आता रक्तवाहिन्या ठरतील परवलीचा शब्द
उच्च सुरक्षेसाठी अंगठ्याचा ठसा, डोळ्यांची बाहुली किंवा पासवर्ड सारेच पडणार मागे
पुर्वी आपली ओळख म्हणून सही किंवा अंगठ्याचा ठसा उपयुक्त होता. आता डिजीटल युगामध्ये आपल्या माहितीची सुरक्षा करण्यासाठी पासवर्ड किंवा परवलीचा शब्द वापरला जातो. त्याहीपुढे जात बायोमेट्रीक ओळख म्हणून हाताची बोटे आणि डोळ्यांतील बाहुलीचे मापन केले जाऊ लागले. मात्र येत्या काही दिवसात या साऱ्या कल्पना मागे पडण्याची शक्यता आहे. आपल्या चेहऱ्याच्या त्वचेखालील रक्तवाहिन्यांचा नकाशा स्कॅनिंगद्वारे टिपला जाणार असून, त्याचा वापर चेहऱ्याची ओळख म्हणून वापरण्याची कल्पना पुढे येत आहे. रक्त वाहिन्यांच्या नकाशाची नक्कल कोणत्याही परिस्थितीत करता येणार नसल्याचा दावा कोलकत्ता येथील जादवपूर विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने केला आहे. त्यांनी आपले हे इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॉम्प्यूटेशनल इंटेलिजन्स स्टडीज च्या अंकात प्रकाशित होणाऱ्या लेखात केला आहे.
कोलकत्ता येथील जादवपूर विद्यापीठातील अयन सील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चेहऱ्यांच्या त्वचेखालील रक्तवाहिन्यांच्या अवरक्त किरणांच्या साह्याने स्कॅनिंग केले आहे. या स्कॅनिंग द्वारे अत्यंत सूक्ष्म अशा रक्तवाहिन्यांचा 97 टक्क्यांपर्यंत अचूक नकाशा मिळवणे शक्य आहे. त्याचे संगणकिय गणिती प्रक्रियेने विश्लेषण केले असून या थर्मोग्राम स्कॅनचा वापर उच्च सुरक्षा अपेक्षित असलेल्या ठिकाणी करणे शक्य आहे.
सध्या वापरल्या जाणाऱ्या सुरक्षा पद्धतीमध्ये नक्कल करणे शक्य असते. हाताचे ठसे, डोळ्यांची बाहुली यामध्ये खोटे ठसे किंवा लेन्सच्या वापरातून सुरक्षा भेदणे शक्य असते. मात्र चेहऱ्याच्या त्वचेआतील रक्तवाहिन्यांची नक्कल कोणत्याही प्रकारे करता येणार नसल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
Journal Reference:
Ayan Seal, Suranjan Ganguly, Debotosh Bhattacharjee, Mita Nasipuri, Dipak Kr. Basu. Automated thermal face recognition based on minutiae extraction. International Journal of Computational Intelligence Studies, 2013
---

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा