सेलफोनच्या चुंबकिय क्षेत्रामुळे सजीवाच्या अंतर्गत बदल होत असल्याचा केला दावा
पृथ्वी हे एक मोठे चुंबक आहे. तिला तिचे उत्तर दक्षिण अक्षही आहेत. त्याचे परिणाम पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्र व पर्यावरणावर होत असतात. त्याचबरोबर मानवी तंत्रज्ञानामुळे विविध प्रकारच्या चंबकिय लहरीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचे परिणामाचा शरीरातंर्गत रसायनाच्या प्रतिक्रियेचा अभ्यास नेवाडा विद्यापीठातील संशोधक कार्लोस मोर्टिनो यांनी केला आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष नुकत्याच सॅन दियागो येथे झालेल्या एक्सपेरिमेंटल बायोलाॅजी 201च्या बैठकीमध्ये संशोधकांच्या समोर मांडले होते.
चुबंकिय क्षेत्र हे विविध प्रकारचे असतात. स्थिर चुबकिय क्षेत्र म्हणजे स्थिर चुंबके कायम स्वरूपी बाजूला असणे. पृथ्वीचे चुंकिय क्षेत्र हे क्वासी स्ट्ॅटिक म्हणजे कमी प्रमाणात बदलणारे असते. त्यानंतर विविध प्रकारच्या रेडिओलहरीचे क्षेत्र हे तीव्रता आणि वारंवारितेवर बदलणारे असते. मार्टिनो यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये कमी स्थिक चुबकिय क्षेत्राचे मानवी शरीरावर होणारे परिणाम तपासण्यात आले आहेत. त्यामध्ये सेलफोन आणि अन्य प्रकारच्या चुंबकिय क्षेत्राचे परिणाम मानवी मेंदूच्या पेशीवर परिणाम होत असल्याचे आढळले आहे. अर्थात हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने सुरक्षिततेच्या प्रमाणकांपेक्षा कमी असले तरी भविष्यामध्ये त्याचा परिणाम वाढू शकतात. मार्टिनो यांनी प्राण्यावर या चुंबकिय क्षेत्राचे प्रयोग करण्यात आले आहेत. त्यामध्ये आॅक्सीजन मुलद्रव्याच्या उत्पादनामध्ये तसेच पेशीच्या वाढ आणि तग धरण्याच्या क्षमतेवर परिणाम होतात. कमी चुंबकिय क्षेत्रामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ वेगाने होत असल्याचेही त्यांना आढळून आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा