सोमवार, १ जुलै, २०१३

वनस्पतीही असतात गणितात हुशार

वनस्पतीही असतात गणितात हुशार

प्रकाश संश्लेषण सुरू नसताना जैविक क्रियेसाठी आवश्यक ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी वनस्पतींनाही काही गणिते करावी लागतात. ही गुंतागुंतीची गणिते वनस्पती सहजगत्या करत असल्याचे इंग्लंड येथील जॉन इनस सेंटरमधील मुलद्रव्यीय गणित या विषयातील संशोधक मार्टिन हार्वर्ड यांचे मत आहे. त्यासाठीची काही ठळक उदाहरणे त्यांनी मांडली आहेत.
गणित हा अनेक विद्यार्थ्यांसाठी घात विषय असतो. फारच कमी विद्यार्थांना गणितात गती असते. त्याहूनही फारच कमी लोकांना गणित आवडते. मात्र वनस्पती या गणितामध्ये हुशार असल्याचे इंग्लंड येथील जॉन इनस सेंटर येथील संशोधक मार्टिन हार्वर्ड यांचे मत आहे. वनस्पती आपल्या रात्रीच्या कामकाजासाठी आवश्यक अन्नाची योग्य तेवढीच निर्मिती करत असल्याचे त्यांनी सांगितले. आवश्यकता जाणण्यासाठी गुंतागुंतीची गणिते वनस्पती करू शकतात. स्टार्चच्या वापराचा दर उपलब्ध स्टार्च प्रमाणाशी त्या जुळवून घेतात. ज्या वेळी प्रकाश संश्लेषण सूरू नसते, तेव्हा या गणिती आकडेवारीची वनस्पतीना खुप गरज असते.
संशोधक मार्टिन हार्वर्ड यांनी सांगितले, की मुलभूत जैविक प्रक्रियेमध्ये गणिती प्रक्रियाचा वापराचे पहिलेच उदाहरण मिळाले आहे. रात्रीच्या वेळी पानामधील यंत्रणा स्टार्ट साठवणीचा आकार व त्या वेळपर्यंत झालेला वापर मोजतात. वेळेचा अचूक अंदाज वनस्पतींना त्यांच्या अंतर्गत जैविक घड्याळाद्वारे मिळतो. रात्रीच्या वेळी वनस्पतीच्या वाढीमध्ये कार्यरत असलेल्या या घटकांचा अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता असून भविष्यात त्याचा वापर उत्पादनामध्ये वाढ मिळवण्यासाठी करता येऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा