स्वस्त, सोपी स्वयंचलित अन्नद्रव्य व सिंचनाची प्रणाली विकसित
प्रणाली विविध भाषेत वापरणे शक्य
जगभरामध्ये हरितगृहाचा प्रवास संपुर्णपणे स्वयंचलित होण्याकडे सुरू आहे. मोठ्या कंपन्या आणि मोठी हरितगृहे या स्वयंचलितपणासाठी आवश्यक यंत्रणेचा भांडवली खर्च उचलू शकतात. लहान शेतकऱ्यांना हा खर्च पेलवत नाही. या यंत्रणा चालविण्यासाठी विशेष कौशल्य असण्याची आवश्यकता वाटते. त्यामुळे इच्छा असूनही फवारणी, खते देणे किंवा अन्य स्वयंचलित यंत्रणांचा वापर करता येत नाही. मात्र नेदरलॅंड येथील कंपनीने लहान शेतकऱ्यांना परवडेल आणि वापरण्यासाठी सोपे इंटरफेस असलेली स्वयंचलित सिंचन व अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. त्याला त्यांनी नाव दिले आहे फर्टिमिक्स गो.
सध्या बाजारामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या अनेक स्वयंचिलत यंत्रणा उपलब्ध आहेत. मात्र त्या वापरण्यासाठी काही किमान बाबी किंवा कौशल्यांची आवश्यकता असते. आशिया आणि आफ्रिकेतील कमी शिक्षीत लोकांसाठी या यंत्रणा किचकट ठरतात. त्यामुळे अनेक वेळा आर्थिकदृष्ट्या शक्य असूनही वापर टाळला जातो. या शेतकऱ्यांच्या अडचणीचा विचार करून हॉर्टी मॅक्स या कंपनीने कमी खर्चातील आणि वापरण्यास सोपे असलेली सिंचन प्रणाली विकसित केली आहे. त्या बाबत माहिती देताना कंपनीचे अर्जेन जनमात यांनी सांगितले, की बटन दाबा आणि चालू करा, अशी अत्यंत सोपी स्वयंचलित खते पिकापर्यंत पोचविण्याची प्रणाली तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्युतवाहकता आणि सामू मोजणारे संवेदक असलेली ही एक प्रमाणित खत मिश्रण टाकी आहे. त्यासोबत दहा घनमीटर क्षमतेचा पंप असून त्यावर चालणारे 32 व्हाल्व्ह आहेत. या सोबत आम्लांचा (ऍसीड) चे डोसिंग करणारा पंप आणि प्रकाशाच्या नियंत्रणासाठी अधिकचे पर्याय या यंत्रणेवर बसविता येतात. या प्रणालीद्वारे एकापेक्षा अधिक फर्टिगेशन युनिट चालवायेच असतील, तर कंट्रोलर एवेजी हॉर्टी मॅक्सी सीएक्स 500 सारख्या संगणकाचा वापर करावा लागतो.
विविध भाषामध्ये वापरता येते प्रणाली
- थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, चीन आणि भारतीय भाषांमध्ये स्वयंचलित प्रणालीच्या सुचना वापरता येतात.
- प्रति व्हॉल्व उचलले जाणारे पाणी स्वयंचलित प्रणालीद्वारे ठरवता येते. तसेच पाण्याचा इसी व पीएच ही ठरवता येतो.
- हरितगृहामध्ये योग्य प्रमाणात योग्य दर्जाचे पाणी पोचण्यासाठी अतिरिक्त इसी व पीएच चे संवेदक लावणे शक्य आहे.
- ही प्रणाली ऑगस्ट महिन्यामध्ये आशियातील बाजारात आणण्यात येणार असून, बॅकॉंक येथे झालेल्या हॉर्टी फेअरमध्ये लोकांनी या उत्पादनाविषयी उत्सुकता दाखवल्याचे जनमात यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा