शेतीमाल टिकविण्यासाठी फोटोकॅटलिसिस पद्धती अधिक उपयुक्त
साठवणीतील फळे व भाज्या टिकविण्यासाठी इथीलीन वायू तयार होणे रोखण्यासाठी फोटोकॅटलिसिस ही पद्धती अधिक उपयुक्त ठरत असल्याचे फ्रान्स येथील स्ट्रासबोर्ग विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या तुलनात्मक अभ्यासातून दिसून आले आहे.
भाज्या, फळांच्या पिकण्यासाठी कारणीभूत ठरणारा इथीलीन वायू मुळे वेगाने भाज्या व फळे पिकतात. त्यामुले लक्षावधी रुपयांचे नुकसान होते. त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे तयार झालेला शेतीमाल खाण्यासाठी वापरता येत नाही. फ्रान्स येथील स्ट्रासबोर्ग विद्यापीठातील रसायन आणि ऊर्जा प्रक्रिया संस्थेतील संशोधक निकोलस केलर आणि त्यांचे सहकारी मारी नोल्ले ड्यूकॅम्प, दीदीयर रॉब्रट आणि वेलेरी केलर यांनी या बाबत संशोधन केले आहे.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, काढणीनंतरही भाज्या किंवा फळे यांचे श्वसन सुरू असते. त्यांच्यामध्ये उथिलीन वायू तयार होतो. व हवेत सोडला जातो. हा वायू पिकण्याच्या किवा फुलांच्या बाबतीत फुलण्यासाठी उपयुक्त ठरतो. कच्ची फळे पिकवण्यासाठी आपण बऱ्याचवेळा फळे बंदिस्त जागेत किंवा हवाबंद ठिकाणी ठेवतो. मात्र हाच वायू फळे आणि भाज्या अधिक प्रमाणात पिकवून नासाडीला कारणीभूत ठरतो. विशेषतः साठवणीमध्ये किंवा प्रवासातील कंटेनरमध्ये इथीलीन वायूमुळे फळे, भाज्या अनावश्यकपणे पिकून खराब होतात. त्यामुळे इथीलीन वायूचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी सातत्याने संशोधन केले जाते. त्याच्या विविध पद्धतीही उपलब्ध आहेत. मात्र या पद्धतीपैकी चांगली व योग्य पद्धत शोधण्यासाठी केलर यांनी 300 पेक्षा अधिक संशोधनाचा पडताळा घेतला. तसेच त्यांचा तुलनात्मक अभ्यास केला. या अभ्यासाचे निष्कर्ष एसीएस जर्नल केमिकल रिव्ह्यूज मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
निष्कर्ष
- फोटोकॅटॅलिसीस ही पद्धती अधिक कार्यक्षम असल्याचे 300 पेक्षा अधिक संशोधनाच्या तुलनात्मक अभ्यासातून दिसून आले आहे. या पद्धतीमध्ये प्रकाश आणि उत्प्रेरकाचा एकत्रित वापर केला जातो. इथीलीन वायूचे रूपांतर कार्बन डाय- ऑक्साईड आणि पाण्यामध्ये केले जाते.
- या अभ्यासानुसार, फोटोकॅटॅलिसिस तंत्रज्ञानातून शेतीमालाची साठवणूक आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरते. सध्या वापरल्या जाणाऱ्या पद्धतीऐवजी फोटोकॅटॅलिसिस तंत्र अधिक उपयुक्त ठरू शकते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा