कंदिलात वापरले मोशन सेन्सर
---
काश्मीरमधील शेतकऱ्याने बॅटरीवर चालणारा व 15 फूटाच्या परिसरातील मानवी हालचालीचा अलर्ट देणारा कंदिल विकसित केला आहे. त्याच्या घराच्या परिसरात कोणत्याही माणसांची हालचाल आढळून आल्यास तो शेतकऱ्याला अलर्ट देतो. त्यामुळे शेतकरी सावध होऊ शकतो. ही यंत्रणा अस्थीर वातावरणामध्ये कुटूंबातील लोकांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपुर्ण आहे.
काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी कारवाया होत असल्याने लोकांच्या जीवाला धोका असतो. एका बाजूला दहशतवादी, दुसऱ्या बाजूला लष्करातील लोक यांच्या एकमेकांविरूध्द चाललेल्या मोहिमा यामुळे काश्मीरमधील सर्वसामान्य लोकांसाठी धोका वाढतो. या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागातील सागम गावातील अशिक्षीत शेतकऱ्यांने बॅटरीवर चालणारा एक कंदील विकसित केला आहे. या कंदिलामध्ये बसवण्यात आलेल्या सेन्सरमुळे घराच्या परीसरात झालेल्या कोणत्याही मानवी हालचालीचा अलर्ट मिळतो.
कंदिलाचा होतो जिवरक्षणासाठी वापर काश्मीरमध्ये कंदील ही स्थानिक शेतकऱ्यांची ओळख आहे. रात्रीच्या वेळी फिरताना कंदिल सोबत नसल्यास लष्करातील आणि दहशतवादी गटाकडून अन्य गटाचा माणूस समजून मारले जाण्याचा धोका असतो. निरपराध असूनही केवळ कंदिलातील इंधन संपल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र साध्या कंदिलामध्ये इंधन संपण्याचा धोका असल्याने बॅटरीवर चालणारा कंदिल गुलाम मुहम्मद मीर या 48 वर्षीय शेतकऱ्याने विकसित केला आहे. त्यामध्ये मोशन सेन्सर बसवल्याने 15 फूटाच्या परीसरात असलेल्या माणसांविषयी अलर्ट देण्याचे कामही हा कंदिल करतो. तसेच या कंदिलामध्ये रेडिओची सोयही करण्यात आलेली आहे. त्यामुळे गाणी ऐकत शेताकडे जाणाऱ्या मीरचे हे संशोधन नाविन्यपुर्ण उत्पादन आहे.
नाविन्यपुर्ण उत्पादनः
इलेक्ट्राॅनिक्समधील फारशी काही माहिती नसलेल्या मीरने विकसित केलेल्या या कंदिलाचे 20 नग तयार करून त्याने अन्य लोकांना विकले आहेत. त्यांत वापरलेल्या तंत्रानुसार या कंदिलांच्या किंमती 1600 रुपयापासून 2800 रुपयापर्यंत आहेत. या विषयी माहिती देताना ग्रासरूट इनोव्हेशन अॅण्ड आॅगमेंटेशन नेटवर्क (GIAN)चे तांत्रिक अधिकारी शाबिर अहमंद म्हणाले की, काश्मीरमध्ये ग्रामीण भागामध्ये सुमारे 80 टक्के लोक राहतात.पारंपरिक कंदिलामध्ये केलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. वेगळ्या प्रकारात पारंपरिक कंदिलांच्या जपणूकीचीही शक्यता वाढली आहे. मीर यांना अधिक चांगले तंत्रज्ञान व माहिती संस्थेमार्फत पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे या कंदिलाना चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
मीरचे स्वतःचा कंदिलाचा कारखाना काढण्याची इच्छा आहे. .योग्य त्या तांत्रिक सुधारणानंतर हा कंदिल ग्रामीण काश्मीरमध्ये अधिक लोकप्रिय होऊ शकेल, यात शंका नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा