सोमवार, ९ एप्रिल, २०१२

बदाम झाडाचे आयुष्य वाढवण्याचे तंत्रज्ञान विकसित

बदामाच्या झाडाचे नूतनीकरण करण्याचे प्रात्यक्षिक दाखवताना संशोधक
---
काश्मीर येथील सीआयटीएचचे संशोधन
----
काश्मीरमध्ये बदामाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. मात्र परदेशाशी तुलना करता भारतातील बदामाचे उत्पादन फार कमी आहे. त्याची अनेक कारणे आहेत. त्याबाबत अभ्यास करताना श्रीनगर येथील केंद्रीय समशीतोष्ण फळबाग विभागाचे संशोधक के, के. श्रीवास्तव यांनी सांगितले, की जुनी झाडे, पानांच्या संख्येचे अयोग्य नियोजन किंवा नियोजनच केले जात नाही, सिंचन आणि खतांचा वापर केला जात नाही ही काही प्रमुख कारणे आहेत. जुनी झाडे तोडून त्या जागी नवीन लागवड करायची , तर फळांचे उत्पादन येईर्यंत अधिक कालावधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर त्या घटकांचा मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे. जुन्या झाडाचे नुतणीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्रातील संशोधकांशी संशोधन केले आहे.
 याबाबत माहिती देताना केंद्राचे संचालक नजीर अहमद यांनी सांगितले, की बदामाच्या अनेक वर्षे जुनी झाडे ही उत्पादनाला कमी पडत जातात. त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी नुतणीकरण तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रामध्ये डिसेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये बदामाच्या झाडाच्या पहिल्या फांदीचे प्रुनींग करून त्यावर वारीस आणि परागीकरणासाठी प्राणयाझ या जातीचे टाॅप ग्राफ्टींग केले जाते.
नझीर अहमद, के. के. श्रीवास्तव, दिनेशकुमार, सुनिल कुमार भट या संशोधकांच्या गटाने हे तंत्र विकसित केले आहे.
कुमार म्हणाले की,  बदामाच्या बडगाम, पुलवामा, इस्लामाबाद ( अनंतनाग) या काश्मीरमधील बदामाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यामध्ये सध्या या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी या भागातील बदामाच्या झाडाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये अनेक झाडे ही 70 वर्षापेक्षा अधिक वयाची आढळली आहेत. साधारणपणे बदामाची झाडे 3- ते 40 वर्षे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतात. त्यानंतर त्यांचे उत्पादन कमी होत जाते. फळबाग संशोधन केंद्रामध्ये बदामाच्या उत्पादनवाढीसाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे घेतली जात असून शेतकऱ्यांसाठी हिंदी, इंग्रजी आणि उर्दूमध्ये माहितीपत्रके तयार करण्यात आली आहेत. सध्या या तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्यात येत आहेत.
-----
दृष्टीक्षेपात बदाम
  • -भारतामद्ये बदामाच्या लागवडीखाली सुमारे 23.81 हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापासून 17.23 मेट्रीक टन उत्पादन मिळते.
  • - भारतातील राज्यामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र व उत्पादन हे जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे.
  • - भारतातील बदामाची उत्पादकता 0.73 टन प्रति हेक्टर असून जगभरातील अन्य देशातील सरासरी उत्पादकता ही 1.5 टन प्रति हेक्टर इतकी आहे.

५ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. महाराष्ट्रामध्ये बदामांची झाडे चांगल्या प्रकारे वाढू शकत असली तरी त्याचा फळ पीक म्हणून फारसा विचार झालेला नाही. त्याच प्रकारे यावर योग्य तो प्रक्रिया उद्योगही आपल्या राज्यामध्ये नाही.

      नुतनीकरणाचे हे तंत्र आंब्यासह दीर्घकालीन बागांमध्ये वापरणे शक्य आहे. याबाबतची अधिक माहिती दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून मिळू शकेल.

      हटवा
  2. सतीश सर.. बदामाची झाडे महाराष्ट्रात जास्त प्रमाणात कोठे आहेत? पुण्या पासून जवळ असल्यास उत्तम. महाराष्ट्रातील या झाडा संदर्भातील माहिती द्यावी. महाराष्ट्रात जंगली बदामाची झाडे आहेत का?
    आपला फोन नं. द्यावा.
    धन्यवाद.
    श्रीकांत कोष्टी.
    पुणे.
    9960615057

    उत्तर द्याहटवा
  3. सतीश सर.. बदामाची झाडे महाराष्ट्रात जास्त प्रमाणात कोठे आहेत? पुण्या पासून जवळ असल्यास उत्तम. महाराष्ट्रातील या झाडा संदर्भातील माहिती द्यावी. महाराष्ट्रात जंगली बदामाची झाडे आहेत का?
    आपला फोन नं. द्यावा.
    धन्यवाद.
    श्रीकांत कोष्टी.
    पुणे.
    9960615057

    उत्तर द्याहटवा
  4. महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बदामाची मोठ्या प्रमाणात लागवड नाही. हे मी आधीच लिहीले आहे.
    माझा संपर्क ९९२२४२१५४०

    उत्तर द्याहटवा