औद्योगिकरणामुळे वाढत आहे. अशा प्रदुषित पाण्याची शुद्धता करण्यासाठी प्रगत देशामध्ये अनेक महागड्या पद्धती वापरल्या जातात.मात्र विकसनशील देशामध्ये या पद्धतींचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातो. संशोधख इम्यॅन्युअल उन्युबोनाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्यामधील पारे, शिसे, कॅडमिअम या सारखे जड धातू दूर करण्यासाठी
चिकणमाती व पपईंच्या बियांचा वापर करण्याची पद्धत शोधून काढली आहे. हे दोन्ही घटक वेगवेगळे वापरूनही पुर्वी पाण्याचे शुद्धीकरण केले जात असे. मात्र संशोधकांनी या दोन्ही घटकांचे एकत्रीकरण करत अधिक सक्षम अशी पाणी शुद्धीकरणाची पद्धती तयार केली आहे. या एकत्रीत मातीला संशोधकांना संकरीत माती असे नाव दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा