कृत्रिम ह्रद्य निर्मितीसाठी गाईंचे स्नायू ठरले उपयुक्त
पॅरीस येथील कारमॅट संस्थेने बनविले शरीरात बसणारे कृत्रिम ह्रद्य
सध्या ह्रद्य रोगावर अन्य दात्याच्या ह्रद्याचे प्रत्यारोपण केले जाते. प्रति वर्ष अमेरिकेमध्ये दोन ते तीनहजार अशा शस्त्रक्रिया होत असतात. साधारणतः तितकेच लोक प्रतिक्षा यादीमध्ये असतात आणि योग्य दाता न मिळाल्याने अनेक रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागते.
मानवी अवयवामध्ये गर्भामध्ये सुरू झालेले ह्रद्याचे ठोके अंतिम क्षणापर्यंत सुरू असते. कृत्रिम ह्रद्याचा वापर दात्यांचे ह्रद्य मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात केला जातो. त्यामध्ये आता सुधारणा होत कृत्रिम ह्रद्याचे काम करणाऱ्या सिनाकार्डिया सिस्टिम्समुळे त्यात सुमारे 1374 दिवसापर्यंत ह्रद्य चालू ठेवण्यात यश आले आहे. अर्थात हे पूर्ण उत्तर नाही. कारण या कृत्रिम उपायासाठी बाहेरून ऊर्जा पुरवावी लागतो. या बाह्य संपर्कातून विविध रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढते.
पॅरीस येथील कारमॅट संस्थेने पहिले शरीरात बसविता येईल असे कृत्रिम ह्रद्य विकसित केले आहे. ते पुर्णतः छातीच्या पोकळीत बसत असून त्याला काहीही बाह्य घटक नाहीत. त्यामुळे जंतूच्या प्रादुर्भावाची शक्यता कमी होते.
- या उपकरणामध्ये एक पातळ पडद्याने अलग केलेले दोन कक्ष असतात. एका भागात हायड्रोलीक द्रव पदार्थ व दुसऱ्यामध्ये रक्त असते. हा हायड्रॉलिक द्रव कक्षामध्ये आत बाहेर होत राहतो. त्यामुळे मधल्या पातळ पडद्याचे आकुंचन व प्रसरण झाल्याने खऱ्या ह्रद्याप्रमाणे रक्ताचे वहन होते.
- दोन कक्षामधील पातळ पडद्याची रक्ताकडील बाजू आणि व्हॉल्व्हसाठी गाईंच्या स्नायूंचा वापर केलेला आहे. या गाईंच्या स्नायूंमुळे रक्ताच्या गुठळ्या होणे टाळता येते. गुठळ्या कमी होण्यासाठी कमीत कमी औषधांचा वापर करावा लागणार आहे.
- या उपकरणामध्ये संवेदकांची (सेन्सर) प्रणाली वापरली असून रुग्णांबाबतची माहिती संगणकाकडे पाठवून त्या सुचनेनुसार रक्तांच्या पंपींगचा दर बदलून घेईल. या संवेदकांना चालविण्यासाठी बॅटरीचा वापर केलेला असून इंडक्शन प्रक्रियेने बाहेरून चार्ज करता येते.
ह्रद्याची कार्यक्षमता गाठण्यासाठी अधिक संशोधनाची गरज
- कोणत्याही यांत्रिक उपकरणाला मानवी शरीरात सामावून घेतले जात नाही. सामावून घेण्यासाठी सातत्याने औषधांची गरज असते.
- शरीर हे क्षारयुक्त असल्याने यांत्रिक पार्ट लवकर झिजतात.
- कोणत्याही यंत्रासाठी ह्द्यांची कार्यक्षमता गाठणे अवघड आहे. कारण ह्रद्य प्रति मिनीट 60 वेळा धडकते. म्हणजेच दिवसाला 86 हजार 400 वेळा, तर वर्षाला 31.5 दशलक्ष वेळा धडकते.
- या उपकरणाच्या चाचण्या युरोप आणि मध्य पूर्वेतील रुग्णांवर करण्यात येणार आहेत. अर्थात हे उपकरण मानवी शरीरात नक्की किती काळ चालू शकेल, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा