सोमवार, १ जुलै, २०१३

समुद्राच्या लाटांपासून विजेची निर्मिती

समुद्राच्या लाटांपासून विजेची निर्मिती
समुद्राच्या लाटामध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्या ऊर्जेचा वापर विजेच्या निर्मितीसाठी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. सुमद्रामध्ये लाटाच्या ऊर्जेचे रुपांतर विजेमध्ये करण्यासाठी विविध यंत्रणा पाण्यामध्ये उभारावी लागतात. त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा कस लागतो. मात्र एक खाजगी कंपनीने (ओसियन रिन्युएबल पॉवर कंपनी ) टिडजेन हे उपकरण विकसित केले असून अमेरिकेमध्ये उभारण्यात येत आहे. त्यातून 150 किलोवॉट ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे.

पाणी हे हवेपेक्षा 800 पट अधिक दाट असते. त्यामुळे त्यांचा पडणारा दाबही प्रचंड असतो. समुद्राच्या पाण्याच्या ऊर्जेचा वापर केल्यास प्रती वर्षे 1420 टेरा वॉट आवर्स इतकी वीज उपलब्ध होऊ शकते. सध्याच्या अमेरिच्या वीज वापराच्या एक तृतीअंश हे प्रमाण आहे.  गेल्या उन्हाळ्यामध्ये पहिले व्यावसायिक टिडजेन उपकरण मेन कॉबकुक बे या ठिकाण अमेरिकेमध्ये बसविण्यात आले आहे.  एक टिडजेन उपकरणापासून 150 किलोवॉट वीज तयार होते. मात्र येत्या तीन ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये याची क्षमता 5 मेगावॉट पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांने सांगितले.

असे आहे टिडजेन
- संशोधकांनी टिडजेन हे 98 फुट रुंद आणि 31 फूट उंच उपकरण बनविले आहे. त्यांच्या पट्ट्यांची खोली पाण्यामध्ये 60 आणि 150 फूट आहे.
-  चार टर्बाइनमध्ये एक कायमस्वरुपी चुंबक बसविण्यात आला असून तो 150 किलो वॉट ऊर्जा उत्पादित करतो.
- हेलिकल आकाराची टर्बाइन पातळ पत्र्यापासून तयार करण्यात आली असून ती एकाच दिशेने फिरतात.
- या उपकरणाला ऊर्जा आणि माहिती वाहण्यासाठी वायर जोडण्यात आल्या असून अन्य 24 टिडजेन उपकरणे एकमेकांशी जोडली आहेत.

तरंगत्या यंत्रणा
लाटामध्ये असलेली शक्ती ही विध्वंसक स्वरुपाची असल्याचे आजवर दिसून आले आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या ऊर्जा ग्राहक यंत्रणा फेकून दिल्या जातात. त्यासाठी या यंत्रणा उभारणी हे आव्हान ठरते. लंडन येथील 40 साऊथ एनर्जी हा वेव्ह एनर्जी कन्व्हर्टर मुद्दामहून तरंगता तयार करण्यात आला आहे. तो स्वयंचलितपणे सतत पाण्याच्या लाटाच्या योग्य पातळीवर राहतो. तसेच त्यावरील जनरेटर पाण्याच्या वरती राहतात. या प्रकारच्या यंत्राची 150 किलोवॉट क्षमतेची व्यावसायिक यंत्रणा इटली येथील तुस्कानी येथे उभारण्यात येत आहे. या प्रकारच्या 2 मेगावॉट क्षमतेच्या यंत्रणा भारत, इटली आणि इंग्लंड येथे उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा