मधमाशांच्या वसाहतीतील जनुकिय विविधतेमुळे
वसाहती तग धरण्याचे प्रमाण वाढते
अमेरिकेतील संशोधन
मधमाशीच्या एका वसाहतीमध्ये जनुकिय विविधता असलेल्या अधिक नराशी मिलन झाल्यास त्या वसाहतीचे आरोग्य चांगले राहून वसाहत तग धरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठ, मेरीलॅंड विद्यापीठ, आणि अमेरिकी कृषी विभाग यांनी संयुक्त रित्या केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. जनुकिय विविध्यता हा मधमाशीच्या वसाहती वाचविण्यामध्ये मोलाची भुमिका निभावते. राणी माशीला मिलनासाठी कमी निवड उपलब्ध असलेल्या वसाहती कमी प्रमाणात तग धरत असल्याचे दिसून आले आहे.
मधमाश्याच्या वसाहती नष्ट होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या वसाहती वाचविण्यासाठी विविध प्रकारे मधमाशी आणि त्यांच्या सामाजिक व्यहवारावर संशोधन करण्यात येत आहे. त्याच मालिकेमध्ये मधमाश्यांच्या जनुकिय विविधतेचे वसाहतीवर होणारे परिणाम आणि त्यांच्या तग धरण्याच्या क्षमतेवरील परिणामांचा अभ्यास कॅरोलिना राज्य विद्यापीठ, मेरीलॅंड विद्यापीठ, आणि अमेरिकी कृषी विभागाद्वारे करण्यात आला. त्याविषयी माहिती देताना उत्तर कॅरोलिना राज्य विद्यापीठातील कीटक शास्त्र विभागाचे संशोधक डॉ. डेव्हिड तार्पी यांनी सांगितले, की नियंत्रित वातावरणामध्ये जनुकिय विविधतेचा परिणाम प्रजातीच्या तग धरण्याच्या क्षमतेवर होत असल्याचे ज्ञात होते. मात्र बाह्य परिसरामध्ये त्याचा पडताळा घेणे आवश्यक होते. बाह्य वातावरणामध्ये वसाहतीच्या नष्ट होण्यामागे या कारणांचे किती प्रमाण आहे, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या संशोधनातून केला आहे.
असा झाला अभ्यास
- तार्पी यांनी पूर्व अमेरिकेतील व्यासायिक पद्धतीने पाळल्या जाणाऱ्या एपिस मेलिफेरा या प्रजातीच्या 80 वसाहतीतून जनुकिय विविधतेचे नमुने गोळा केले. त्यातील राणीमाशीशी मिलन करणाऱ्या नरांच्या जनुकिय विविधतेवर लक्ष केंद्रित केले.
- ज्या वसाहतीमध्ये राणी माशी अधिक नराशी मिलन करणे शक्य होते, तिथे अधिक जनुकिय विविधता आढळली.
- दहा महिन्याच्या कालावधीमध्ये प्रती महिना या वसाहतीच्या आरोग्याचा मागोवा घेण्यात आला.
प्रयोगाचे निष्कर्ष ः
- ज्या वसाहतीची राणी माशी किमान सातपट अधिक नराशी मिलन करते, त्या वसाहती 2.86 पट अधिक तग धरत असल्याचे दहा महिन्याच्या कालावधीमध्ये दिसून आले. अशा 48 टक्के वसाहती या कालावधीच्या शेवटच्या टप्प्यानंतर जिवंत असल्याचे दिसून आले.
- ज्या वसाहतीमध्ये जनुकिय विविधता कमी होती, अशा केवळ 17 टक्के तग धरून राहू शकल्या.
- अर्थात 48 टक्के तग धरण्याची क्षमता जनुकिय विविधतेमुळे अशली तरी एकूण मधमाशीच्या वसाहती नष्ट होण्याच्या प्रक्रियेसाठी धोक्याचा इशारा ठरणार आहे. तर जनुकिय विविधता कमी असलेल्या वसाहतीमध्ये 17 टक्के दर असल्याने त्यातल्या त्यात जनुकिय विविधता वाढल्यास वसाहती वाचण्याचे प्रमाण थोड्या प्रमाणात वाढू शकते.
जर्नल संदर्भ ः
David R. Tarpy, Dennis vanEngelsdorp, Jeffrey S. Pettis. Genetic diversity affects colony survivorship in commercial honey bee colonies. Naturwissenschaften, 2013; DOI: 10.1007/s00114-013-1065-y
आलेख किंवा ग्राफिक ः
वसाहती वाचण्याचे प्रमाण वसाहतीतील जनुकिय विविधतेवर अवलंबून
मिलनामध्ये निवडीस कमी वाव- राणी माशीचे सात पेक्षा कमी नराशी मिलन--वसाहतीचे तग धरण्याचे प्रमाण 2 (17 टक्के)-- वसाहती नष्ट होण्याचे प्रमाण 9 (83 टक्के)
मिलनामध्ये निवडीस अधिक वाव- राणी माशीचे सात पेक्षा अधिक नराशी मिलन--वसाहतीचे तग धरण्याचे प्रमाण 32 (48 टक्के)-- वसाहती नष्ट होण्याचे प्रमाण 35(54 टक्के)
----

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा