गोगलगायींचे नुकसान कमी करतात गांडूळे आणि वनस्पतींची विविधता
युरोपमध्ये गोगलगाय या अपृष्टवंशीय प्राण्यांमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पिकांची पान खाऊन त्यांची जाळी करून टाकतात. मात्र गोगलगायींची प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जमिनीतील गांडूळे व वनस्पतींची अधिक विविधता उपयुक्त ठरू शकत असल्याचे व्हियन्ना येथील नैसर्गिक स्रोत आणि जीवन शास्त्र विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. हे संशोधन बीएमसी इकॉलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
युरोप आणि जगभरच गोगलगायी या पहिल्या शंभर किडीपैकी एक नुकसानकारक कीड मानल्या जातात.
त्या पिकांच्या पानाचा फडशा पाडतात. यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासंदर्भात व्हियन्ना येथील नैसर्गिक स्रोत आणि जीवन शास्त्र विद्यापीठात संशोधन करण्यात आले. जमिनीमध्ये गांडुळांची संख्या अधिक व वनस्पतींची विविधता अधिक असल्यास गोगलगायींचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून आले आहे. या निष्कर्षाविषयी भाष्य करताना डॉ. जोहान झाल्लर म्हणाले, की यावरून दोन प्रक्रिया दिसून येतात. गांडुळामुळे पिकामध्ये नत्राची उपलब्धता वाढून पिकांची गोगलगायींसाठी प्रतिकारकता वाढत असावी. तसेच गोगलगायी यांना आपल्या खाद्यामध्ये विविधता आवश्यक असते. खाण्यामध्ये विविधता असल्याने एका वनस्पतीवरून दुसऱ्या वनस्पतीकडे त्या अधिक वेळा जातात. त्यामुळे वनस्पतींची विविधता असलेल्या ठिकाणी गोगलगायींच्या खाण्याचे प्रमाण कमी होते. वनस्पतींची अधिक विविधता ठेवत, गांडुळांची संख्या अधिक ठेवल्यास गोगलगायींमुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते. या दोन्ही घटकातील संबंधाविषयी अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. त्याचा लाभ पिकातील गोगलगायींची प्रादुर्भाव कमी होण्यासाठी होऊ शकतो.
प्रयोग आणि त्याचे निष्कर्ष ः
- संशोधकांनी मोठ्या इन्क्युबेटरमध्ये प्रयोग केले. या इन्क्युबेटरमध्ये गवताळ प्रदेशासारखे वातावरण तयार केले. वनस्पतींची विविधता, तसेच गोगलगायी आणि गांडूळांचा अंतर्भाव करण्याचा योग्य वेळ साधण्यासाठी इन्क्युटेरमधील प्रयोग फायद्याचे ठरले .
- जमिनीमध्ये गांडुळांचे प्रमाण अधिक असल्याने पिकांना उपलब्ध नत्राचे प्रमाण वाढले. त्यामुळे गोगलगायींमुळे होणाऱ्या नुकसानीमध्ये सुमारे 60 टक्के घट झाली.
- वनस्पतींची विविधता अधिक असताना गोगलगायींनी खालेल्या पानांच्या संख्येत विविधता कमी असण्यापेक्षा 40 टक्क्यांने घट झाल्याने आढळले आहे.
या गोगलगायीपासून होणारे पिकाचे नुकसान कमी करण्यासाठी त्या जमिनीमध्ये गांडूळाचे प्रमाण अधिक असल्यास फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.
जर्नल संदर्भ ः
Johann G Zaller, Myriam Parth, Ilona Szunyogh, Ines Semmelrock, Susanne Sochurek, Marcia Pinheiro, Thomas Frank and Thomas Drapela. Herbivory of an invasive slug is affected by earthworms and the composition of plant communities. BMC Ecology, 2013 (in press) [link]

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा