ग्लायसिऱहायझा या कुळातील वनस्पती औषधी घटकांनी परीपुर्ण असल्याने पारंपरिक औषधामध्ये त्यांचे स्थान वादातीत आहे. या वनस्पतीमध्ये गुंतागुंतीचे विकराची (एन्झाइम्स) साखळी कार्यरत असते. हि विकरे ग्लायसिरायझीन हे मुलद्रव्य तयार करतात. हे मुलद्रव्य पदार्थांची गोडी वाढविण्यासाठी, पोटाच्या विकारमध्ये त्याचबरोबर विषाणू रोधक म्हणून काम करते. आता या औषधी घटकांची निर्मिती करण्यामध्ये महत्त्वाची भुमिका बजवणाऱ्या विकर शोधण्यात योकोहामा येथील रिकेन वनस्पती शास्त्र संस्थेच्या संशोधकांना यश आलेले आहे.
औषधी वनस्पती ग्लायसिरायझा मध्ये ग्लायससिरायझीनच्या जैविक संयोगाच्या प्रक्रियेबाबत संशोधकांची माहिती अपूर्ण होती. या वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या सायटोक्रोम पी 450 मोनो आॅक्सिजिनसस या विकराबाबत विशेषतः अधिक प्रमाणात संशोधन करण्यात येत होते. यापुर्वीच्या अभ्यासामध्ये या घटकांचे महत्त्व समजून आले होते. मात्र त्यांची कार्य प्रक्रिया समजून घेण्यासाठी रिकेन वनस्पतीशास्त्र संस्थेतील संशोधक काझुकी सैतो आणि तोशियुकीमुरानाका यांनी संशोधन केले आहे. हे रसायन विकसित करण्याच्या प्रक्रियेचे आकलन झाल्याने भविष्यात जैवतंत्रज्ञानाच्या साह्याने ग्लायसिऱ्हाटिनिक आम्लाच्या निर्मितीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या संशोधनाचे निष्कर्ष प्लॅंट सेल या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
या औषधीचे उपयोग
- ख्रिस्तपूर्व 2000 वर्षापूर्वीपासून प्राचीन औषधामध्ये ग्लायसिऱ्हायझाचा वापर केला जातो.
-घसा, नाक व श्वसन संस्थेसी संबंधित विकारावर या औषधाचा वापर केला जातो. त्यामध्ये सर्दी, खोकला, कफ, फ्लयू यांचा समावेश आहे. ताप किंवा ज्वर कमी करण्यासाठी उपयुक्त. ताण कमी करणाऱ्या औषधामध्ये या घटकाचा वापर केला जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा