शनिवार, ७ एप्रिल, २०१२

प्राचीन काळच्या कापसावर झाले संशोधन


इंग्लंड येथील वारविक विद्यापीठातील जीवनशास्त्र महाविद्यालयातील संशोधक डाॅ. राॅबीन अलाबे यांनी इजिप्तमदील नाईल नदीच्या परीसरातील
कसर इब्रीम या ठिकाणी अाढळून आलेल्या प्राचीन काळातील कापसाबाबत संशोधन केले आहे.  त्यामध्ये प्राचीन काळच्या कृषी
क्षेत्रासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यामध्ये ुपयुक्त ठरणार आहे. त्यातून सध्या कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या तापमान बदल आणि
पाण्याच्या कमतरतेच्या आव्हानाचा सामना करण्यामध्ये मदत मिळणार आहे.
  प्राचीन काळातील रोपांसाठी सिक्वेन्सिग तंत्रज्ञानाचा प्रथमच करण्यात आला आसून उष्ण कटींबदीय प्रदेशामध्ये पुरातत्व
नमुन्याच्या चाचण्या घेण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.
- इजिप्त मधील कपाशीच्या प्राचीन जाती आणि सध्याच्या जातीमध्ये तुलना करण्यात आली. ही जात ओळखण्यात आली असून -
---------, ही जात दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या ------- या जातीशी साम्य आढळून आले आहे.  प्रत्यक्षामध्ये या दोन्ही
ठिकाणामध्ये 2 हजार मैलाचे आणि 3 हजार वर्षाचे अंतर आहे.
- कपाशीच्या प्रजातीमध्ये झालेल्या उत्क्रांतीमध्ये अनेक हजार वर्षे स्थिरता होती. त्यानंतरच्या काळामध्ये मात्र वेगाने बदल
झाल्याचे दिसून येते. याबाबत माहिती देताना संशोधक डाॅ. अलाबी म्हणाले, की सर्वसाधारणपणे उत्क्रांती ही अत्यंत सावकाश
होणारी प्रक्रिया असते असे मानले जाते. मात्र या अभ्यासातून अलिकडच्या काळामध्ये वेगाने बदल घडून आल्याचे दिसून येते.
स्थानिक वनस्पतींनी त्यांच्या रहिवासानुसार ताण व्यवस्थापन करण्यासाठी अावस्यक ते जनुकीय बदल घडवून आणल्याचे दिसून
येते. इजिप्तच्या कसर इब्रिममधील कपाशीने तेथील पाण्याची कमतरता आणि परिस्थितीशी जुळवून घेतल्याचे लक्षात येते.
- या प्रकारच्या संशोधनातून प्राचीन जगातील कृषी क्षेत्रात झालेल्या बदलांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.
- कसर इब्रिम मध्ये आढळलेल्या जी. हर्बासियम प्रजाती ही जी. अर्बारियम या भारतीय प्रजातीपेक्ष आफ्रिकन जातीशी साम्य
दर्शवणारी असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. त्यामुळे भरतीय प्रजातीचे स्थानिकीकरण आणि आफ्रिकी प्रजातीच्या
स्थानिकीकरणापासून वेगळे करण्याची आवश्यकता आहे.
- हे संशोधन माॅलेक्युअर बायोलाॅजी अॅण्ड इव्हाल्युशन या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा