समुद्रामध्ये आढळणाऱ्या कोन स्नेल या गोगलगायीच्या विषापासून जर्मनीतील बोन्न विद्यापीठातील संशोधकांनी मानवाला उपयुक्त असे वेदनाशामक विकसित केले आहे. हे वेदनाशामक शरारीमध्ये लवकर विघटीत होत असल्याने त्याचे शरीरावर विपरीत परीणाम होत नाहीत. कर्करोगासारख्या अत्यंत वेदनामय आजारामध्ये वेदनाशामकांवरील अवलंबित्त्व वाढण्याचा धोका असतो. तो या प्रकारच्या वेदनाशामकामुळे राहणार नसल्याचे संशोधकांचे मत आहे.
कोन स्नेल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गोगलगायी चिखलामध्ये लपून भक्ष्याची वाट पाहतात. त्यांच्या शरीरावर असलेल्या काटा हलवून भक्ष्याला किंवा माशांना आकर्षित केले जाते. कुतुहलामुळे मासा जवळ आल्यानंतर तो काटा वेगाने भक्ष्यावर मारला जातो. त्यात असलेल्या विषामुळे भक्ष्याची गात्रे शिथिल पडतात. हालचाल करता येत नाही. मग सावकाश साधारणपणे दोन आठवडे त्या माशावर ताव मारला जातो. त्या प्रक्रियेमध्ये गोगलगायीच्या दातासारखा असलेला काटा
वेगळा होतो. कोनस परपुरास्कान्स या गोगलगायीच्या विषापासून बोन्न विद्यापीठातील संशोधकांनी वेदनाशामक विकसित केले आहे.
या विषाविषयी माहिती देताना संशोधक डाॅ . डायना इम्होफ यांनी सांगितले, की कोन स्नेलच्या कोनोटाॅक्सीन या नावाने ओळखले जाणाऱ्या विषामध्ये मेंदूकडे पोचणाऱ्या नसातील सिग्नलवर परीणाम करण्याची क्षमता असते. अत्यंत कमी प्रमाणात वापरून या विषाचा वापर योग्य त्या नसासाठी करता येते. त्यातून वेदना पोचवणाऱ्या नसावर त्याचा उपयोग करणे शक्य आहे. कर्करोगामध्ये अन्य वेदनाशामक औषधाचा वापर वारंवार करणे शक्य नसते. कारण त्यावर अवलंबून
राहण्याची पेशंटला सवय लागू शकते. मात्र या कोनोटाॅक्सीनच्या बाबतील असा धोका राहत नाही. ही पेपटाईड घटक शरीरामध्ये विघटीत होऊन जातात.
इव्हाफ यांच्या प्रयोगशाळेमध्ये संशोधन करणाऱ्या डाॅ. अलेसिया टिट्झ यांनी गोगलगायींच्या विषाचे विश्लेषण केले आहे. या विषातील घटकाचे प्रमाण आणि त्याचे स्ट्रक्चर ओळखण्यात आले आहे. त्यामध्ये असलेले पेपटाईड आणि अमिनो आम्ले यांच्या स्थिती लक्षात घेऊन त्यापासून योग्य त्या प्रमाणात वेदनाशामक विकसित करण्यात येत आहे.
हे संशोधन अॅन्जेवान्टे केमी इंडरनॅशलन एडीशन, 2012 मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा