पाण्याच्या कमतरतेचा टोमॅटो पिकावर होणारा परिणाम तपासला
ताण सहनशील जाती विकसनासाठी होणार फायदा
पाण्याच्या कमतरतेत टोमॅटो पिकामध्ये जनुक होते कार्यरत
पाण्याच्या कमरतरतेचा टोमॅटो पिकावर व फळांच्या दर्जावर होणारा परिणाम चीन येथील झियांगसु विद्यापीठ व हांगझोऊ विद्यापीठ येथील संशोधकांनी तपासला आहे. पाण्याचा ताण पडल्यानंतर टोमॅटोचे रोपे एक जनुक अधिक कार्यक्षम बनत असल्याचे दिसून आले आहे. StAPX ( Solanum lycopersicum thylakoid ascorbate peroxidase gene ) या जनुकाचा वापर करून पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जाती विकसित करणे शक्य होणार आहे.
दुष्काळामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर पिकामध्ये विविध आयनाचे (रिऍक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज ROS) असमतोल तयार होत असतात. या आधी झालेल्या काही संशोधनामध्ये आरओएस हे हायड्रोजन पेरॉक्सॉईडचे प्रमाण कमी होत असल्याचे मांडण्यात आले होते. तसेच काही संशोधनामध्ये पाण्याचा ताण निर्माण झाल्यानंतर एपीएक्स जनुके अधिक कार्यरत होत असल्याचे दिसून आले होते. त्यावर अधिक अभ्यास करताना चीन येथील संशोधक डब्लू. एच. सुन, लिऊ आणि वांग यांनी पाण्याचा ताण निर्माण झाल्यावर टोमॅटोच्या पाने आणि फळातील विविध घटकांवर होणारे परिणाम तपासले आहेत. मातीतील ओलाव्याचे प्रमाण कमी असताना टोमॅटोमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड मिळविण्याची क्षमता तयार होत असल्याचे दिसून आले आहे.
असे झाले प्रयोग
जनुकिय सुधारीत टी2-2 आणि टी2- 4 या लाईनमधील टोमॅटोच्या बिया आणि जंगली टोमॅटोच्या बिया यांची ओल्या फिल्टरपेपर वर 25 अंश सेल्सिअस तापमानाला उगवण करून घेतली. ही उगवलेल्या बिया निर्जंतुकीकरण केलेल्या गादी वाफ्यार हरिगृहामध्ये करण्यात आली. दोन आठवड्यानंतर तीन विभागात त्यांना मातीतील पाण्याचे प्रमाण 70 +- 5 टक्के पाणी, 60 आणि 50 टक्के असे ठेवण्यात आले.
- ही पाणी देण्याची पद्धती शेवटचे फळ धरेपर्यंत दिली गेली.
- पाणी ठिबक सिंचनाने दिले असून दिवसातून दोन वेळा मातीतील पाण्याचे प्रमाण मोजण्यात आले.
-पानामध्ये एपीएक्स , हायड्रोजन पेरॉक्साईडचे प्रमाणे, निव्वळ प्रकाश संश्लेषणाचा दर यांचे प्रमाण मोजले.
- फळाचे उत्पादन, पोषक घटकांचा दर्जा मोजण्यात आला.
निष्कर्ष ः
- एपीएक्स या जनुकांचे हायड्रोजन पेरॉक्साईड मिळविण्याची क्षमता ही पाण्याचा ताण असताना निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच जनुकिय सुधारीत टोमॅटोचे उत्पादन ही जंगली टोमॅटोपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा