अतिनील किरणामुळे वाढते स्ट्रॉबेरीचा साठवण क्षमता
एलइडी दिव्यामधून मिळवले अतिनील किरणांचे पूर्ण स्पेक्ट्रम
स्ट्रॉबेरीची फळे ही नाजूक असून थोडासा जरी मार बसला तरी त्यामध्ये बुरशींचा वाढ वेगाने होते. त्यामुळे त्यांचा साठवण कालावधी कमी आहे. स्ट्रॉबेरी आणि अन्य बेरी वर्गीय फळांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी अमेरिकी कृषी विभागाने अतिनील किरणाचा वापर केला आहे. स्ट्रॉबेरीमध्ये वाढणाऱ्या रॉट या बुरशींच्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी हे तंत्र उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. थंड वातावरणामध्ये साठवण आणि अधिक आर्द्रतेमध्ये अतिनील किरणाचा वापर केलेल्या स्ट्रॉबेरी अधिक काळपर्यंत साठवता येतात.
सुर्य प्रकाशातील अतिनील किरणाप्रमाणेच एलईडी दिव्यांच्या वापरातून ही किरणे मिळवता येतात. या आधी पारंपारिक अतिनील किरणाचा वापर केल्यास फळे वाळत असत. मात्र कमी प्रमाणातील अतिनील किरणाचा अधिक काळासाठी वापर अमेरिकी कृषी विभागाच्या बेल्टसव्हीले येथील संशोधकांनी केला आहे. त्यांनी केलेल्या प्रयोगामध्ये अतिनील किरणाचा वापर साठवण कालावधी वाढविण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे. या प्रयोगाचे निष्कर्ष लेसर्स ऍण्ड इलेक्ट्रोऑप्टीक्स या विषयावरील परिषदेमध्ये सादर करण्यात आले.
या निष्कर्षामुळे उत्साहीत होत संशोधकांच्या गटाने या तंत्रज्ञानाचा व्यासायिक रेफ्रिजरेटरमध्ये समावेश करण्यासाठी काम सुरू केले आहे. अतिनील किरणांच्या एलइडी दिव्याचा वापर रेफ्रिजरेटरमध्ये केल्यास अन्नपदार्थाचा साठवण कालावधी वाढणार आहे. वाया जाणाऱ्या अन्न पदार्थाचे प्रमाण कमी ठेवणे शक्य होणार असल्याचे एसइटीआय संस्थेचे अध्यक्ष रेमिस गास्का यांनी सांगितले.
असे आहे हे तंत्रज्ञान
- अतिनील किरणाचे पुर्ण स्पेक्ट्रम तयार करण्यासाठी एसइटीआय संस्थेमध्ये विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.या पुर्ण स्पेक्ट्रममध्ये युव्हीए ते युव्हीसी या तरंगलांबीचा प्रकाश असून त्यातील कोणताही वापरण्याची लवचिकता या एलइडी दिव्यांच्या वापरामुळे दिसून येते.
- कमी तापमानामध्ये ही उपकरणे चांगल्या प्रकारे काम करू शकतात.
- तसेच रेफ्रिजरेटरच्या लहान जागेमध्ये बसू शकत असल्याचे संशोधक स्टिव्हन ब्रिट्झ यांनी सांगितले.
असे झाले प्रयोग
बाजारातून आणलेली निम्मी ताजी स्ट्रॉबेरी नेहमीच्या रेफ्रिजरेटरमध्ये आणि निम्मी अतिनील किरणांनी युक्त कप्प्यामध्ये ठेवली. त्यातून अतिनील किरणांमुळे स्ट्रॉबेरीची साठवण कालावधी दुप्पटीइतका वाढल्याचे दिसून आले. अंधाऱ्या कप्प्याच्या तुलनेमध्ये नऊ दिवस स्ट्रॉबेरी चांगली राहिली. त्यांचे वजन, त्यातील पाण्याचे प्रमाण, अंतर्गत रसायनाचे प्रमाण, दृष्य इजा आणि बुरशींची वाढ या बाबी तपासण्यात आल्या.
फोटोओळ ः युव्ही - बी प्रक्रियेमुळे फळावरील बुरशीची वाढ रोखली जाते. त्यामुळे फळांचा साठवण कालावधी वाढतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा