पशुपालनातही जैवतंत्रज्ञान ठरते फायद्याचे
कमी खाद्यात अधिक उत्पादन मिळवितानाच पर्यावरणासाठी ही ठरेल उपयुक्त
पशुपालनामध्ये जनावरांच्या आरोग्यासोबतच अधिक उत्पादन मिळणे आवश्यक आहे. त्याचसोबत पर्यावरणात हरितगृह वायूच्या उत्सर्जन कमी करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरू शकत असल्याचे कॅलिफोर्निया विद्यापीठातील तज्ज्ञांचे मत आहे. हे संशोधन ऍनिमल फ्रंटिअर मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
शेतीसाठी जमिनीचा वापर वाढत आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नाचा पुरवठा करण्यासाठी सातत्याने नव्या तंत्रांचा वापर केला जातो. मात्र वाढत्या कृषी क्षेत्रासोबतच पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे वातावरणाचे प्रदुषण कमी ठेवत अन्न सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्याचे आव्हान संशोधकांसमोर आहे. त्याच बरोबर पशुपालनातूनही हानीकारक वायू बाहेर पडत असतात. त्या बाबत कॅलिफोर्निया विद्यापीठातील पी.एचडीचे विद्यार्थी क्लेटन न्युमिइर यांनी संशोधन केले आहे. जैवतंत्रज्ञानाचा वापर पशुपालनात केल्याने फायद्यामध्ये वाढ होत असल्याचे निष्कर्ष मिळाले आहेत. पशुपालनामध्ये कमी खाद्यामध्ये अधिक दुग्ध उत्पादन, त्याच वेळी पर्यावरणातील हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होते.
असे झाले संशोधन- गायींचे वेगवेगळे गट करून त्यांच्यावर जैवतंत्रज्ञानाच्या प्रक्रियांचा वापर केला. एक गटामध्ये कोणत्याही जैवतंत्रज्ञानाचा वापर केला नाही. ज्या गटामध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर केलेला नव्हता, त्यापेक्षा गायींची वाढ चांगली झाल्याचे दिसून आले. त्याचेवेळी या गायींमुळे होणाऱ्या वायूंच्या प्रदुषणाचे मापन करण्यात आले. हा प्रयोग चार वेळा करून अचुकता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
- संशोधकांनी दुग्ध जैवतंत्रज्ञानातील आरबीएसटी या तंत्राचीही चाचणी घेतली. ही गायीच्या संजीवकांची कृत्रीम नक्कल असून त्याचा माणसांवर कोणताही परिणाम होत नाही. हे संजीवक दुग्ध उत्पादनवाढीसाटी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. चाचणीमध्ये हे संजीवक वापरलेल्या गायींचे दुग्ध उत्पादन अधिक मिळाले, तसेच हरितगृह वायूंच्या प्रमाणात घट झाली.
शंका असल्या तरी वापर टाळता येणार नाही
- खाद्य उत्पादनामध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. अनेक लोक यांच्या विरोधात आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचे फायदे पाहता अधिक उत्पादनासाठी त्यांचा वापर टाळणे शक्य नसल्याचे न्युमिइर यांनी सांगितले.
- नॅशनल कॅलमन चे डॉ. किम स्टॉकहाऊस म्हणाले की, पशुपालनातील हरितगृह वायूचे प्रमाण कमी करण्यासाठी जैवतंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते. या तंत्रज्ञानामुळे जनावरांची कार्यक्षमता, पीक उत्पादन आणि शेण आणि खत व्यवस्थापनामध्ये सुधारणा होते. त्याचसोबत बायोगॅस जमा करून त्याचा वापर वाढल्यास पर्यावरणातील प्रदुषणाचे प्रमाण कमी होईल. त्यातून ऊर्जा निर्माण होईल.
संदर्भ ः
C. J. Neumeier, F. M. Mitloehner. Cattle biotechnologies reduce environmental impact and help feed a growing planet. Animal Frontiers, 2013; 3 (3): 36 DOI: 10.2527/af.2013-0022

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा