सोमवार, ३० एप्रिल, २०१२

एक बटन दाबा, थंड पेय मिळवा


विजेशिवाय द्रव थंड करणारा कॅन विकसित,
अमेरिकेतील खासगी उद्योगाचे पर्यावरणपूरक संशोधन
-----------
भारतासारख्या उष्ण देशामध्ये थंड पाणी किंवा शीतपेयांच्या विक्री आणि वाहतुकीसाठी शीतगहाच्या साखळीची आवश्यकता असते. मात्र त्यासाठी अधिक प्रमाणात भांडवली गुंतवणूकीची आवश्यकता असते. ग्रामीण भागामध्ये भारनियमनाचे प्रमाणही अधिक असल्याने शीतपेयांच्या साठवणीमध्ये अडचणी येतात. त्यावर अमेरिकेतील जोसेफ कंपनी इंटरनॅशनल या खासगी उद्योगाने मार्ग काढला आहे. त्यांनी जगातील पहिले स्वयंचलितपणे पेय थंड करणारे कॅन विकसित केले आहे. त्याची चाचणी नासा या संस्थेने घेतली असून त्याला कोणत्याही बाह्य रेफ्रिजरेशनची गरज नाही. अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया आणि लास वेगास येथील काही निवडक स्टोअरमध्ये या कॅनमधून एनर्जी ड्रीकचे वितरण करण्यात येणार आहे.

कोणत्याही प्रकारचे थंड पदार्थ मिळवण्यासाठी रेफ्रिजरेशन आणि विजेची आवश्यकता असते. विकसनशील देशामध्ये दुर्गम, ग्रामीण भागामध्ये नेमकी याची वानवा असल्याने थंड पदार्थ विक्री  व्यवस्था राबवण्यामध्ये अडचणी येतात. त्यावर जोसेफ कंपनी इंटरनॅशनल या उद्योगाने मार्ग काढला आहे. त्यांनी गेल्या 19 वर्षाच्या अथक संशोधनानंतर इपीए स्ट्रॅटोस्फेरीक मायक्रोकुल तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचे पेटंट आणि परवानाही कंपनीने मिळवला आहे.

असे आहे हे तंत्रज्ञान
या तंत्रज्ञानाविषयी माहिती देताना मिशेल जोसेफ यांनी सांगितले, की प्रत्येक कॅनच्या आतमध्ये आणखी एक उष्णता वाहक युनिट असते. त्यामध्ये नारळांच्या कवट्यापासून मिळवण्यात आलेल्या कार्बनचा वापर करण्यात आला आहे. हा सेंद्रीय घटक आहे. हवेतील कार्बनचे प्रदु्षण कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानाला 1998 साली युएस इपीए हे पारितोषिक मिळाले आहे.  या कॅनच्या खालील बाजूला एक बटन असते,  ते दाबले असता अंतर्गत भागातील कार्बन मोकळा होऊन रेफ्रिजरेशन यंत्रणेसारखे कार्य घडून येते. हे घडण्यासाठी कोणत्याही ऊर्जेची आवश्यकता नसते. तसेच हे पर्यावरणपूरक, सहज वापरता येण्याजोगे शाश्वत तंत्रज्ञान असल्याने शीतपेयाच्या उद्योगामध्ये क्रांती घडून येणार आहे.
----------
कॅनमधील द्रव आपोआप होईल थंड

औषधी घटकाच्या निर्मितीतील विकर ओळखण्यात यश


ग्लायसिऱहायझा या कुळातील वनस्पती औषधी घटकांनी परीपुर्ण असल्याने पारंपरिक औषधामध्ये त्यांचे स्थान  वादातीत आहे. या वनस्पतीमध्ये गुंतागुंतीचे विकराची (एन्झाइम्स) साखळी कार्यरत असते. हि विकरे ग्लायसिरायझीन हे मुलद्रव्य तयार करतात. हे मुलद्रव्य पदार्थांची गोडी वाढविण्यासाठी, पोटाच्या विकारमध्ये त्याचबरोबर विषाणू रोधक म्हणून काम करते. आता या औषधी घटकांची निर्मिती करण्यामध्ये महत्त्वाची भुमिका बजवणाऱ्या विकर शोधण्यात योकोहामा येथील रिकेन वनस्पती शास्त्र संस्थेच्या संशोधकांना यश आलेले आहे.
औषधी वनस्पती ग्लायसिरायझा मध्ये ग्लायससिरायझीनच्या जैविक संयोगाच्या प्रक्रियेबाबत संशोधकांची माहिती अपूर्ण होती. या वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या सायटोक्रोम पी 450 मोनो आॅक्सिजिनसस या विकराबाबत विशेषतः अधिक प्रमाणात संशोधन करण्यात येत होते. यापुर्वीच्या अभ्यासामध्ये या घटकांचे महत्त्व समजून आले होते. मात्र त्यांची कार्य प्रक्रिया समजून घेण्यासाठी रिकेन वनस्पतीशास्त्र संस्थेतील संशोधक काझुकी सैतो आणि तोशियुकीमुरानाका यांनी संशोधन केले आहे.  हे रसायन विकसित करण्याच्या प्रक्रियेचे आकलन झाल्याने भविष्यात  जैवतंत्रज्ञानाच्या साह्याने ग्लायसिऱ्हाटिनिक आम्लाच्या निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या संशोधनाचे निष्कर्ष प्लॅंट सेल या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

 या औषधीचे उपयोग
- ख्रिस्तपूर्व 2000 वर्षापूर्वीपासून प्राचीन औषधामध्ये ग्लायसिऱ्हायझाचा वापर केला जातो.

-घसा, नाक व श्वसन संस्थेसी संबंधित विकारावर या औषधाचा वापर केला जातो. त्यामध्ये सर्दी, खोकला, कफ, फ्लयू यांचा समावेश आहे. ताप किंवा ज्वर कमी करण्यासाठी उपयुक्त.  ताण कमी करणाऱ्या औषधामध्ये या घटकाचा वापर केला जातो.

रविवार, २९ एप्रिल, २०१२

अॅव्हीयन काॅलराने दहा हजार पक्षी मृत्यूमुखी

पाण्याच्या मर्यादित स्रोतामुळे पॅसिफिक फ्लायवे मध्ये वाढला काॅलराचा प्रादुर्भाव

पाण्याचे मर्यादित स्रोतामुळे अॅव्हीयन काॅलराच्या प्रादुर्भावात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. छायाचित्रात राॅसगुज पक्ष्यांचा थवा पाण्याच्या शोधात असताना.

अमेरिकेतली दक्षिण ओरेगाॅन आणि उत्तर कॅलिफोर्नियातील जंगलाच्या भागामध्ये पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने सुमारे दहा ते 15 हजार स्थलांतरीत पक्ष्यांचा अॅव्हीयन काॅलरा या रोगांच्या प्रादुर्भाव झाल्याने मृत्यूमुखी पडल्याचे वन्य जीव विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. या अॅव्हीय काॅलराचा प्रादुर्भावाचा मानवी आरोग्यावर परीणाम होत नसला तरी पाण्याच्या कमतरतेमुळे उद्भवलेला हा गेल्या दशकातील सर्वात मोठा प्रादुर्भाव असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. या पक्ष्यामध्ये स्नो गूज, अमेरिकन कूट, अमेरिकन विजन डक, पांढऱ्या मानेचा गीज, पिनटेल डक या सारख्या पक्ष्याचा समावेश आहे.

सुमारे 53 हजार सहाशे एकर क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्यामध्ये पाण्यासाठी तळे, वाहत्या पाण्याचे प्रवाह आणि गवताळ प्रदेश आहेत. त्यामुळे पक्ष्यांच्या रहिवास, घरडे करण्यासाठी तसेच खाद्यासाठी सुमारे 2 दशलक्ष पक्षी या विभागात आढळतात.त्यामुळे या स्थलांतरीत मार्गाला पॅसिफिक फ्लायवे असे म्हटले जाते.


या प्रदेशामध्ये येणाऱ्या पाण्याचे नियोजन तसेच धरणातील पाण्याचे नियोजन हे फेडरल रिक्लेमशन बोर्ड कडून केले जाते. मात्र या वर्षी जाणवत असलेल्या कमी पाण्याचा फटका पक्ष्यांना बसला आहे. पाण्याच्या मर्यादित स्रोतामुळे कमी जागेमध्ये अधिक पक्ष्यांचा रहिवास झाल्याने अॅव्हीयन काॅलराचा प्रसार वेगाने होण्यास मदत झाल्याचे अमेरिकन बर्ड काॅनझर्वेटिव्ह या पर्यावरण गटाचे मत आहे.

नॅनो तंत्रज्ञानाने वाढेल फळांची साठवणक्षमता



तमिळनाडू कृषि विद्यापीठात राबवणार दक्षिण आशिया फळ साठवण सुधारणा प्रकल्प

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फळ उत्पादक देश आहे. आंबा, केळी आणि अन्य काही फळांच्या बाबतीत भारत हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. मात्र उत्पादित केलेल्या फळांच्या सुमारे 40 टक्के फळे ही वाहतूक आणि साठवणीमध्ये खराब होतात. हे नुकसान रोखण्यासाठी तमिळनाडू कृषि विद्यापीठामध्ये नॅनो तंत्रज्ञानावर आधारित दक्षिण आशिया फळ साठवण सुधारणा हा दोन वर्षाचा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे तमिळनाडू कृषि विद्यापीठाचे कुलगुरू पी. मुरूगेसा भूपती यांनी सांगितले. ते कृषि विद्यापीठामध्ये अतिसुक्ष्म तंत्रज्ञान ( नॅनो तंत्रज्ञान) या विषयावर नुकत्याच झालेल्या कार्यशाळेमध्ये बोलत होते.

नॅनो तंत्रज्ञानाच्या वापरामधून फळांची साठवणक्षमता वाढवणे शक्य असून साठवण आणि वाहतूकिमध्ये होणारे फळांचे नुकसान रोखता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिसुक्ष्म शास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख के. एस. सुब्रमनीयन यांनी सांगितले, की कॅनडा येथील गुएल्फ विद्यापीठामध्ये वनस्पतीतील रसायनांचा वापर करून हेक्झानाॅल विकसित केले आहे. या घटकामुळे फळे आणि भाजीपाला अधिक काळापर्यंत चांगल्या दर्जेदार अवस्थेत साठवता येणे शक्य़ होते.तमिळनाडू कृषि विद्यापीठातील संशोधकांनी अति सुक्ष्म तंत्रज्ञानाच्या साह्याने विकसित केलेली फिल्म आणली आहे. या दोन्ही तंत्रज्ञानाच्या एकत्रिकरणाच्या साह्याने हेक्झानाॅल असलेली नॅनो फिल्म तयार करता येणे शक्य आहे. त्यामुळे फळांची साठवण मर्यादा वाढवता येईल. त्यातून सुमार तीस टक्के नुकसान कमी करणे शक्य होणार आहे. फळे आणि भाजीपाल्यांची निर्यात वाढल्यामुळे विक्रीमध्ये वाढ होऊन शेती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळणार आहे.
प्रथम या तंत्रज्ञानाचा वापर आंबा फळांसाठी करण्यात येणार असून त्याच्या यशस्वीतेनंतर अन्य फळासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येईल.  हेक्झानाॅल हे पर्यावरणपूरक घटक असून त्याला अमेरिकन अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक चाचण्यानंतर मान्यता दिलेली आहे.  हेक्झानाॅलचा वापर केळी किंवा नारळांच्या फळांपासून विकसित करण्यात आलेल्या अतिसूक्ष्म फिल्ममध्ये वापरण्यात येणार आहे. त्यामुळे हि फिल्म सहजपणे विघटित होऊ शकेल.

दक्षिण आशिया फळ साठवण सुधारणा या प्रकल्पासाठी कॅनडातील आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा संशोधन निधी (CIFSRF)यांनी आर्थिक साह्य दिले असून गुएल्फ विद्यापीठ व श्रीलंकामधील औद्योगिक तंत्रज्ञान संस्था (ITI)  यांच्यासह तमिळनाडू कृषी विद्यापीठामध्ये संयुक्तपणे राबवण्यात येणार आहे.

गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

पेशीतील क्षार ठरवतात वनस्पतीची अवर्षण प्रतिकारकता



कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन
-----
तापमान बदलाच्या काळामध्ये अनेक वनस्पतीच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे अवर्षणाची समस्याही उग्र रूप धारण करत आहे. त्यामध्ये कोणत्या प्रजातीच्या वनस्पती तग धरू शकतील, याबाबत लाॅस अॅन्जेलिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील (युसीएलए) संशोधकांनी संशोधन केले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष इकाॅलाॅजी लेटर्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

पर्यावरणातील अनेक वनस्पतींना वाढत्या तापमानामुळे येणाऱ्या अवर्षणांला सामोरे जावे लागत आहे. भविष्यामध्ये या प्रश्नांची तीव्रता वाढत जाणार आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक लाॅरेन सॅक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वनस्पतीच्या अवर्ष प्रतिकारकतेसाठी कारणीभूत घटकांयाबाबत मुलभूत संशोधन केले आहे. कोणत्या प्रकारच्या वनस्पती, झाडे व गवते ही या परीस्थितीमध्ये तगधरून राहू शकतील, त्यांमागील कारणांचा अभ्यास करण्यात आला आहे.
वनस्पतीमध्ये अवर्षणाशी सामना करण्याच्या दृष्टीने अनेक प्रणाली कार्यरत असतात. त्यातील कोणत्या वेळी कोणती प्रणाली ही अधिक उपयुक्त असू शकेल, याबाबत सातत्याने चर्चा चालू असतात. वनस्पतीतील अवर्षण प्रतिकारकता गुणधर्मासाठी कारणीभूत टगर ला2स पाॅईंट या गुणधर्माला केंद्रस्थानी ठेऊन हे संशोधन करण्यात आले. 

 सॅक यांनी सांगितले, की वनस्पती आणि प्राणी यांच्या पेशीमध्ये एक मुलभूत फरक असतो. वनस्पतीच्या पेशी या कार्यासाठी टरगर दाबावर अवलंबून असतात. हा दाब अंतर्गत क्षारयुक्त पाण्यामुळे तयार होत असून पेशी भित्तिकामधून पाणी पुढे ढकलण्याचे काम करतात. ज्यावेळी हवेतूल कार्बन डायआॅक्साईड घेण्यासाठी वनस्पतीच्या पानाची छिद्रे उघडली जातात, त्यावेळी पानातून वाफेच्या रुपामध्ये पाणी बाहेर पडते. पेशीतील पाणीकमी होऊन अंतर्गत दाबामध्ये घट होते. दुष्काळी परिस्थितीमध्ये जमीनीतून पाणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे पाण्याची होणारी घट भरून निघण्यामध्ये अडचण येते.  त्याचा परीणाम पानावर होऊन पाने पिवळी पडण्यास प्रारंभ होतो. वनस्पतीची वाढ थांबते.

वनस्पतीमध्ये अवर्षण प्रतिकारकता येण्यासाठी हा टरगर लाॅस पाईंट बदलण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पेशी जमीन कोरडी अशतानाही तो ताण सहन करू शकतील. ज्या वनस्पतीमध्ये हा बिंदू कमी असतो,त्या वनस्पतीमध्ये अधिक अवर्षण प्रतिकारकता असते.

...असे आहे संशोधन
- पेशीमधील क्षाराचे प्रमाणावर अवर्षण प्रतिकारकतेचे प्रमाण ठरत असल्याचे स्पष्ट होते. त्यासाठी गणिती सुत्राच्या साह्याने या प्रक्रियेतील तथ्याचा अभ्यास कऱण्यात आला. पेशीभित्तिकेची जाडीमुळे पिवळे पडण्याच्या, कुजण्याच्या प्रक्रियेवर कोणताही फरक पडत नाही. मात्र अति प्रमाणात आकुंचणापासून व अन्य किटकांच्या हल्ल्यापासून बचाव करणे शक्य होते. अशा जाड पेशीभित्तिकेच्या प्रजाती अवर्षणग्रस्त प्रदेशाबरोबरच अधिक पावसाच्या प्रदेशातही आढळून आल्या आहेत. म्हणजेच उत्क्रांतीमध्ये पानाचे नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने जाड पेशीभित्तिका कार्य करतात. अवर्षणाविरुद्ध नव्हे .
- या संशोधनात प्रथमच जगभरातील अवर्षण प्रतिकारक प्रजातीची माहिती गोळा करण्यात आली असून त्यांच्यावर या संशोधनाच्या निष्कर्षांची चाचणी घेण्यात आली आहे. पेशीमध्ये क्षाराची तीव्रता अधिक असल्यास पाणी रोखून धरण्याची क्षमता वाढत असून अवर्षणामध्ये त्याचा वनस्पतीला फायदा होतो.
---


गेल्या 11 वर्षातील सर्वात मोठ्या अवर्षणामध्ये सन 2010 -11 मध्ये हवाई जंगलामधील पिवळी पडलेली अलाही (Psydrax odorata) झाडाची पाने. ( स्रोत- फेथ इनमन- नारहरी)
------------------
जर्नल संदर्भ- Megan K. Bartlett, Christine Scoffoni, Lawren Sack. The determinants of leaf turgor loss point and prediction of drought tolerance of species and biomes: a global meta-analysis. Ecology Letters, 2012; 15 (5): 393 DOI:

जैवइंधऩासाठी स्कायलार्क आले धोक्यात



जैवइंधनासाठी बायोमास मिळवण्यासाठी पडीक जमिनींचा वापर वेगाने वाढत आहे. त्यामुळे मोकळ्या जमिनीवर रहिवास करणाऱ्या अनेक प्राणी , पक्षी व किटकांच्या प्रजाती धोक्यात येऊ शकतात. त्यामध्ये स्कायलार्क सारखे काही पक्षी जमिनीवर घरटी करून त्यात अंडी घालतात. त्यांच्या रहिवासासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने पक्ष्यांच्या प्रजननावर परीणाम होत असल्याचे जर्मनीतील हेल्महोल्टझ पर्यावरण संशोधन संस्थेने केलेल्या अभ्यासामध्ये पुढे आले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ग्लोबल चेंज बायोलाॅजी बायोएनर्जी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
स्कायलार्क हे पक्षी मोकळ्या माळरानावर जमिनीवर घरटी करून त्यात आपली अंडी घालतात. जैव इंधनाच्या आत्यंतिक गरजेपोटी पपडिक जमिनी लागवडीखाली आणण्यात येत आहेत. त्यामुळे या परीसरामध्ये माणसांचा वावर वाढला आहे. पक्ष्यांच्या प्रजननासाठी कमी जागा शिल्लक राहत आहे. विद्यापीठातील एंजल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्कायलार्कच्या रहिवासासाठी लागणारी कमीत कमी जागा किती असली पाहिजे, हे कळण्यासाठी पर्यावरणावर आधारीत एक संगणकिय प्रारुप विकसित केले आहे. त्याचा वापर करून जैवइंधन आणि पर्यावरणातील पक्षी,प्राणी, किटक यांच्या संवर्धनाचा मेळ घालण्याची आवश्यकता एंजल यांनी व्यक्त केली आहे.

त्सुनामीचा इशारा मिऴणार दहापट वेगाने



जीपीएस नेटवर्क व उपग्रहावर आधारीत अचूक इशारा पद्धती विकसित
------
उपग्रहाच्या मदतीने त्सुनामी व भुकंपाच्या धोक्याचा इषारा अधिक वेगाने उपलब्ध होऊ शकत असल्याचे नासा व वाॅसिग्टंन विद्यापीठ यांच्या संयुक्तपणे झालेल्या संशोधनात पुढे आले आहे.  रिडआय (READI ) नेटवर्क या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानामध्ये उपग्रहाच्या साह्याने जीपीएस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. हि प्रणाली अत्यंत वेगवान असून मार्च 2011 मध्ये जपानमध्ये झालेल्या भुकंप व त्सुनामीचा इशारा मिळण्यामध्ये जेवढा वेळ लागला होता,  त्याच्या दहापट कमी वेळेमध्ये इषारा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे जिवित हानी व वित्तहानी कमी करणे शक्य होणार आहे.

युएस पॅसिफिक नाॅर्थ ईस्ट जिओडेटीक अॅरे या जीपीएस च्या साह्याने उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया व ब्रिटिश कोलंबिया या दरम्यानच्या समुद्रामध्ये या तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. यामध्ये वापरण्यात आलेले सेन्सर हे प्रत्यक्ष प्रमाणवेळेनुसार जमिनीच्या होणाऱ्या हालचालीचा अंदाज जवळच्या कार्यालयाला देतात.

नुकत्याच सॅनदियागो येथील सेसमाॅलाॅजिकल सोसायटी आॅफ अमेरिका या संस्थेच्या बैठकीमध्ये माहिती देताना वाॅशिग्टंन विद्यापीठातील संशोधक टिम मेलबोर्न यांनी सांगितले, की जागतिक स्थान निर्धारण प्रणाली ( जीपीएस) पृथ्वीच्या थरामध्ये होणाऱ्या हालचालीचा अंदाज घेण्यासाठी 1980 साली प्रथम वापरण्यात आली होती. त्यामध्ये 2000 साली सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणामुळे अत्यंत अचूक माहिती उपलब्ध होण्यात मदत मिळणार आहे. जमिनीच्या थरामध्ये होणाऱ्या बदलाची नोंद प्रथम या भागात लावण्यात आलेल्या सेन्सरला मिळून त्यांच्याकडून सेकंदाच्या आत एक मेसेज कार्यालयाला पाठवण्यात येईल. सेकंदाच्या दहाव्या भागामध्ये ही माहिती कार्यालयाला उपलब्ध होऊन, भुकंपाच्या हादऱ्याची जागा  2 सेंटीमीटर इतक्या अचूकपणे कळणार आहे.

वेगवान व अत्यंत अचूक
बर्कले येथील भुकपमापन प्रयोगशाळेचे संचालक रिचर्ड अॅलन यांनी सांगितले, की अरोमा (कॅलीफोर्निया) मध्ये झालेल्या 3.5 क्षमतेचा भुकंपाची नोंद बर्कलेमध्ये  पारंपरिक सेसमोमीटरकडून 25 सेकंदामध्ये मिळाली होती. या पारंपरिक सेसमोमीटरला काही मर्यादा आहेत. 2 ते 6 रिश्चर स्केलपर्यंत हे चांगले काम करतात. मात्र 8 आणि 9 रिश्चर स्केलच्या भुकंपाची नोंद घेताना, त्यामध्ये अडचणी येतात. कारण मोठ्या भुकंपामध्ये अधिक काळापर्यंत जमिनी हादरत असते. जीपीएस प्रणालीमध्ये सेन्सर जमिनीवर विविध ठिकाणी एकाच वेळी नोंदी घेत असल्याने अचूक नोंदी मिळतात.

- मार्च 2011 मध्ये जपानमध्ये झालेल्या भुकंपाचा इशारा 8 सेकंदामध्ये मिळाला होता. 7.1 रिश्चर स्केल भुकंपाची तीव्रता दोन मिनिटात वाढून नंतर 8.1 रिश्चर स्केल दाखवण्यात आली. पुढच्या 9 रिश्चर स्केलच्या भुकंपाची नोंद होईतो 20 मिनीट लागले होते. मात्र भुकंपानंतर या भुकंपामुळे उठलेल्या त्सुनामीने जपानच्या किनाऱ्यावरती केवळ 30 मिनिटामध्ये धडक दिली होती. त्यामुळे लोकांना इशारा मिळून सावरण्यासही वेळ मिळाला नाही. या नव्या जीपीएस प्रणालीमुळे दहापट अधिक वेगाने म्हणजेच केवळ 2 मिनिटामध्ये 8 रिश्टर स्केलची नोंद होऊ शकते. त्यामुळे सावरण्यास अधिक अवधी मिळत असल्याने प्राणहानी व वित्त हानी रोखणे शक्य होऊ शकते.
हे संशोधन नेचर या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मातीची झीज मोजण्यासाठी सुधारीत प्रारूप विकसित



पावसामुळे किंवा अन्य कारणामुळे मातीची मोठ्या प्रमाणात झीज होत असते. मातीचा सुपीक थर वाहून गेल्याने शेतीचेही नुकसान होते. दरवर्षी मातीची किती झीज होते, याचे उत्तर मिळवण्यासाठी अमेरिकी कृषि विभागाने सुमारे 50 वर्षापुर्वी एक सुत्र विकसित केले होते. या सुत्राला युनिव्हर्सल साॅईल लाॅस इक्वेशन (USLE) असे म्हणतात.  त्यामध्ये संगणकिय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सक्षम असे मातीच्या झीजेविषयी माहिती देणारे प्रारूप अमेरिकेतील कृषि संशोधन संस्थेने विकसित केले आहे. या नव्या प्रारूपामध्ये मातीच्या नवीन प्रकाराचा तसेच झीजेच्या प्रक्रियेविषयी दरम्यानच्या कालावधीत झालेल्या संशोधनाचीही उपयोग करून घेण्यात आला आहे. 

मूळ युएसएलई च्या सूत्रानुसार, प्रति एकर प्रति वर्ष मातीची झीज काढण्यासाठी त्या वर्षामध्ये पडलेल्या पावसांच्या परीणामाचा तसेच वाहत्या पाण्याच्या परीणामाचा अभ्यास केला जातो. शेताची नांगरणी व अन्य मशागतीमुळे मातीची झीज मोठ्या प्रमाणात होत असते. त्याचाही विचार करण्यात येतो. त्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात येऊन त्याचे आरयुएसएलई व आरयुएसएलई2 असे दोन नवी प्रारुपे विकसित करण्यात आली आहेत. कृषि संशोधन संस्थेच्या आॅक्सफोर्ड- मिसिसिपी येथील जलसंधारण भौतिकी प्रक्रिया संशोधन विभागातील संशोधक सेथ डाबने यांच्या नेतृत्वाखाली आरयुएसएलई2 च्या सुधारणेसाठी निरीक्षणे व प्रक्रिया विज्ञानाचा वापर केला असून मातीची झीज मिळवणे शक्य होणार आहे.


...असे आहे सुधारीत प्रारूप

- या नवीन प्रारूपामध्ये कुरणामध्ये वाढणाऱ्या गवताच्या जीवनसाखळीचा तसेच त्या भागामध्ये चरण्यासाठी फिरणाऱ्या जनावरांच्या पॅटर्नचाही विचार करण्यात आला आहे. या सूत्राच्या साह्याने मातीची कमीत कमी झीज होईल अशा प्रकारे इथेनाॅल निर्मितीसाठी जास्तीत जास्त मिळू शकणाऱ्या बायोमासचाही अंदाज मिळू शकणार आहे.

- अमेरिकेतील हवामान व मातीच्या गुणधर्माचा या सुधारीत आरयुएसएलई2 मध्ये विचार करण्यात आला आहे. तसेच अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या 75 प्रकारच्या पिक व्यवस्थापन पद्धतीचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अधिक अचूकपणे मातीच्या झीजेची माहिती व अंदाज उपलब्ध होऊ शकणार आहेत.

- या प्रारूपाविषयीचे संशोधन अॅग्रीकल्चरल रिसर्च मॅगेझीन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
-----

फोटोओळ- पावसाच्या वाहत्या पाण्यामुळे दरवर्षी होणारी झीज या सुधारीत प्रारूपामुळे मोजणे शक्य होणार आहे. त्याचा मृदा संवर्धनासाठी फायदा होणार आहे. ( स्रोत- लेन बट्ट)

आसामात फुलतेय फुलपाखरांची दरी


कोषातून बाहेर पडत असलेली फुलपाखरे दाखवताना आसामी महिला
पर्यावरणातील फुलपाखरांच्या अनेक प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचा बचाव करण्यासोबत संवर्धन करण्यासाठी
आसाममधील नाॅर्थ ईस्ट इन्स्टीट्यूट आॅफ सायन्स अॅण्ड टेक्नाॅलाॅजी (NEIST) ही संस्था कार्यरत आहे.  आसामच्या गोलघाट जिल्ह्यातील फुलपाखरांच्या संवर्धनासाठी व प्रजननासाठी योग्य त्या वनस्पतीच्या लागवड आणि वाढीसाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे फुलपाखरांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

नुमलीगृह वसाहतीच्या परिसरामध्ये दरीमध्ये दियोपहार डोंगराच्या व कालिनी नदीच्या जवळील 30 एकर भागामध्ये ( प्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय पार्कच्या जवळ) अनेक प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आढळून येतात. या परीसरामध्ये त्यांच्या प्रजननाच्या दृष्टीने आवश्यक वनस्पतीची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील फुलपाखरांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या नेमख्या प्रजाती ओळखण्याच्या दृष्टीने नेस्टचे प्रयत्न चालू आहेत. त्या प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या संशोधिका दिपांजली साईकिया यांनी सांगितले, की फुलपाखरे आणि पंतगाच्या वाढीसाठी यजमान वनस्पतीच्या अधिकाधिक प्रजाती ओळखण्यात येत असून त्यामुळे कीटकांच्या रहिवासासाठी जगातील हे एक महत्त्वाचे ठिकाण बनुन जाईल. सध्या दरीमध्ये फुलपाखरांच्या फुलपाखरांच्या पाचही कुलातील 75 प्रजाती सापडतात. त्यांच्या प्रजननासाठी 60 हजर वनस्पती यजमान म्हणून कार्य करतात.

 प्रकल्पाबाबत माहिती देताना डाॅ. बारूआ यांनी सांगितले, की पुर्वी जाळ्यामध्ये अळ्या आणि फुलपाखरांच्या प्रजातींची वाढ करण्यात येत होती. मात्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार व आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन प्रमाणकांचा विचार करून ही पद्धत बंद करण्यात आली होती. जाळ्यांचा वापर थांबवल्यानंतर पक्ष्यांच्या खाद्यामध्ये या अळ्यांचा समावेश असल्याने काही अडचणी उद्भवल्या होत्या. त्यासाठी फुलपाखरांच्या यजमान वनस्पतीच्या वाढीचा शास्त्रीय अभ्यास व व्यवस्थापनाच्या माध्यमातून फुलपाखरांच्या संवर्धन करण्यात येत आहे. त्यासाठी विस्तृत स्वरुपाचा फुलपाखरांची दरी हा प्रकल्प पर्यावरणाच्या सुरक्षा, संवर्धनासाठी राबवला जात आहे. फुलापाखरांच्या संख्येत लक्षणीय प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

----
- फुलपाखरे पर्यावरणातील जीवनसाखळीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्यामुळे परागीकरण होत असल्याने अनेक वनस्पतीसाठीही महत्त्वाचे आहे. सध्या प्रयोगशाळेमध्ये किटकशास्त्रज्ञ फुलपाखरांच्या विविध प्रजातींची निरीक्षणे, अभ्यास व संसोधन करत आहेत या भागात आढळणाऱ्या सर्व फुलपाखरांच्या व पतंगाच्या जातीचे प्रदर्शनही या प्रयोगशाळेत मांडण्यात आले आहे.

-औषधी वनस्पतीची बाग स्मृतीबन या नावाने विकसित केली असून त्यात 5 हजार प्रजातींची लागवड केली आहे.नेस्टच्या औषधी व व्यावसायिक वनस्पती विभागातील संशोधक मान्तू भयन यांच्या नेतृत्वाखाली यजमान वनस्पतीसंदर्भात प्रकल्प राबवण्यात येत आहे.

रक्तातील ग्लुकोजचे नियंत्रण करते लाळ


अन्नाचे चर्वण करताना त्यात मिसळल्या जाणाऱ्या लाळेमुळे अन्न पचन करण्यामध्ये मदत होत असते, हे सर्वसामान्यानाही माहित आहे. मात्र लाळेमध्ये असलेल्या विकरामुळे ( एन्झाइम्स) रक्तातील ग्लुकोजचे नियंत्रण होत असल्याचे फिलाडेल्फिया (अमेरिका) येथील मोनेल केमिकल सेन्सस केंद्रातील संशोधकांना आढळले आहे.

लाळेमध्ये असलेल्या अमालाईज या विकराची अन्नातून मिळणाऱ्या स्टार्च घटकांच्या विघटनामध्ये महत्त्वाची भुमिका असते. अमालाईज घटकांचे प्रमाण अधिक असलेल्या व्यक्तीच्या रक्तामध्ये कमी ग्लुकोज असल्याचे दिसून आले आहे. अर्थात हे अमालाईज प्रमाण जनुकांच्या साह्याने नियंत्रित केले जात असल्याने प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळे असते. याबाबत बोलताना मोनेल संशोधन संस्थेतील संशोधक अबीगाईल मॅन्डेल यानी सांगतिले की, एकाच प्रकारच्या स्टार्चयुक्त अन्नासाठी दोन वेगळ्या व्यक्तीची प्रतिक्रिया ही वेगळी असून असते. ज्यांच्यामध्य अमालाईजचे प्रमाण अधिक असते, ते स्टार्चयुक्त अन्न वेगाने व चांगल्या प्रकारे पचन करू शकतात. त्याचबरोबर रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण समतोल राखणे त्यांना शक्य होते. याच्या नेमके विरुद्ध हे कमी अमालाईज असलेल्या व्यक्तीच्या बाबत आढळून आले आहे. हे संशोधन द ज्रनल आॅफ न्युट्रिशन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

असे असते लाळेतील अमालाइजचे कार्य
मानवी अन्नातील सुमारे 60 टक्के कॅलरी ऊर्जा ही गहू, मका, बटाटे, तांदूळ आणि अन्य धान्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या स्टार्चमधून उपलब्ध होते. लाळेमध्ये असलेल्या अमालाईज घटक स्टार्चचे रुपांतर हे साध्या साखरेमध्ये करून रक्तामध्ये शोषण्यास मदत करतात.

बुधवार, २५ एप्रिल, २०१२

गोलकृमीने दिले मेंढीला औषधी गुणधर्म


चीनमधील संशोधन,
अधिक मांसासाठी जनुकिय सुधारीत मेंढीचे क्लोन विकसित

एकाच पदार्थाच्या डिशमधून अनेक पदार्थाचे ह्रद्यरोगाविरोधी गुणधर्म उपलब्ध झाल्यास ह्रद्यरोगी पेशंटसाठी ते अधिक फायद्याचे ठरणार आहे. चीनमधील संशोधकांनी नैसर्गिकरित्या विविध वनस्पती, मासे आणि हिरव्या भाज्यातील ह्रद्यरोगासाठी प्रतिकारक असे गुणधर्म एकत्रित मिळवण्यासाठी मेंढीच्या जनुकामध्ये सुधारणा केल्या आहेत. ही सुधारणा करण्यासाठी गोलकृमीतील जनुकाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकारच्या मेंढ्याच्या मांसातून ह्रद्यरोगासाठी प्रतिकारक घटक एकाच वेळी उपलब्ध होणार आहेत.

सर्वसामान्यपणे आहारातून औषधी घटक जाण्यासाठी विविध प्रकारच्या अन्नाचा वापर करावा लागतो. त्यामध्येही विविध पथ्ये पाळावी लागतात. चांगल्या दर्जाचे व औषधी मांस उत्पादन करण्याच्या हेतूने चीनमधील संशोधक दू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असंपृक्त मेदाम्ले विकसित करण्याशी संबंधित जनुकाचे रोपण चीनी मेरिनो मेंढीच्या कानातून मिळवलेल्या दाता पेशीमध्ये करण्यात आले. या दातापेशीचे रोपण मेंढीच्या एका अंड्यामध्ये करून ते सरोगेट मेंढीच्या गर्भाशयामध्ये वाढवण्यात आले. या प्रक्रियेबाबत माहिती देताना संशोधक दू म्हणाले, की मानवी आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारी मेदाम्ले बनवणाऱ्या सी. इलेगन्स (C. elegans) या गोलकृमीतील जनुकांचा वापर मेंढीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे ही मेंढी अधिक व चांगल्या दर्जाचे मेदाम्ले तयार करते. तिच्यामध्ये मांसाचे प्रमाण अधिक असून अधिक अन्न निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः चिनमध्ये जगातील 22 टक्के लोक राहत असून केवळ 7 टक्के उपजाऊ जमीन असल्याने अधिक व दर्जेदार मांस निर्मिती करण्यासाठी जनुकिय सुधारीत पिके व प्राण्याच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. मात्र त्याचा वापर खाद्यासाठी करण्यात येणार असल्यामुळे अधिक काळजी घेण्यात येत असल्याचेही दू यांनी सांगितले. 
या संशोधनासाठी पीजीआय या संस्थेसोबत इन्स्टिट्यूट आॅफ जेनेटिक्स अॅण्ड डेव्हलपमेंटल बायोलाॅजी आणि शिहेझी विद्यापीठ यांनी एकत्रितरीत्या संशोधन करण्यात आले आहे.

पेंग पेंग ही जनुकिय सुधारित मेंढीचे पिल्लू, आपल्या सरोगेट आईसह

सी . इलेगन्स प्रजातीचे गोल कृमी. यांच्या गुणसुत्रातील जनुकांचे रोपण मेंढीमध्ये करण्यात आले आहे.



पेंग पेंग आहे सुदृढ
हि मेंढी क्लोंनिग प्रक्रियेने विकसित केली असून तिचे नाव पेंग पेंग असे ठेवण्यात आले आहे. या मेंढीचा जन्म 26 मार्च रोजी चीनमधील झिंन्जियांगच्या पश्चिमेतील प्रयोगशाळेमध्ये झाला असून या मेंढीचे वजन5.74 किलो आहे. तिची वाढ व्यवस्थित आणि साधारण मेंढ्यासारखी असल्याचे शेनझेन येथील बिजिंग जिनोमिकस इन्स्टिट्यूट (BGI) चे मुख्य संशोधक दू युताओ यांनी सांगितले.

बोअर पक्षी चक्क शेती करतात


आंतरराष्ट्रीय संशोधक गटाने प्रथमच उलगडले पक्ष्यांच्या शेतीचे रहस्य


ठिपक्‍याचा बोअर पक्षी ( Ptilonorhynchus maculata)
 अन्न मिळवण्यासाठी वनस्पतीची लागवड करणे, हे काही केवळ मानव प्राण्याचेच काम नाही, तर अनेक किटक पक्षी अन्न मिळविण्याच्या दृष्टीने विविध प्रकारची शेती करत असल्याचे या आधीही आढळून आले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाला प्रथमच बोअर पक्षी अन्नाशिवाय सजावटीसाठी फळांची शेती करत असल्याचे आढळून आले आहे. नर बोअर पक्षी त्यांच्या घरट्याशेजारी मोठ्या प्रमाणात फळे येणाऱ्या रोपांची वाढ करत असल्याचे दिसून आले आहे. ते हि फळांची वाढ त्यांच्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी करतात. हे संशोधन इंग्लंडमधील एक्सेटर विद्यापीठ, जर्मनीतील पोस्टडॅम विद्यापीठ व आॅस्ट्रेलियातील डिकिन आणि क्विन्सलॅंड विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रिततरित्या केले असून करंट बायोलाॅजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मानव शिकार सोडून हळूहळू शेतीकडे वळला आणि त्यांच्या राहणीमानामध्ये बदल होत जाऊन कुटूंबरचना अस्तित्वात आली असे मानले जाते. मानवाशिवाय अन्य सजीव हे अन्न मिळवण्याव्यतिरिक्त अन्य कारणासाठी शेती अथवा कोणत्याही प्रकारची लागवड करत नाहीत. मुंग्यासारखे काही किटक हे बॅक्टेरियाची वाढ खाद्यासाठी करतात. त्यामुळे बोअर पक्षी त्यांच्या घरट्याच्या परिसरामध्ये विविध फळांच्या पिकांची लागवड करून त्याचे अन्य पक्ष्यांसाठी प्रदर्शन करत असल्याचे निरीक्षणावर संशोधकांचाही प्रथम विश्वास बसला नाही. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने बोअर पक्ष्यांच्या वर्तनाचे गुढ उलगण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू करण्यात आले.

आॅस्ट्रेलिया व पापूआ न्यू जिनेवा या ठिकाणी आढळून येणारे बोअर पक्षी त्यांच्या घरटी सजवण्याच्या सवयीमुळे लोकप्रिय आहेत. घरटी सजवण्यासाठी नर पक्षी विविध प्रकारच्या गडद रंगाच्या वस्तू जमवित असतो. ज्याचे घरटे अधिक आकर्षक असते, त्या नराला जोडीदार मिळतो. मध्य क्विन्सलॅंडमधील टाऊंटन राष्टीय पार्कमध्ये बोअर पक्ष्यांच्या रहिवासाचे संशोधकांनी निरीक्षण केले असता, त्यांना या घरट्याच्या परिसरामध्ये सोलानम इलिप्टिकम, बटाटा या सारख्या अनेक रोपांची वाढ करण्यात आलेली दिसून आली. या रोपांना गडद जांभळ्या रंगाची फुले व हिरव्या रंगाची फळे येतात. विशेष म्हणजे हे पक्षी घरटी बांधण्यासाठी ही रोपे असलेली जागा निवडत नसून, त्यांच्या घरट्याभोवती या रोपांची लागवड करत असल्याचेही दिसून आले आहे. ज्या नर पक्ष्याच्या घरट्याजवळ अधिक प्रकारची फळे उपलब्ध असतील, त्याची निवड मादी पक्षी करत असतात.

या संशोधनाबाबत बोलताना डाॅ. जो मद्दान यांनी सांगितले, की मानव प्राणी अन्न आणि इतर अनेक कारणासाठी पिकांची लागवड करतो. कपडे बनवण्यासाठी कापूस, नशेसाठी तंबाकू किंवा अन्य पदार्थ या बरोबरच जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी गुलांबासारख्या अनेक फुलांची लागवड केली जाते. मात्र निसर्गामध्ये त्याचे हे एकमेवाद्वीतीयपणा बोअर पक्ष्यांच्या शेतीमुळे संपुष्टात आला आहे. या वनस्पती आणि बोअर पक्षी यांच्या सहजीवनाच्या पद्धतीचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.


अशी असते बोअर पक्ष्यांची फळ शेती
- घरट्याच्या जवळ बोअर पक्षी विविध प्रकारची फळे गोळा करतात. ती वाळल्यानंतर जवळच ती फोडली जातात. त्यातून बाहेर पडणाऱ्या बियामधून रोपे तयार होतात. त्यांच्या वाढीसाठी ही जागा पक्षी साफ ठेवतात. अन्य गवते व तणे या जागेमध्ये वाढू दिली जात नाहीत. नर पक्षी त्यांच्या घरट्याच्या परीसरामध्ये ही शेती सुमारे दहा वर्षापर्यंत करतात. त्यामुळे फळ झाडांच्या वाढीसाठी योग्य तेवढा कालावधी त्यांना उपलब्ध होतो.

- ज्या प्रमाणे शेतकरी चांगल्या दर्जाचे बियाणे तयार करण्यासाठी निवड पद्धतीचा वापर करतो. त्या प्रमाणे बोअर पक्षी मोठी फळे, अधिक गडद रंगाची, अधिक बिया असलेली फळे निवडतात. त्यांच्या शेतीतील फळांचा रंग हा अन्य ठिकाणी वाढलेल्या फळांपेक्षा अधिक गडद असतात.


फोटोओळ- जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी बोअर पक्षी फळांची लागवड करत असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे. (स्रोत- एक्सटर विद्यापीठ, इंग्लंड)

जर्नल संदर्भ-
Joah R. Madden, Caroline Dingle, Jess Isden, Janka Sparfeld, Anne W. Goldizen, John A. Endler. Male spotted bowerbirds propagate fruit for use in their sexual display. Current Biology, 2012; 22 (8): R264 DOI: 

केळी, नव्हे मोबाईल



आजही एखादी व्यक्ती मोठ्याने बोलत रस्त्यावरून जात असते, ब्ल्यू टूथ या उपकरणांच्या साह्याने ती अन्य कोणाशी तरी बोलत असते. खिशामध्ये मोबाईल असतो, तो दिसत नसल्याने फसगत होते. येत्या काही काळामध्ये केळी कानाशी धरून बोलताना व्यक्ती दिसल्यास नवल वाटून घेऊ नका. आगामी काळात इनव्होकड काॅम्प्यूटिंग या नवीन तंत्रज्ञानाच्या
 साह्याने कोणत्याही वस्तूच्या साह्याने किंवा वस्तूविनाही एकमेंकाशी संपर्क साधणे शक्य होणार आहे.
हे तंत्रज्ञान विकसित करणे व त्याचा प्रत्यक्षामध्ये वापर करण्यामध्ये जपानमधील टोकयो विद्यापीठ अग्रेसर आहे. आज आपला मोबाईल घरी विसरला तर दिवसभर अनेक कामे खोळंबून पडतात. मात्र क्लाऊड तंत्रज्ञानाच्या साह्याने आपण कोठूनही आपल्या घरचा मोबाईल वापरू शकतो. आपण संगणकासमोर बसलेलो असताना केळी किंवा कोणतीही वस्तू मोबाईलसारखी कानाला लावली की समोरचा संगणकाला समजेल की तुम्हाला फोन करायचा आहे. लगेच संगणक तशी व्यवस्था सुरू करून देईल आणि आपण कोणाशीही संपर्क साधू शकू. याबाबत माहिती देताना या संशोधनाचे मुख्य संशोधक अलेक्सिस झेराॅग म्हणाले की, आॅफिसमध्ये किंवा घरामध्ये विविध कोनामध्ये मायक्रोफोन आणि पॅराॅमेट्रीक स्पिकर बसवण्यात आलेले असतील, त्यामुळे केळीच काय पण कोणतीही वस्तू मोबाईलसारखी कानाला लावली असता संगणक या व्यवस्था सुरू करून आपली सोय करेल.

मंगळवार, २४ एप्रिल, २०१२

चुंबकिय लहरीचा पर्यावरणावर येतोय ताण



सेलफोनच्या चुंबकिय क्षेत्रामुळे सजीवाच्या अंतर्गत बदल होत असल्याचा केला दावा
पृथ्वी हे एक मोठे चुंबक आहे. तिला तिचे उत्तर दक्षिण अक्षही आहेत. त्याचे परिणाम पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्र व पर्यावरणावर होत असतात.  त्याचबरोबर मानवी तंत्रज्ञानामुळे विविध प्रकारच्या चंबकिय लहरीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचे परिणामाचा शरीरातंर्गत रसायनाच्या प्रतिक्रियेचा अभ्यास नेवाडा विद्यापीठातील संशोधक कार्लोस मोर्टिनो यांनी केला आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष नुकत्याच सॅन दियागो येथे झालेल्या एक्सपेरिमेंटल बायोलाॅजी 201च्या बैठकीमध्ये संशोधकांच्या समोर मांडले होते.

चुबंकिय क्षेत्र हे विविध प्रकारचे असतात. स्थिर चुबकिय क्षेत्र म्हणजे स्थिर चुंबके कायम स्वरूपी बाजूला असणे. पृथ्वीचे चुंकिय क्षेत्र हे क्वासी स्ट्ॅटिक म्हणजे कमी प्रमाणात बदलणारे असते. त्यानंतर विविध प्रकारच्या रेडिओलहरीचे क्षेत्र हे तीव्रता आणि वारंवारितेवर बदलणारे असते. मार्टिनो यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये कमी स्थिक चुबकिय क्षेत्राचे मानवी शरीरावर होणारे परिणाम तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये सेलफोन आणि अन्य प्रकारच्या चुंबकिय क्षेत्राचे परिणाम मानवी मेंदूच्या पेशीवर परिणाम होत असल्याचे आढळले आहे. अर्थात हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने सुरक्षिततेच्या प्रमाणकांपेक्षा कमी असले तरी भविष्यामध्ये त्याचा परिणाम वाढू शकतात. मार्टिनो यांनी प्राण्यावर या चुंबकिय क्षेत्राचे प्रयोग करण्यात आले आहेत. त्यामध्ये आॅक्सीजन मुलद्रव्याच्या उत्पादनामध्ये तसेच पेशीच्या वाढ आणि तग धरण्याच्या क्षमतेवर परिणाम होतात. कमी चुंबकिय क्षेत्रामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ वेगाने होत असल्याचेही त्यांना आढळून आले आहे.

शनिवार, २१ एप्रिल, २०१२

तेलावर तरंगते पाणी


--
आॅस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठात झाले पारंपरीक ज्ञानावर आधारीत नवे संशोधन

तेलाच्या तवंगामुळे होणारे सागरी जीवांचे मृत्यू रोखणे शक्य
--------

तेलावर पाणी तरंगू शकते, या पारंपरीक ज्ञानाचे अनेक फायदे होऊ शकतात. (स्रोत- एसीएस )
तेल पाण्यावर तरंगते, हे सर्वाना माहित असलेले सत्य आहे. त्यांची कारणेही शाळकरी वयापासून मुखोदगत केलेली असतात. मात्र हजारो वर्षापासून चालत आलेल्या पारंपरीक शास्त्राच्या आधारे आॅस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागामध्ये केलेल्या संशोधनात तेलावरही पाणी तंरगू शकत असल्याचे पुढे आले आहे.  या संशोधनाचे अनेक व्याहवारीक उपयोग होऊ शकत असल्याने हे संशोधन महत्त्वाचे आहे. सागरामध्ये जहाज बुडाल्याने, किंवा अन्य काही कारणामुळे तेलांची गळती झाल्यास सागरी जीव आणि माशांच्या जिवावर बेतू शकते. अशा प्रकारचे तेलाची सफाई करण्याच्या दृष्टीने हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. या संशोधनाचे निष्कर्ष एसीएस च्या लॅंगमूर या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहे.

सुमारे ख्रिस्तपूर्व 350 च्या काळामघ्ये ग्रीक विचारवंत अॅरिस्टाॅटल याने पाणी आणि तेल यांच्या घनतेच्या संदर्भात अनेक निष्कर्षे मांडून ठेवलेली आहेत. त्यावर संशोधक ची एम. फान, बेंजामीन अलेन, ल्युक पीटरस, थू एन. ली, मोसेस टडे यांनी सध्या प्रचलित असलेल्या घनतेच्या नियमाविषयी अधिक संशोधन केले आहे. अधिक घनतेच्या द्रवावर कमी घनतेचा द्रव हा तरंगतो. साधारणपणे क्रूड तेलाची घनता ही 58 पौंडस प्रती घन फूट अशी असल्याने ते 64 पौंडस प्रति घनफूट घनतेच्या सागरी पाण्यावर तरंगते. फान यांनी हे तथ्य संगणकिय प्रारुपाच्या साह्याने  प्रयोगशाळेमध्ये तपासले आहे. अनेक प्रकारे चाचण्या विविध प्रकारच्या तेलावर घेण्यात आलेल्या आहेत.

या सर्व पारंपरिक ज्ञानाबाबत अधिक संशोधन केल्यानंतर जलस्रोताचे तेलामुळे होणारे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने अधिक उपयोग होणार आहे. हे तेल एकदा पाण्यामध्ये बुडले की पाण्यातील तेलाचे विघटन करणारे सुक्ष्म जीव अधिक वेगाने त्यांचे विघटन करू शकतील.  त्यामुळे पाणी आणि तेल यांच्या मिश्रणाच्या जैविक विघटनातून तेलाचे प्रदूषण कमी करणे शक्य होणार असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

...असे आहे संशोधन



-काहीवेळेस पारंपरीक ज्ञान हे चुकिचे असल्याचे दिसून आले तरी ज्या वेळी अधिक तेलामध्ये पाण्याचा कमी प्रमाणातील थेंब तरंगत असल्याचे दिसून आले आहे. अर्थात हे तेलाचा प्रकार, थेंबाचा आकार या सारख्या अनेक घटकांवर ही बाब अवलंबून आहे.


- वनस्पती तेलामध्ये पृष्टभागाचा ताण हा योग्य प्रमाणात असल्याने दोन द्रवामध्ये पाण्याच्या थेंबाचे वजन पेलण्याची ताकद असल्याचे दिसून आले आहे. हे शुद्ध तेलामध्ये आढळत नाही.  वनस्पती तेलामध्येही पाण्याच्या थेंबाचा आकार हा एक शतांश घन इंच या पेक्षा अधिक असता कामा नये.

सु्र्य देणार द्रवरूप इंधन




सौर ऊर्जेचे रूपांतर सरळ द्रवरूप इंधनामध्ये करण्यासाठी बायोरिअॅक्टर विकसित
-------
 फोटोव्होल्टाईक ेसलपासून मिळवलेल्या ऊर्जेचे रूपांतर द्रवरूप इंधऩामध्ये करण्यासाठी वापरण्यात आलेला बायोरिअॅक्टर (स्रोत - हान ली)

सौर ऊर्जेपासून विद्यूत ऊर्जा उपलब्ध होऊ शकते, हे माहिती आहे. मात्र सौर ऊर्जेपासून सरळ गॅसोलिनसारखे द्रवरूप इंधन मिळवणे शक्य असल्याचे संशोधन लाॅस एन्जेलिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक जेम्स लियो यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी जनुकीय सुधारीत सुक्ष्म जीवांचा वापर केला आहे. त्यामुळे सौर ऊर्जा आणि द्रवरूप इंधनाचा वापर करणारे हायब्रीड बायोइलेक्ट्रीक यंत्रणा राबवणे शक्य होणार आहे.

विद्यूत ऊर्जेचे रूपांतर द्रवरूप इंधनामध्ये करण्यासाठी लियो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मातीमध्ये आढळणाऱ्या सूक्ष्म जीवांवर लक्ष केंद्रित केले होते. हे सूक्ष्म जीव स्वतःच्या वाढीसाठी ऊर्जा म्हणून हायड्रोजनचा वापर करून कार्बन डायआॅक्साईड तयार करतात. अनेक औद्योगिक प्रकल्पामध्ये विविध प्रक्रिया करण्यासाठी या प्रकारच्या सूक्ष्म जिवांचा वापर गेल्या काही वर्षापासून वाढला आहे. लियो यांनी वापरलेल्या बायोरिअक्टरमध्ये जनुकीय सुधारीत सुक्ष्म जीव आर, इट्रोफा (R. eutropha), कार्बन डाय आॅक्साईड आणि हायड्रोजन असते. त्यामध्ये इलेक्ट्रोडच्या माध्यमातून विद्यूत ऊर्जेचे वहन केले जाते. या वाहत्या विद्यूत ऊर्जेमुळे रासायनिक क्रिया घडण्यास सुरूवात होतात. त्यासाठी कार्बन डायआॅक्साईडच्या अणूचे हायड्रोजनच्या अणूशी नवे आयन तयार होते. या हायड्रोजन,फाॅरमेट, आयनाचा वापर आर. इट्रोफा त्यांच्या वाढीसाठी करतात. त्यातून कर्ब वायू व  ब्युटेनाॅल इंधन तयार होते.  या कर्बवायूवर पुनरप्रक्रिया करण्यात येते.


9 टक्के सौरऊर्जेचे रूपांतर शक्य
या संशोधनाबाबत माहिती देताना लियो म्हणाले की, या बायोरिअॅक्टरमध्ये सौर ऊर्जेपासून मिळालेल्या विद्यूत ऊर्जेचा वापर केला जातो. या बायोरिअॅक्टरमध्ये सुमारे 80 तासामध्ये प्रति लीटरमध्ये 140 मिलीग्रॅम  ब्युटेनाॅल उपलब्ध होते. सध्या हे प्रमाण कमी असले तरी याचा उपयोग द्रवरूप इंधऩाबरोबरच अन्य रसायने मिळवण्यासाठी होऊ शकतो.
सध्या सुर्यप्रकाशापासून केवळ 0.2 टक्के एवढीच ऊर्जा उपलब्ध होते. सर्वसामान्यपणे फोटव्होल्टाईक सेलमुळे 15 टक्के सुर्यप्रकाशाचे रुपांतर ऊर्जेमध्ये होते. या इलेक्ट्रोफ्युएल बायोरिअॅक्टर मधून 9 टक्केपर्यंत सुर्यप्रकाशाचे रुपांतर उर्जेमध्ये करणे शक्य आहे.

सौर ऊर्जेपासून द्रवरूप इंधन मिळवण्याच्या प्रकल्पाचे कल्पना चित्र

जैवविविधतेसाठी मादीच्या निवड पद्धतीवर झाला अभ्यास


आफ्रिकेतील व्हिक्टोरिया तलावातील माशांवर करण्यात आलेल्या अभ्यासात निवड पद्धती द्वारे मादी मासे जैवविविधतेत भर टाकतात. ( स्रोत- ओलो सीहाऊसेन)


नर माशांची निवड करण्याच्या माशांच्या मादीची निर्णय प्रक्रिया ही माशांच्या तग धरण्याच्या आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका निभावत आसल्याचे संशोधन पुढे आले आहे. हे संशोधन ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठ आणि आॅस्ट्रीयातील आंतरराष्ट्रीय उपयोजित विश्लेषण प्रणाली संस्थेतील (IIASA) संशोधकांनी केले आहे.
सर्वसाधारणपणे जैवविविधतेच्या अभ्यासात निसर्गाशी जुळवून गेण्याच्या प्राण्याच्या क्षमतेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. मात्र या संशोधनाच्या निमित्ताने प्रथमच प्रजातीतील प्रजननासाठी निवड पद्धतीचा त्या प्रजातीच्या तग धरण्याच्या क्षमतेवर होणारे दुरगामी परीणामाचा अभ्यास करण्यात आला. आंतर प्रजातीय प्रजननामुळे बेडूक, क्रिकेट किडे, नाकतोडे आणि मासे यांच्या प्रजातीत पर्यावरणाशी मिळतेजुळते घेण्याच्या क्षमतेत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

... असे आहे संशोधन
- संशोधनाबाबत माहिती देताना बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक लेईथन एमगोनिगल  यांनी सांगितले,  की केवळ पर्यावरणाशी जमवून घेण्याच्या वृत्तीतून जैवविविधतेच्या अनेक घटकांची उत्तरे मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र आमच्या प्रारूपामुळे एकाच  रहिवासात राहणआऱ्या दोन प्रजातीमध्ये संपर्क वाढून त्यांच्यामध्ये प्रजननाच्या शक्यता वाढतात.  पहिली शक्यता -  जेव्हा स्रोताची वाटप प्रमाणित नसते, त्यावेळी मादीचा गट प्रजननासाठी विविध पर्यायाचा अवलंब करत असून त्या द्वारे अधिक स्रोतापर्यत पोचण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी शक्यता-  माद्यांना त्यांच्या या निवड पद्धतीमुळे तग धरण्याच्या क्षमतेत गट होऊन त्याची किंमत चुकवावी लागते.
पाण्यात, गवताळ प्रदेशात किंवा अन्य रहिवासामध्ये खाद्याचे प्रमाण आणि अन्य स्रोताचे प्रमाण कधीही समान असत नाही,  त्यामुळे माद्या त्यांची प्रजाती पुढे नेण्याच्या उद्देशाने निवड पद्धती वापरतात, त्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करतात. मात्र त्यामुळे त्यांच्या प्रजातीच्या सीमा वाढण्यास मदत मिळते. यामध्येच जैवविविधतेमध्ये आजवर असलेल्या अनेक प्रश्नाची उत्तरे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे संशोधन नेचर या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
----
संदर्भ-
Leithen K. MH$Gonigle, Rupert Mazzucco, Sarah P. Otto, Ulf Dieckmann. Sexual selection enables long-term coexistence despite ecological equivalence. Nature, 2012; DOI: 

तापमान वाढीमुळे मंदावतेय गवताची वाढ



उत्तर अरिझोना विद्यापीठातील संशोधन

उत्तर ऍरिझोनामध्ये गेल्या दशकापासून गवताच्या वाढीवर तापमान वाढीच्या दुरगामी परीणामाचा अभ्यास करण्यात आला आहे. छायाचित्रात गवत कमी होत गेलेले दिसून येत आहे. (स्रोत- ऍरिझोना विद्यापीठ)
---
ओझोनच्या थरावर विविध मानवी प्रदुषणामुळे परीणाम होत आहेत. तापमानात वाढ होत असून हवामानातही अनेक विपरीत बदल होत आहेत. हवामानावर आधारीत असलेल्या अनेक वनस्पती, झाडे, जंगले आणि पर्यावरणावरही त्याचे परीणाम होत आहेत. हवामान बदलाचे वनस्पतीवर काय परीणाम होतात, याबाबत उत्तर अरिझोना विद्यापीठामध्ये संशोधन करण्यात आले आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे गवताच्या काही प्रजाती सुरवातीच्या काळात हिरव्या होत असल्या तरी त्यांच्या वाढीचा वेग मंदावत असल्याचे आढळून आले आहे. या संशोधऩाचे निष्कर्ष नेचर क्लायमेट चेंज या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित कऱण्यात आले आहे.
मानवी हव्यासामुळे पर्यावरणामध्ये प्रदुषण वाढत असून, जागतिक तापमानात वाढ होत आहे. त्याचे विविध प्राणी, वनस्पती यावर विपरीत परीणाम होत आहेत. त्याबाबत झालेल्या संशोधनाची माहिती देताना संशोधक झुवाॅटिंग वू यांनी सांगितले, की वातावरणामध्ये होत असलेल्या बदलात सुरवातीच्या काळामध्ये वनस्पतीच्या वाढीला वेग मिळत अशला तरी पुढच्या काळामध्ये वाढीचा वेग मदावत असल्याचा पॅटर्न दिसून आला आहे.

असे झाले संशोधन
- उंचावर वाढणाऱ्या चार प्रकारच्या गवताच्या प्रजातीची लागवड ही मुद्दाम कमी उंचीवर केली. त्यांच्यामध्ये होत असलेल्या बदलांचा उंचीवरील गवताशी तुलणात्मक अभ्यास केला.
-अधिक काळापर्यंत उष्ण वातावरणामध्ये असलेल्या गवताच्या स्थानिक प्रजाती नष्ट होत असल्याचे आढळून आले.
- सुरवातीच्या काळात उष्ण वातावरणामुले नत्राची उपलब्धता वाढल्याने गवताच्या वाढीचा वेग वाढला. त्याचबरोबर हवेत नत्र वायूचे उत्सर्जनही वाढले, तसेचपावसाच्या पाण्याबरोबर नत्र वाहून गेल्याने पुढील काळामध्ये गवताच्या वाढीवर विपरीत परीणाम झाला.

शुक्रवार, २० एप्रिल, २०१२

अंड्याच्या साठवणीसाठी संगणकिय प्रारूप



सी डॅक संस्थेने विकसित केले संगणकिय प्रारूप------
पोल्ट्रीतील अंड्याची साठवणीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने तापमानाचे व्यवस्थापन अचूक करण्याची आवश्यकता असते. त्याचवेली अंड्याचे तापमानाबाबतचे अंदाज मिळण्याचीही आवस्यकता असते. हे अंड्यांच्या तापमानाचा अंदाज उपलब्ध करण्यासाठी सी-डॅक या संस्थेने संगणकीय प्रारुप विकसित केले आहे. त्यामुळे अंड्यामध्ये वाढणाऱ्या हानीकारक जिवाणूंची वाढ रोखणे शक्य होणार आहे.
कोंबड्यांनी अंडी घातल्यानंतर त्याची साढवणूक करताना त्याचे तापमान 7 अंश सेल्सियस ठेवण्यात येते. या तापमानाला सॅलमोनेलासारख्या हानीकारक जिवाणूंना रोखणे शक्य होते. मात्र देशामध्ये अंडी साठवणीच्या सुविधा फारशा उपलब्ध नसल्याने अंड्यांची साठवणूकीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
साठवणूकिमध्ये अंड्याचे तापमानाचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने सी- डॅक या संस्थेने अंड्याच्या तापमानाचा अंदाज आणि त्यावेळी त्यामध्ये होऊ शकणाऱ्या जिवाणूंच्या प्रादुर्भावासंदर्भात माहिती देणारे प्रारुप विकसित केले आहे. या प्रारूपाला काॅम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स माॅडेल  असे नांव देण्यात आले आहे.  याबाबत माहिती देताना सी- डॅकमधील समन्वयक विकास कुमार यांनी अॅग्रोवनशी बोलताना सांगितले, की अंड्याच्या तापमान व्यवस्थापन करताना हवेचा वेग, हवेचे तापमान तसेच अंड्यांच्या अंतर्गतचे तापमान अशा अनेक प्रकारच्या प्राथमिक माहितीची आवश्यकता असते. या प्राथमिक माहितीवर गणिती प्रक्रिया करून अंड्यांच्या आतील भागातील तापमान मिळवण्यासाठी या प्रारूप उपयुक्त ठरणार आहे. तसेच या तापमानाला होऊ शकणारा संभाव्य जिवाणूचा प्रादुर्भावही ओळखणे शक्य होणार आहे. त्यामुळे अंड्यांच्या साठवणूकीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे प्रारूप महत्त्वाचे ठरणार आहे.
हे संशोधन अमेरिकन कृषि विभागाच्या अन्न सुरक्षितता आणि निरीक्षण सेवा (FSIS) या प्रकल्पासाठी नेब्रास्का विद्यापीठाशी संलग्नपणे करण्यात आले असून जर्नल आॅफ फूड इंजिनियरींग या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 
----
हे संशोधन जरी अमेरिकेतील परिस्थितीनुसार करण्यात आले असले तरी भारतातही याचा वापर करणे शक्य होणार आहे. भारतात अंड्यासाठी साठवणीसाठी सध्या शास्त्रीय साठवणगृहे उपलब्ध नाहीत. मात्र अंडी साठवणीच्या दृष्टीने योग्य तापमान व्यवस्थापन करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.  सध्या अंडी हाताळणी व साठवणीच्या पद्धती याबाबत भारतामध्ये कडक कायदे नाहीत. या प्रारुपामुळे सुरक्षित अंडी ग्राहकांना उपलब्ध होण्यास मदत होणार असून अंड्यामार्फत होऊ शकणाऱ्या विविध प्रकारच्या विषबाधा टाळणे शक्य होणार आहे.
-----
संपर्कसाठी ईमेल- vikask@cdac.in
विकास कुमार- 020-25704175

गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

सुर्यप्रकाशासह लिंबाचा रस करेल पाणी शुद्ध



सोलर डिसइस्फेक्शन सह लिंबाचा रस अधिक फायदेशीर
---
बहुतांश पोटाचे विकार हे पाण्याच्या अशुद्धतेमुळे होतात. विकसनशील देशामध्ये ग्रामीण भागात शुद्ध पाणी मिळवण्यासाठी स्वस्त आणि सुलभ तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. केवळ सुर्यप्रकाश आणि लिंबाच्या वापराने पाणी शुद्ध करणे शक्य असल्याचे जाॅन हापकीनच्या ब्लुमबर्ग सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांच्या गटाने केलेल्या संशोधनात आढळले आहे.
पाण्यामध्ये लिंबाच्या रसाचा वापर करून सुर्याच्या तापमानावर पाण्याचे निर्जंतुकिकरण केल्या इ. कोलाय सारखे अनेक हानीकारक जीवाणू नष्ट होतात. या संशोधनाचे निष्कर्ष अमेरिकन जर्नल आॅफ ट्राॅपिकल मेडीसिन अॅण्ड हायजिन या संशोधनपत्रिकेच्या एप्रिलच्या अंकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
 जाॅन हाफकिन विद्यापीठाच्या ग्लोबल वाॅटर या प्रकल्पाचे संचालक व संशोधक केलाॅग स्क्वाॅब यांनी सांगितले की, पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करणे हा अनेक विकसनशील देशासाठी महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे. जागतिक दृष्ट्या विचार केल्यास अशुद्ध पाण्यामुले होणाऱ्या रोगामुळे दवाखान्यात भरती होणाऱ्या लोकांची संख्या ही एकूण रुग्नाच्या निम्मी आहे.
त्यामुळे युनिसेफ या लहान मुलासाठी कार्य करणाऱ्या जागतिक संस्थेने ,सुर्य प्रकाशाच्या साह्याने पाणी शुद्ध करण्याच्या पद्धतीची शिफारस केली आहे. या पद्धतीला सोडीस ( सोलर वाॅटर डिसइन्फेशन) असे म्हणतात. या पद्धतीमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून सहा तासासाठी सुर्यप्रकाशामध्ये ठेवण्यात येतात. ढगाळ वातावरण असताना हाच कालावधी वाढवून 48 तासापर्यंत ठेवण्यात येतात.  त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण होण्यास मदत मिळते.
 केलाॅग स्क्वाब आणि अॅलेक्झाडंर हार्डींग यांनी केलेल्या संशोधनाचे प्राथमिक निष्कर्षानुसार,  सु्र्याच्या साह्याने पाण्याचे निर्जंतुकिकरण करताना त्यात लिंबाचा वापर केल्यास केवळ 30 मिनिटामध्ये इ. कोलायसारख्या हानीकारक जिवाणूच्या संख्येत वेगाने घट होते.ही पद्धत घरगुती पाणी उकळून घेण्यासारख्या अन्य पद्धतीपेक्षा स्वस्त पडते. त्याचबरोबर लिंबाच्या रसाचे प्रमाण हे 2 लिटर पाण्यामध्ये केवल 30 मिलीलीटर असल्याने पाण्याच्या चवीमध्येही फारसा फरक पडत नाही.
अनेक देशामध्ये पारंपरीक पद्धतीनुसार पाण्याच्या शुद्धीकरणासाठी लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. त्यात ही पद्धत टिटानियम आॅक्साईड किंवा हायड्रोजन पेराॅक्साईड या सारख्या रासायनिक घटकांच्या वापर करणाऱ्या पेक्षा सौर ऊर्जेचा वापर करणारी पद्धत अधिक उपयुक्त ठरणारी आहे.

 

सोमवार, १६ एप्रिल, २०१२

कृत्रिम प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी उत्प्रेरक विकसित



नैसर्गिक प्रकाश संश्लेषणाइतकाच वेग मिळणार कृत्रिमरीत्या,
स्विडन येथील संशोधकांचे संशोधन

---
स्टाॅकहोम (स्विडन) येथील राॅयल तंत्रज्ञान संस्थेच्या रसायनशास्त्र विभागातील संशोधकांनी मुलद्र्व्यीय उत्प्रेरक विकसित केला आहे. हा उत्प्रेरक पाण्याचे आॅक्सिडेशन करून त्याचे आॅक्सीजनमध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया वेगाने घडविण्यामध्ये मदत करतो.  निसर्गामध्ये वनस्पती सुर्यप्रकाशाचा वापर करून प्रकाशसंश्लेषण करताना जी प्रक्रिया राबवली जाते. त्या प्रकारे कृत्रिमरीत्या प्रकाश संश्लेषण करण्यासाठी संशोधक गेल्या तीस वर्षापासून संशोधन करत आहेत. सध्या या संशोधनामुळे नैसर्गिक वेगाने प्रकाश संश्लेषणाच्या वेगाने कृत्रिम प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडवून आणणे शक्य होणार आहे. तसेच आगामी काळामध्ये कृत्रिम प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवणेही संशोधकांना शक्य होणार आहे. भविष्यामध्ये सौर ऊर्जेचा व अन्य अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीच्या दृष्टीने हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

अन्न निर्मितीमध्ये प्रकाश संश्लेषण ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. ही क्रिया केवळ वनस्पतीमध्ये होते. हीच प्रक्रिया कृत्रिमरित्या करण्यासाठी अमेरिका, जपान आणि युरोपातील संशोधक गेल्या तीस वर्षापासून संशोधन करत आहेत. मात्र पाण्याची आॅक्सीडेशन प्रक्रियेचा त्यापासून विविध निष्कर्ष समोर आले आहेत. मात्र या कृत्रिम प्रक्रियेचा वेग कमी असल्याने कृत्रिमरित्या प्रकाशसंश्लेषण संशोधनामध्ये अडचणी येत आहेत. त्या अडचणी या संशोधऩानंतर कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती देताना संस्थेतील संशोधक लायचेंग सुन यांनी सांगितले, की आजवर झालेल्या संशोधनामध्ये कृत्रिम प्रकाश संश्लेषणाचा वेग हाच मुख्य अडसर होता. मात्र नैसर्गिक प्रकाश संश्लेषणाइतक्याच वेगाने प्रक्रिया घडविण्याच्या दृष्टीने मुलद्र्व्यीय उत्प्रेरक तयार करण्यात आला आहे. साधारणपणे नैसर्गिक प्रकाश संश्लेषणाचा वेग हा 100 ते 400 फेरे प्रति सेकंद असतो. संस्थेमध्ये वापरण्यात आलेल्या उत्प्रेरकामुळे कृत्रिम प्रकाश संश्लेषणामध्ये 300 फेरे प्रति सेंकद इतका वेग गाठणे शक्य झाले आहे. हा आजवरचा उच्चांक असल्याचेही सुन यांनी सांगितले.

या संशोधनासाठी वाॅलेनबर्ग फांऊडेंशन आणि स्विडिश एनर्जी एजन्सी यांच्याकडून आर्थिक साह्य मिळाले असून उप्पाला विद्यापीठ, स्टाॅकहोम विद्यापीठ यांच्यासह हे संशोधन संयुक्तरित्या करण्यात येत आहे. संशोधनाचे निष्कर्ष नेचर केमिस्ट्री या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

असे होतील संशोधनाचे फायदे
या संशोधनामुळे अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये अनेक नव्या शक्यता निर्माण होऊ शकतात.
- भविष्यात ज्या प्रदेशामध्ये सुर्यप्रकाश मुबलक आहे, अशा प्रदेशामध्ये हायड्रोजन या वायूची निर्मिती करणे शक्य होऊ शकते. किंवा त्यातून मोठ्या प्रमाणात विद्यूत ऊर्जा विकसित करणे शक्य आहे.
- कार्बन डायआॅक्साईडच्या रूपांतरातून मिथेनाॅलसारखी अनेक इंधने तयार करता येऊ शकतात.


जर्नल संदर्भ-
 Lele Duan, Fernando Bozoglian, Sukanta Mandal, Beverly Stewart, Timofei Privalov, Antoni Llobet, Licheng Sun. A molecular ruthenium catalyst with water-oxidation activity comparable to that of photosystem II. Nature Chemistry, 2012; DOI: 

अन्न सुरक्षिततेसाठी बुरशीजन्य रोग आटोक्यात ठेवण्याची आवश्यकता


---
हार्वर्ड विद्यापीठ व इपिरिएल काॅलेजमधील संशोधकांचा संशोधनात्मक अहवाल
-------------
जगातील पाच प्रमुख पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांना आटोक्यात ठेवल्यास अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होऊन सुमारे 600 दशलक्षपेक्षा अधिक लोकांच्या अन्नाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचा संशोधनात्मक अभ्यास पुढे आला आहे.
दरवर्षी भात, गहू, मका, बटाटे आणि सोयबीन या प्रमुख पिकावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगामुळे 125 दशलक्ष टन अन्नधान्याची नासाडी होते. इंग्लंडमधील आॅक्सफोर्ड विद्यापीठ आणि इपिरिअल काॅलेजच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. त्यामध्ये 75 टक्के केसेसमध्ये प्राणी आणि वनस्पतीमध्ये येणाऱ्या रोगांच्या काही प्रजाती आढळून येतात. त्यासाठी सध्या प्रचलित असलेल्या आणि भविष्यात येऊ घातलेल्या बुरशींचा सामना करण्याचे प्रयत्न करण्याची आवश्यकता वाढली आहे. त्यामुळे अन्न सुरक्षिततेबरोबर जैवविविधतेचे संवर्धन करणे शक्य होणार आहे. या अभ्यासाचा अहवाल नेचर या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.


अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
- प्रति वर्ष पाच प्रमुख पिकांचे बुरशीजन्य रोगामुळे होणारे नुकसान हे 6- अब्ज डाॅलर.
- सध्या विकसनशील देशातील 1.4  अब्ज लोक हे अन्नावर प्रति दिन 1.25 डाॅलर एवढाच खर्च करू शकतात. त्यामुळे त्यांना कमी प्रतीचे किंवा कॅलरी असलेले अन्न वापरावे लागते.
- राईस ब्लास्ट, सोयबीन रस्ट, गव्हातील स्टेम रस्ट, मक्यातील काॅर्न स्मट, बटाट्यातील लेट ब्लाईट या रोगामुळे केवळ उत्पादनावरच नाही, तर लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर विपरित परीणाम होतो. बुरशीमुळे झाडांच्या नासाडीतून हवेतील कर्बाच्या ग्रहणक्षमतेवर परीणाम होत असून 230 ते 580 मेगाटन वातावरणातील कर्बवायू ग्रहण करणे शक्य होत नाही. हे प्रमाण  एकूण कर्बाच्या 0.07 टक्के एवढे असून जागतिक तापमान वाढीमध्ये या घटकाचा महत्त्वाची भुमिका असते.
- बुरशीजन्य रोगामुळे उभयचर प्राणी, माश्या, समुद्री कासवे, प्रवाळ यांच्या  सुमारे 500 प्रजाती धोक्यात आल्या आहेत. एकट्या अमेरिकेमध्ये वटवाघळामध्ये होणाऱ्या व्हाईट नोज सिंड्रोम या रोगामुळे मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने भातामधील अन्य किडीच्या प्रमाणात वाढ होऊन प्रति वर्ष सुमारे 3.7 अब्ज डाॅलर पेक्षा अधिक नुकसान होत आहे.
- बुरशीच्या वाढत्या प्रभावाविषयी इशारा देताना डाॅ. मॅथ्यू फिशर म्हणाले, की नवनवीन प्रकारच्या बुरशींच्या प्रादुर्भावामुळे वनस्पती, झाडे व प्राणी यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. जीवनप्रणालीमध्ये बुरशीच विजेता ठरण्याची हि चिन्हे आहेत. त्याकडे दुर्लक्ष न करता उपायोजना करण्याची आवश्यकता आहे.
- या अहवालामध्ये गेल्या शतकातील संदर्भ देत या प्रश्नाची तीव्रता आणि वाढते प्रमाण दाखवण्यात आले आहे.


जर्नल संदर्भ-
Matthew C. Fisher, Daniel. A. Henk, Cheryl J. Briggs, John S. Brownstein, Lawrence C. Madoff, Sarah L. McCraw, Sarah J. Gurr. Emerging fungal threats to animal, plant and ecosystem health. Nature, 2012; 484 (7393): 186 DOI: 

काश्मीरी शेतकऱ्याने बनवला जीवरक्षक कंदिल



कंदिलात वापरले मोशन सेन्सर
---
काश्मीरमधील शेतकऱ्याने बॅटरीवर चालणारा व 15 फूटाच्या परिसरातील मानवी हालचालीचा अलर्ट देणारा कंदिल विकसित केला आहे.  त्याच्या घराच्या परिसरात कोणत्याही माणसांची हालचाल आढळून आल्यास तो शेतकऱ्याला अलर्ट देतो. त्यामुळे शेतकरी सावध होऊ शकतो.  ही यंत्रणा अस्थीर वातावरणामध्ये कुटूंबातील लोकांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपुर्ण आहे.
काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी कारवाया होत असल्याने लोकांच्या जीवाला धोका असतो. एका बाजूला दहशतवादी, दुसऱ्या बाजूला लष्करातील लोक यांच्या एकमेकांविरूध्द चाललेल्या मोहिमा यामुळे काश्मीरमधील सर्वसामान्य लोकांसाठी धोका वाढतो.  या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागातील सागम गावातील अशिक्षीत शेतकऱ्यांने बॅटरीवर चालणारा एक कंदील विकसित केला आहे. या कंदिलामध्ये बसवण्यात आलेल्या सेन्सरमुळे  घराच्या परीसरात झालेल्या कोणत्याही मानवी हालचालीचा अलर्ट मिळतो.
कंदिलाचा होतो जिवरक्षणासाठी वापर काश्मीरमध्ये कंदील ही स्थानिक शेतकऱ्यांची ओळख आहे. रात्रीच्या वेळी फिरताना कंदिल सोबत नसल्यास लष्करातील आणि दहशतवादी गटाकडून अन्य गटाचा माणूस समजून मारले जाण्याचा धोका असतो. निरपराध असूनही केवळ कंदिलातील इंधन संपल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र साध्या कंदिलामध्ये इंधन संपण्याचा धोका असल्याने बॅटरीवर चालणारा कंदिल गुलाम मुहम्मद मीर या 48 वर्षीय शेतकऱ्याने विकसित केला आहे. त्यामध्ये मोशन सेन्सर बसवल्याने 15 फूटाच्या परीसरात असलेल्या माणसांविषयी अलर्ट देण्याचे कामही हा कंदिल करतो.  तसेच या कंदिलामध्ये रेडिओची सोयही करण्यात आलेली आहे. त्यामुळे गाणी ऐकत शेताकडे जाणाऱ्या मीरचे हे संशोधन नाविन्यपुर्ण उत्पादन आहे.



नाविन्यपुर्ण उत्पादनः
इलेक्ट्राॅनिक्समधील फारशी काही माहिती नसलेल्या मीरने विकसित केलेल्या या कंदिलाचे 20 नग तयार करून त्याने अन्य लोकांना विकले आहेत. त्यांत वापरलेल्या तंत्रानुसार या कंदिलांच्या किंमती 1600 रुपयापासून 2800 रुपयापर्यंत आहेत. या विषयी माहिती देताना ग्रासरूट इनोव्हेशन अॅण्ड आॅगमेंटेशन नेटवर्क (GIAN)चे तांत्रिक अधिकारी शाबिर अहमंद म्हणाले की, काश्मीरमध्ये ग्रामीण भागामध्ये सुमारे 80 टक्के लोक राहतात.पारंपरिक कंदिलामध्ये केलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. वेगळ्या प्रकारात पारंपरिक कंदिलांच्या जपणूकीचीही शक्यता वाढली आहे. मीर यांना अधिक चांगले तंत्रज्ञान व माहिती संस्थेमार्फत पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे या कंदिलाना चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
मीरचे स्वतःचा कंदिलाचा कारखाना काढण्याची इच्छा आहे. .योग्य त्या तांत्रिक सुधारणानंतर हा कंदिल ग्रामीण काश्मीरमध्ये अधिक लोकप्रिय होऊ शकेल, यात शंका नाही.

शनिवार, १४ एप्रिल, २०१२

हवेचे नमुने घेण्यासाठी लहान सेन्सर विकसित


---
उपग्रहासोबतच वातावरणाची माहिती मिळवण्यासाठी ठरतील उपयुक्त
अत्यंत लहान आकार, कमी वजन, स्वस्त, स्वयंचलित एअर सॅम्पलर प्रारुप
-----
वातावरणातील बाष्प आणि अन्य माहिती गोळा करण्यासाठी सेन्सरचा वापर केला जातो. देशभरातील माहिती अचूकपणे गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेन्सर आवश्यक असतात. मात्र सेन्सरची किंमत आणि त्यांचा मोठा आकार यामुळे त्यांची संख्या वाढवणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. पर्यायाने अचूक माहिती उपलब्ध होण्यामध्ये अडचण येते. मात्र आता अगदी लहान आकाराचे सेन्सर ( एअर सॅम्पलर) विकसित झाले आहेत. त्यांचा वापर केल्या संगणकिय प्रारूपांचा वापर करून हवामानातील बदलांविषयी अधिक माहिती गोळा करणे शक्य होणार आहे. हे संशोधन अमेरिकन भौतिकशास्त्र संस्थेच्या रिव्ह्युव्ह आॅफ सायंटिपिक इंनस्ट्रूमेंटस या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.


...असे असतात हे सॅम्पलर
 सॅण्डिया राष्ट्रीय प्रयोगशाळेतील संशोधक राॅन मॅन्जिनेल यांनी संशोधनाबाबत माहिती देताना सांगितले की, प्रक्षेत्रातील बाष्प आणि अन्य माहिती नोंदवण्यासाठी कानामध्ये घालण्याच्या  इअर प्लगइतके लहान आणि स्वस्त साधन विकसित करण्यात आले आहे. या सॅम्पलरमध्ये नमुने गोळा करण्यासाठी छोटा चेंबर असून सुक्ष्म अशा व्हाॅल्वच्या साह्याने वेगळा केलेला असतो. त्यामुळे सोल्डरिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या धातूप्रमाणे अॅलाॅय वापरलेले असते. जेव्हा तापमान वाढते, हे अॅलाॅय वितळते आणि वाहून आत जाण्यासाठी ठेवण्यात आलेल्या छिद्राचे तोंड बंद करते. पुन्हा  थंड हवा लागली असता, पुन्हा घट्ट होऊन आतमध्ये गेलेली हवा सीलबंद करते. त्यामुळे हवेचा नमुना गोळा करण्यासाठी हे तंत्र अत्यंत सोपे, स्वस्त आणि अचूक आहे.
कोणत्याही प्रकारच्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी मिळवण्यात आलेले नमुनेम महत्त्वाचे असतात. त्यामध्ये अन्य घटक मिसळले गेल्यास त्यांचे निष्कर्ष चूकिचे निघण्याचा संभव असतो. विशेषत हवा आणि वायूच्या नमुन्याच्या बाबतीत ही काऴजी घेणे आवश्यक असते.
सॅण्डिया फेज चेंज मायक्रो व्हाॅल्ह सेन्सर या नावाने ओळखले जाणारे हे सेन्सर वजनाला हलके, स्वस्त, कठीण आणि वापरणे व बांधणी करण्यास सोपे असे आहेत. अलास्का येथील प्रयोगसाळेमध्ये वातावरणातील नमुने गोळा करण्यासाठी बलूनच्या साह्याने यांचा वापर करण्यात येत आहे. उपग्रहाच्या मिळवण्यात येत असलेल्या माहितीसोबतच हवेचे नमुने व त्यांचे विश्लेषण केल्याने अधिक अचूक माहिती मिळवणे शक्य होणार आहे.

-------
सध्या वापरली जाणारी जुनी पद्धती
 सध्या ही माहिती मिळवण्यासाठी नासा आणि  राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय प्रशासन (एनओएए ) पारंपरिक व्हाल्व्हयुक्त साध्या फ्लास्कचा वापर करतात. योग्य त्या उंचीवर गेल्यानंतर हे प्लास्क उघडून लगेच बंद केले जातात.  हे साधारणपणे अर्ध्या लीटर आकाराचे असून व्हाल्व्हसह त्यांचे वजनही अधिक होते.


फोटो ओळी- सॅण्डिया सॅम्पलरस. अत्यंत अचूक वातावरणीय माहिती गोळा करण्यासाठी मायक्रो व्हाॅल्ह आणि सोल्डरींग कनेक्टरचा वापर केलेले सॅम्पलर उपयुक्त ठरणार आहेत. ( स्रोत- सॅण्डिया राष्ट्रीय प्रयोगशाळा)

जर्नल संदर्भ-
Ronald P. Manginell, Matthew W. Moorman, Jerome A. Rejent, Paul T. Vianco, Mark J. Grazier, Brian D. Wroblewski, Curtis D. Mowry, Komandoor E. Achyuthan. Invited Article: A materials investigation of a phase-change micro-valve for greenhouse gas collection and other potential applications. Review of Scientific Instruments, 2012; 83 (3): 031301 DOI: 

बबून माकडे स्पेलींग परीक्षेत झाली पास


सर्व मुलांच्या परीक्षा होऊन त्यांच्या शांळांना सुट्टी लागली आहे. ते आता निकालाची वाट पाहत आहेत. त्याचवेळी एक निकाल आला आहे, तो म्हणजे बबून माकडांचा. या माकडांना कोणतीही भाषा येत नसतानाही स्पेलींगच्या परीक्षेत अर्थपुर्ण शब्दांच्या गर्दीतून अर्थ नसलेले शब्द वेगळे करणे शक्य असल्याचे नाॅटिंगहॅम विद्यापीठातील ग्रॅहम राॅलिंगसन यांनी विद्यावाचस्पती (पीएचडी) साठी केलेल्या संशोधनात आढळून आले आहे.
भाषा तयार होत असताना त्यामध्ये शब्दातील अक्षरांच्या जागा ठरलेल्या असतात. शब्द लक्षात ठेवण्याच्या प्रत्येकांच्या तऱ्हाही वेगवेगळ्या असतात. काहीजण शब्दांच्या कडेची अक्षरे लक्षात ठेवतात, मात्र मधील अक्षरांबाबत त्यांचा गोंधळ उडतो.  अर्थपुर्ण शब्दातील अक्षरांचे स्थान ओळखणे हे केवळ मानवी मेंदूला शक्य असल्याचे मानले जात होते. मात्र आता त्यावर अधिक संशोधनाची गरज पुढे आली आहे.

भाषेचे ज्ञान नसेल, तर ...काला अक्षर भैंस बराबर

माणसांच्या बाबतीतही जर भाषेचे ज्ञान नसेल, तर अक्षरे म्हणजे हिंदीतील म्हणीप्रमाणे काला अक्षर भैंस बराबर अशीच स्थिती असते. नाॅटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांना बबून जातीच्या माकडांना इंग्रजी भाषेतील शब्द आणि अर्थ नसलेले शब्द यांच्या तील फरक ओळखण्यास शिकवले. त्यानंतर त्या भाषेविषयी काही ज्ञान नसलेल्या या माकडांनी अर्थ नसलेले शब्द वेगळे काढले. यामुळे नवीनच निष्कर्ष समोर आले आहेत.  मानवी मेंदू लिखित शब्द किंवा ऐकलेले शब्द याबाबत पुर्वीच्या अनुभवावर विसंबून राहत नाही. मेंदूमध्ये पर्यावरणातील पदार्थ ओळखण्यासाठी वेगळी यंत्रणा असली पाहिजे.

फ्रान्स येथील एक्स- मार्सिले विद्यापीठातीलजोनाथन ग्रेगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहा अक्षरी शब्दापासून चार अक्षरी शब्द वेगळे करण्याचे प्रशिक्षण बबून माकडांना दिले आहे. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी गहूच्या खाद्याचे बक्षिस देऊन केवळ दिड महिन्याच्या कालावधीत ही माकडे सुमारे 308 इंग्रजी खरे शब्द खोट्या शब्दापासून वेगळे करतात. त्यांच्या बरोबर उत्तराचे प्रमाण हे 75 टक्के आहे. हे संशोधन 13 एप्रिलच्या सायन्स या संशोधनपत्रिकेत प्रकाशित करण्यात आले आहे.

संशोधनातील महत्त्वाचे
- माकडांना या शब्दाचे अर्थ माहीत नाहीत. ते फक्त अक्षरांचे पॅटर्न वेगळे करू शकतात.
- ज्यावेळी अर्थहिन शब्द आणि अर्थपुर्ण शब्द यांच्यातील फरक नगण्य असे, त्यावेळी माकडाच्या चुकिचे प्रमाणही अधिक दिसून येते.
- भाषेच्या प्रक्रियेबाबात अभ्यास करणाऱ्या लंडन विद्यापीठातील राॅयल हाॅलोवे यांनी माकडांचे हे वर्तन वैशिष्टपुर्ण असल्याचे नमुद करून सांगितले, की केवळ दिसण्याच्या फरकावरून शब्दातील फरक ओळखणे अवघड असते. शब्दाचे उच्चारावर अनेक वेळा अर्थासाठी अवलंबले जाते. मात्र या संशोधनावरून उच्चाराचे केवळ साह्य होत असून ते गरजेचे असेलच असे नाही, हे पुढे आले आहे.

गुरुवार, १२ एप्रिल, २०१२

मधमाशा करतात औषधोपचार



साधारण आजारामध्ये आपण ज्या प्रमाणे स्वतः काही उपचार करण्याचा प्रयत्न करत असतो, त्या प्रमाणेच मधमाशाही त्यांच्या वसाहतीमध्ये येणाऱ्या बुरशी, हानीकारक जिवाणूच्या प्रादुर्भावापासून वसाहतीचे रक्षण करण्यासाठी प्रोपोलिस या बुरशी व जिवाणू विरोधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीचा वापर करत असल्याचे उत्तर कॅरोलिना विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. मधमाशाच्या वसाहतीमध्ये झालेल्या हानीकारक बुरशीवर स्वतः इलाज करत असल्याचे आढळले आहे.
मधमाशा आणि त्यांच्या वसाहतीतील नियोजनाबाबत सातत्याने संशोधन केले असते. या स्मार्ट कीटकांच्या सेल्फ मेडीकेशन बाबत प्रथमच अधिक विस्तरपुर्वक संशोधन अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना विद्यापीठातील किटकशास्त्र विभागातील संशोधन केले आहे. त्याबाबत माहिती देताना संशोधिका डाॅ. मिचेल सिमाॅन - फिनस्ट्राॅम यांनी सांगतिले, की विविध प्रकारे औषधी ठऱणाऱ्या वनस्पती गोळा करण्यासाठी कामकरी माशांची ऊर्जा आणि परीश्रम मोठ्या प्रमाणात वापरले जातात. मात्र यामुळे जंगली मधमाशांच्या वसाहतीसाठी अधिक आरोग्यपुर्ण जीवनाची हमी मिळत असल्याने अधिक फायदेशीर ठरते. हे संशोधन प्लाॅसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
- जंगली मधमाशाची पोळ्यामध्ये मेण आणि वनस्पतीचे अवशेष असल्याचे दिसून आले आहे. या वनस्पतीमध्ये बुरशी विरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्म असतात. साधारणपणे पोळ्यांच्यामध्ये असलेले तडे भरण्यासाठी वपारल्या जातात.मात्र बुरशीचा प्रादुर्बाव होण्याची शक्यता असल्याचे काळामध्ये संशोधकांना या प्रोपोलिस या बुरशीनाशक गुणधर्म असलेल्या वनस्पतीचे प्रमाण 45 टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्याचे आढळले आहे.
- मधमाशा हानीकारक बुरशी आणि उपयुक्त बुरशी यातील फरक ओळखू शकतात. ज्या वेळी उपयुक्त बुरशीचे प्रमाण वसाहतीमध्ये वाढले होते. त्याकाळामध्ये प्रोपोलिस वनस्पती आणण्यात आले नव्हते. त्याकाळामध्ये फक्त या बुरशींनी प्रादुर्भाव झालेल्या अळ्या, मधमाशांना माऱून बसाहतीच्या बाहेर टाकण्यात आले.  मधमाशा रोगग्रस्त अळ्यांना बाहेर काढण्याचे काम तर अविरत करत असतात मात्र त्याचे प्रमाण याकाळात वाढले होते.
-----
जर्नल संदर्भ-
Michael D. Simone-Finstrom, Marla Spivak. Increased Resin Collection after Parasite Challenge: A Case of Self-Medication in Honey Bees? PLoS ONE, 2012; 7 (3): e34601 DOI: 
- अर्थात या औषध पद्धतीच्या काही मर्यादा आहेत. अधिक प्रादुर्भाव असलेल्या काही प्रसंगामध्ये त्याचा फारसा उपयोग होत नाही. मधमाशी पालकांना मधमाशांच्या नैसर्गिक नियंत्रक उपचार प्रणालीविषयी जाणून घेण्याची अपेक्षा संशोधिका सिमाॅन फिनस्ट्राॅम यांनी व्यक्त केली आहे.

मंगळवार, १० एप्रिल, २०१२

दह्यामध्ये माशांचे तेल ठरेल आरोग्यदायी



-----
अनेक आरोग्यदक्ष लोकांना ह्द्याच्या चांगल्या आरोग्यासाठी एन 3 मेदाम्लांचा आहारात वापर वाढवण्याचा सल्ला डाॅक्टर देत असतात. नैसर्गिकरित्या ही मेदाम्ले माशांचे तेलव अन्य मत्स्य पदार्थामध्ये आढळतात. अमेरिकन हर्ट असोशिएशनने सांगितलेल्या प्रमाणात या मेदाम्लाचा वापर करणे शक्य होत नाही. व्हर्जिनिया टेक येथील संशोधकांनी त्याबाबत संशोधन केले असून दह्यामध्ये माशांच्या तेलाचा वापर करून त्याचा प्रति दिन आहारात वापर केल्यास अधिक फायदेशीर होत असल्याचे आढळले आहे. म्हणजेच सॅव्हरी स्वादाचे दही हे रोजच्या आहारात वापरल्यास ह्रद्यासाठी उपयुक्त ठरते. हे संशोधन डेअरी सायन्स या संशोधनपत्रिकेच्या एप्रिलच्या अंकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स, जीवनसत्त्वे, प्रथिने असल्याने त्याच्या माध्यमातून एन3 मेदाम्लाचा वाहक म्हणूनही त्याचा वापर करणे शक्य होणार आहे. याबाबत माहिती देताना व्हर्जिनिया टेक मधील अन्न शास्त्र आणि तंत्रज्ञान विभागातील संशोधिका सुसान इ. डंनकन यांनी सांगितले, की दह्यामध्ये माशांच्या तेलांचा वापर करून विविध गंध, स्वाद विकसित करण्यासाठी विविध प्रमाणात माशांचे तेल, लिंबाचा स्वाद, किंवा सॅव्हरी मिरचीचा स्वाद वापरून प्रयोग करण्यात आले आहेत. त्यात प्रति दिन आहारात आवश्यक असलेल्या 1 टक्के माशांचा तेलाचे प्रमाणाचाही विचार करण्यात आला.

संशोधनाचे निष्कर्ष थोडक्यात -
1. पुर्वी करण्यात आलेल्या प्रयोगामध्ये माशांच्या तेलाचा वापर केल्यानंतर दह्याला माशांचा तीव्र वास येत असे. हे कमी करण्यासाठी सहा तासाची प्रक्रिया करून त्यात लिंबू, मिरचीचा स्वाद वाढवण्यात आला.
2. 100 ग्राहकांवर या दह्याच्या पसंतीसंदर्भात चाचण्या केल्या असता, त्यातील 50 टक्के या दह्याला टोकांची पसंती दाखवली.39 टक्के लोक हे दही त्यांच्या रोजच्या आहारात वापरण्याच्या बाजूने होते. उरलेल्या लोकांनी या दह्यामध्ये गोडी नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.
3. दह्याच्या गुणधर्मामध्ये माशांच्या तेलाचे गुणधर्म वाढत असल्याने ह्द्यरोगाला दूर ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. त्यामुळे डेअरी उद्योगात नव्या फ्लेवरचे दही उपलब्ध होऊन त्याच्या विक्रीतून अधिक फायदा मिळणार असल्याचे डाॅ.डेनकेन यांनी सांगितले.


जर्नल संदर्भ-
 M. Rognlien, S.E. Duncan, S.F. OH$Keefe, W.N. Eigel. Consumer perception and sensory effect of oxidation in savory-flavored yogurt enriched with n-3 lipids. Journal of Dairy Science, 2012; 95 (4): 1690 DOI: 

सावधान, फळे घेऊन प्रवासास आहे मनाई!




फळमाशाचे प्रमाण हे ओल्या आणि आद्रतेच्या वातावरणामध्ये वाढत असते. आॅस्ट्रेलियातील क्विन्सलॅंड राज्यासह, नवीन दक्षिण वेल्स आणि विक्टोरिया विभागामध्ये फळबागामध्ये फळमाशांचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पार्श्वभूमीवर या कीडींना रोखण्यासाठी भाज्या व फळांच्या वाहतूकीवर कडक बंधने घालण्यात आली असून हे भाग अलग ठेवण्यात येत आहेत.
 मुरे व्हॅली सिट्रस या संस्थेचे कार्यकारी अधिकारी ह्युज फ्लिट यांनी सांगितले, की सुमारे 12 टक्के प्रवासी हे खाण्यासाठी घेतलेल्या ताज्या फळांसह प्रवास करतात. त्यातील फळमाशाचा प्रादुर्भाव असलेल्या फळच्या माध्यमातून त्याचा प्रवास दूरपर्यत होत असतो. त्यामुळे या विभागामध्ये प्रवाश्यांना फळे , भाज्यासोबत घेण्यास मनाई करण्यात येते. आवश्यकता भासल्यास येथून फले विकत घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सुचना देण्यात येत आहेत. त्या संदर्भात क्विन्सलॅंडमध्ये रस्त्यावर असे फलक दिसून येत आहेत.

सौर ऊर्जेमुळे तेलखाणीतून मिळते अधिक तेल

65 एकर क्षेत्रावर हेलिओस्ट्ॅट आरसे बसवून त्यापासून मनोऱ्यावर सुर्य किरणे एकत्रित केले जातात.

सौर ऊर्जेचा वापर जड तेल काढणीसाठी फायदेशीर ठरतो.

कॅलिफोर्नियामध्ये 1887 सालापासून क्रुड तेल बाहेर काढले जाते. हे तेल काढून घेतल्यानंतर  शिल्लक राहिलेले जड तेल काढण्यामध्ये अनेकअडचणी येतात.  ते अवघड असते. मात्र सुर्याच्या किरणाच्या एकत्रीत प्रभावाने (काॅन्सनट्रेटेड सोलर पाॅवर ) त्याची वाफ करून वितळवण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेले आहे. वितळलेले तेल पंपाच्या साह्याने काढणे सोपे जाते. त्याचे प्रात्यक्षिक नुकतेच जेरी लोमेक्स यांच्या कोयलिंगा आॅईल फिल्ड या कंपनीमध्ये घेण्यात आले आहे.
 या तंत्रज्ञानासाठी त्यानी 65 एकर क्षेत्रामध्ये 7000 हेलिओस्टॅट आरशांचा वापर केला असून त्या द्वारे सुर्याचा प्रकाशाचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रित सुर्यप्रकाशाचे ग्रहण करण्यासाठी 327 फूट उंचीचा टाॅवर उभारण्यात आला आहे. त्या टाॅवरच्या आतमध्ये पाण्याची 700 पौंड प्रती वर्ग इंच एवढ्या दाबाची वाफ तयार केली जाते. ती वाफ तेलाच्या क्षेत्रामध्ये हिट एक्सचेंजरच्या साह्याने फिरवली जाते. त्यामुले जड तेलाचे पंम्पीग करणे सोपे जाते. या यंत्रणेद्वारे प्रति तास 350 बॅरल तेल बाहेर काढण्यात येते. दिवसाकाठी 8 हजार बॅरल तेल बाहेर काढले जाते. त्यात 5 टक्केची वाढ झाल्याचेही लोमेक्स यांनी सांगितले.
--
आरशांची स्वच्छता
 तेल कंपन्याच्या परीसरात सातत्याने तेल उडत असल्याने हेलिओस्टॅट आरशांची स्वच्छता हाच खरा प्रश्न असल्याचे लोमेक्स यांनी सांगितले. सध्या आरसे स्वच्छ करण्यासाठी स्वयंचलित स्वच्छता यंत्राचा वापर करण्यात येत आहे.

उत्क्रांतीतील सहप्रवाशी नाहीत वनस्पती व कीटक



अरम कुलातील वनस्पती आणि स्करब कीटकाबाबत झाले झुरीच विद्यापीठात संशोधन
-
फुलांचे विविध रंग, आकार आणि गंध यामुळे त्याकडे विविध प्रकारचे कीटक आकर्षित होतात. कीटकांमुळे फुलातील परागाचे एक झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत वहन होते. त्यामुळे कीटक आणि वनस्पती या दोघाचाही फायदा होत असल्याने दोघामध्ये मोठ्या प्रमाणात सामजस्य असल्याचे संशोधकांचे मत होते. मात्र झुरीच विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञांनी अरम कुळातील फुलांमधील वासाचे आणि कीटकांच्या उत्क्रांतीमध्ये कोणतेही सामजस्य नसल्याचे समोर आले आहे.
बागेमधील फुलांवर येणाऱ्या माशा, पतंग, फुलपाखरे, मधमाश्याची ठिकाणे ठरलेली असतात. ती विशिष्ट प्रकारच्या फुलांना त्यांच्या वासामुळे , आकारामुळे, रंगामुळे प्राधान्य देत असतात. आतापर्यंत संशोधक असे मानत होते, की फुलांचा वास आणि कीटकांची आवड ही दोघांच्या एकत्रीत उत्क्रांतीचा एक भाग आहे. झुरीच विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ फ्लोरीयन स्चिस्टील यांनी अरम (arum family) कुळातील वनस्पती व त्यांवर परागीकरण करणाऱ्या स्कारब या कीटकांबाबत संशोधन केले आहे. त्यांना या कीटकामध्ये वनस्पतीशी संपर्क करण्यासाठी विविध रासायनिक गंधयुक्त घटक असल्याचे आढळले आहे. या कीटकामध्ये प्राचीन काळापासून हे घटक अस्तित्वात असल्याचेही त्यांच्या जनुकीय नमुन्याच्या चाचणीमधून समोर आले आहे. आजच्या कीटकाप्रमाणे हे कीटक अरम कुळातील वनस्पतीचे परागीकरण करत नव्हते. तर आजपासून 40 दशलक्ष वर्षापुल्री नामशेष झालेले अन्य एक कीटक जाती या फुलामध्ये पारगीकरण करण्याचे काम करत होती. त्यानंतरच्या उत्क्रांतीमध्ये अरम कुलातील वनस्पतींनी अधिक कार्यक्षमपणे पारगीकरण करण्यासाठी स्करब कीटकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक रासायनिक गंध विकसित केल्याचे आढळून आले आहे.
 हे संशोधन इव्हाल्युशन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
----

अमोरफोफलास कोनजॅक (Amorphophallus konjac)  रम कुलातील वनस्पती त्यांच्या तीव्र वासासाठी प्रसिद्ध आहेत.
(स्रोत-झुरीच विद्यापीठ)
ग्रीन स्क्रब बीटल, तीव्र वासाकडे आकर्षित होतात.
जर्नल संदर्भः Florian P. Schiestl, Stefan Dmotterl. he Evolution of Floral Scent and Olfactory Preferences in Pollinators: Coevolution or Pre-Existing Bias? Evolution, 2012; DOI

शहराच्या गोंगाटात वाढतोय चिमण्याचा आवाज


--
 शहरीकरणाचे पक्ष्यावर होताहेत विपरीत परीणाम
------
शहरातून चिमण्या कमी होत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांना जाणवत आहे. त्यातच शहरातील गजबजाट आणि गोंगाटामुळे चिमण्यांच्या आवाजाच्या पट्टीतही वाढ होत असल्याचे संशोधन अॅनिमल बीहेवियर च्या एप्रिलच्या अंकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये डेव्हीड लुथर व अन्य सहकाऱ्यांनी केलेल्या मॅसन जीवशास्त्रीय अभ्यासामध्ये ही बाब पुढे आली आहे.
पुर्वी सकाळच्या वेळी चिमण्याच्या नाजुक चिवचिवाटाने माणसांना जाग यायची. मात्र शहरीकरणांच्या जंजाळामध्ये अडकून माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. शहरातील गोंधळ, गजबजाट, कारचे कर्कश्श हाॅर्न यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होत आहे. या ध्वनी प्रदुषणाचे माणसांसोबतच अन्य पक्षी, प्राण्याच्या आरोग्यावर परीणाम होत आहेत. त्याबाबत ल्युथर यांच्यासोबत तुलाने विद्यापीठातील एलिझाबेथ डेरीबेरी यांनी अभ्यास केला आहे. शहराच्या परीसरामध्ये मानवासह राहणाऱ्या अनेक पक्षी आणि प्राण्याच्या वर्तणूकीमध्ये बदल होत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.
पक्षी त्यांच्या सहकाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी, जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी आपल्या आवाजाचा वापर करतात. मात्र शहरातील गोंगाटामुळे एकमेंकाप्रयंत आवाजा पोचत नसल्याने तो पोचवण्याच्या इराद्याने आवाजाची पट्टी वाढत असावी, या निष्कर्षापर्यंत संशोधक आले आहेत.

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

बदाम झाडाचे आयुष्य वाढवण्याचे तंत्रज्ञान विकसित

बदामाच्या झाडाचे नूतनीकरण करण्याचे प्रात्यक्षिक दाखवताना संशोधक
---
काश्मीर येथील सीआयटीएचचे संशोधन
----
काश्मीरमध्ये बदामाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. मात्र परदेशाशी तुलना करता भारतातील बदामाचे उत्पादन फार कमी आहे. त्याची अनेक कारणे आहेत. त्याबाबत अभ्यास करताना श्रीनगर येथील केंद्रीय समशीतोष्ण फळबाग विभागाचे संशोधक के, के. श्रीवास्तव यांनी सांगितले, की जुनी झाडे, पानांच्या संख्येचे अयोग्य नियोजन किंवा नियोजनच केले जात नाही, सिंचन आणि खतांचा वापर केला जात नाही ही काही प्रमुख कारणे आहेत. जुनी झाडे तोडून त्या जागी नवीन लागवड करायची , तर फळांचे उत्पादन येईर्यंत अधिक कालावधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर त्या घटकांचा मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे. जुन्या झाडाचे नुतणीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्रातील संशोधकांशी संशोधन केले आहे.
 याबाबत माहिती देताना केंद्राचे संचालक नजीर अहमद यांनी सांगितले, की बदामाच्या अनेक वर्षे जुनी झाडे ही उत्पादनाला कमी पडत जातात. त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी नुतणीकरण तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रामध्ये डिसेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये बदामाच्या झाडाच्या पहिल्या फांदीचे प्रुनींग करून त्यावर वारीस आणि परागीकरणासाठी प्राणयाझ या जातीचे टाॅप ग्राफ्टींग केले जाते.
नझीर अहमद, के. के. श्रीवास्तव, दिनेशकुमार, सुनिल कुमार भट या संशोधकांच्या गटाने हे तंत्र विकसित केले आहे.
कुमार म्हणाले की,  बदामाच्या बडगाम, पुलवामा, इस्लामाबाद ( अनंतनाग) या काश्मीरमधील बदामाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यामध्ये सध्या या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी या भागातील बदामाच्या झाडाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये अनेक झाडे ही 70 वर्षापेक्षा अधिक वयाची आढळली आहेत. साधारणपणे बदामाची झाडे 3- ते 40 वर्षे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतात. त्यानंतर त्यांचे उत्पादन कमी होत जाते. फळबाग संशोधन केंद्रामध्ये बदामाच्या उत्पादनवाढीसाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे घेतली जात असून शेतकऱ्यांसाठी हिंदी, इंग्रजी आणि उर्दूमध्ये माहितीपत्रके तयार करण्यात आली आहेत. सध्या या तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्यात येत आहेत.
-----
दृष्टीक्षेपात बदाम
  • -भारतामद्ये बदामाच्या लागवडीखाली सुमारे 23.81 हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापासून 17.23 मेट्रीक टन उत्पादन मिळते.
  • - भारतातील राज्यामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र व उत्पादन हे जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे.
  • - भारतातील बदामाची उत्पादकता 0.73 टन प्रति हेक्टर असून जगभरातील अन्य देशातील सरासरी उत्पादकता ही 1.5 टन प्रति हेक्टर इतकी आहे.

कर्नाटकातील शेतकऱ्याने सांभाळल्या आंब्याच्या 116 जाती



सफरचंदाच्या , द्राक्षाच्या स्वादाचेही आहेत आंबे
सईद गनी खान त्यांच्या आंब्याच्या शेतात आंबे दाखवताना

कर्नाटकातील सईड गनी खान यांच्या शेतामध्ये 116 जातीच्या आंब्याचे संवर्धन केले आहे. हे आंबे त्यांच्या शेतामध्ये सुमारे 150 वर्षापासून असून त्यात विविध प्रकारचे, वासाचे आकाराचे आंबे आहेत. त्यात काही आंब्याचा वास हा द्राक्षासारखा तर काहींचा सफरचंदासारखा आहे.
कर्नाटकातील किरूगवळू (ता. मळवली जि. मंड्या) गावामध्ये आंबा लागवडीचा इतिहास हा टिपू सुलतानच्या कारकिर्दीपासूनचा आहे. त्या कालामध्ये टिपू सुलतानने जगभरातून आंब्याच्या विविध जाती मागवून त्याची लागवड केली होती. या गावामध्ये सुमार े300 ते 400 जातीचे आंबे आढळत होते. मात्र गेल्या दोन दशकापासून सिंचनाच्या सुविधा वाढल्या. त्यामुळे अन्य पिकांच्या लागवडीसाठी आणि जळणासाठी आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात तोडण्यात आली. त्यामुळे आंब्यांच्या अनेक प्रजाती नाहिशा झाल्या. सध्या सईद गनी खान यांच्या 20 एकर क्षेत्रामध्ये 116 जातीच्या आंब्याची सेंद्रिय पद्धतीने निगा राखण्यात येते. या 116 जातीच्या जैवविविधतेसंबंधी माहिती आणि कागदपत्रे नवी दिल्लीतील राष्ट्रीय पीक जनुकीय स्रोत ब्युरो (NBPGR) यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी या आंब्यांचे नमुने घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

 या आहेत आंब्याच्या जाती
मांगामरी, पिखा आम, सेब का आम, मोसंबी का आम, आटे का आम, मोती का आम यासाऱख्या अनेक जाती त्यांच्या शेतात आहेत. त्यांच्या नावावरूनच त्यांच्या स्वादाचा आणि गंधाची माहिती मिळते. यातील अनेक जातींना दोन वर्षातून एकदा फळ मिळते. फळबाग विभागाच्या जैवतंत्रज्ञान केंद्राने यांची डीएनए फिंगर प्रिंटीग अाणि जनुकीय माहिती मिळवली असून प्रत्येक जात ही अन्य जातीपेक्षा विशेष असल्याचे सांगितले आहे.

रविवार, ८ एप्रिल, २०१२

वाळूच घडवेल स्वतः शिल्प




कणामध्ये कृत्रीम बुद्धीमत्ता विकसित करण्यामध्ये संशोधकांना प्राथमिक यश
------
वाळूच्या खोक्यामध्ये आपण एखादी वस्तू ठेवली आणि काही वेळानंतर त्या वस्तूची मोठ्या आकारात माॅडेल वाळूमध्ये तयार झाल्याचे दिसल्यास आपण चकीत होऊन जाऊ. एखाद्या जादूच्या खेळामध्ये किंवा सिनेमामधील एखादा प्रसंग पाहत आहोत की काय असे वाटेल. मात्र एमआयटी च्या संगणक शास्त्र आणि कृत्रिम बुद्धीमत्ता प्रयोगशाळेत सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पामध्ये यावर संशोधन केले जात असून भविष्यात वरील चित्र खरे ठरण्याची शक्यता आहे. या संशोधनाचे मे महिन्यामध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल काॅन्फरन्स आॅन रोबोटिक्स अॅण्ड अाॅटोमेशन मध्ये या हुश्शार वाळू चे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
सध्या विविध आकाराच्या वाळूबाबत चाचण्या घेण्यात येत आहेत.  10 मीलीमीटर एवढ्या मोठ्या आकाराचे कण वापरण्यात आले असून त्यामध्ये मायक्रोप्रोसेसर आणि चारही कडांना चुबकांची रचना केलेली आहे. त्यामुळे त्यांना दिलेल्या आज्ञांप्रमाणे ते विविध आकार धारण करू शकतात. संगणकांकडून मिळालेल्या आज्ञानुसार ते एकमेकांना चिटकून त्रिमितीय पदार्थ तयार करू शकणार आहेत.
...याला म्हणतात भिन्न स्थानिय बुद्धीमत्ता
प्रत्येक कणामध्ये बुद्धीमत्ता विकसित करणे या प्रकाराला भिन्न स्थानिय बुद्धीमत्ता (डिस्ट्रूबुटेड इन्टेलिजन्स) असे म्हटले जाते. त्यामध्ये प्रत्येक कणांमध्ये योग्य ती माहिती साढवणे , तिचा वापर एकमेकांशी संपर्कासाठी करणे यासाठी संख्याशास्त्राची मदत घेण्यात येते. अर्थात हेच स्रवात आव्हानात्मक काम होते. एमआयटी मधील संशोधिका डॅनियेला रूस व त्यांच्या विद्यार्थिनी केल गिलपिन यांनी या वाळूमागील तत्त्व विषद केले.

असे आहे संशोधन

- संशोधनासाठी प्रत्येक कण हा घनाकार असल्याचे गृहितक धऱून तिच्या आजुबाजूला असणाऱ्या आठ शेजारी कणांशी असलेले संबंध कसे असतील, यावर विचार करण्यात आला. त्यातील सर्वात टोकावर असलेल्या कणांना एक किंवा दोन शेजारी असणार नाहीत. एकदा या कणांची जागा निस्चित झाली की ते आपल्या शेजारी किती कण असतील, त्यांची जागा कोणत्या बाजूला असले, यावर नियंत्रण ठेवू शकतील. त्यामध्ये मुळ आकाराच्या किती पटीमध्ये माॅडेल तयार करायचे, हेही निश्चित केले जाईल.
- या कणांच्या प्रत्येक बाजूस इलेक्ट्रोपरमनंट मॅग्नेट या प्रकारचे चुंबक वापरण्यात आले आहेत. त्यामुले विद्यूत प्रवाहाच्या नियंत्रणाने चुंबकीय प्रभाव कमी किंवा वाढवणे शक्य असते. मात्र खरी स्मार्ट वाळू ही 10 मिलीमीटरपेक्षा लहान असलेले कणांचीच असणार आहे. त्याबाबत सांगताना हार्वर्ड विद्यापीठातील संशोधक राॅबर्ड वूड म्हणाले, की लहान आकारातून अनेक शक्यता तयार होतात. त्याचबरोबर हे कण शेजाऱ्यांशी संपर्क साधू शकतील, योग्य ती गणिते करून आपली जागा ठरवू शकतील. या साऱ्या संशोधनासाठी अभियांत्रिकी ज्ञानाच्या कक्षा अनेक प्रकारे रुदावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भविष्यात वाळूपासून एखादे शिल्प आपोआप तयार झाल्याचे दिसल्यास आश्चर्य राहणार नाही.