कर्करोगाच्या पेशीच्या तग धरण्याच्या प्रक्रियेचा झाला अभ्यास
अमेरिकेतील नॉत्रेदॅम विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने कर्करोगाच्या पेशींच्या मृत्यू टाळण्याच्या प्रक्रियेविषयी अभ्यास केला आहे. कर्करोगाच्या पेशी अनियंत्रितपणे वाढत असताना त्यांच्यातील मृत्यूचा दर कमी असतो. त्यासाठी काही पोषक विकरे कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. या विकरांच्या कार्यक्षमता रोखण्यात यश आल्यास त्याचा फायदा कर्करोगाची वाढ रोखण्यासाठी करता येऊ शकतो. तसेच अन्य केमोथेरपीसारख्या पद्धतीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी करता येऊ शकेल. हे संशोधन कॅन्सर रिसर्च या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
एका अवयवापासून दुसऱ्या अवयवापर्यंत कर्करोगाच्या पेशींचा प्रसार होत असतो. पेशींचा मृत्यू होण्याची प्रक्रिया (त्याला ऍनोईकिस anoikis असे म्हटले जाते.) रोखली जाते. त्याविषयी माहिती देताना नॉत्रे दॅम विद्यापीठातील कर्करोग जीवशास्त्र विषयातील संशोधक झाचरी टी. शाफेर यांनी सांगितले, की कर्करोगाच्या पेशी ऍनोईकिस प्रक्रियेतून तग धरतात. पेशीबाह्य घटक वेगळे होण्याची क्रिया सर्वसाधारणपणे घडते.या वेगळ्या झालेल्या पेशी तग धरून राहण्यामागील यंत्रणा कशी कार्य करते, याविषयी अधिक माहिती उपलब्ध नव्हती. सामान्यपणे अलग झालेल्या पेशींच्या तग धरण्यासाठी पोषक विकरांचे कार्याची मदत होते. ही विकरे पेशींतील ऑक्सिडेटिव्ह ताण समतोल करण्यासोबतच अन्न पदार्थातील पोषक घटकांसारखे कार्य करतात.
या संशोधनामध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींच्या तग धरण्याच्या प्रक्रियेत पोषक विकरांच्या मुख्य भूमिका विषद करण्यात आली आहे. काही पोषक विकराची कार्यक्षमता कमी झाल्याने ट्युमर निर्मिती घटते. त्यामुळे विकरांना लक्ष्य करण्याची प्रक्रिया काही उपचारपद्धतीमध्ये वापर करता येईल.
जर्नल संदर्भ ः
C. A. Davison, S. M. Durbin, M. R. Thau, V. R. Zellmer, S. E. Chapman, J. Diener, C. Wathen, W. M. Leevy, Z. T. Schafer. Antioxidant Enzymes Mediate Survival of Breast Cancer Cells Deprived of Extracellular Matrix. Cancer Research, 2013; 73 (12): 3704 DOI: 10.1158/0008-5472.CAN-12-2482

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा