खरबूज पिकले का ते ओळखेल इलेक्ट्राॅनिक नाक
---------------
पिकलेले फळ ओळखण्यासाठी आपण काय करतो त्याचा वास घेतो, हातामध्ये घेऊन फळाच्या साल दाबून त्यावरून अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो. त्यात त्या माणसांचा अनुभव पणाला लागत असतो. हि पद्धत एक , दोन किंवा किलोभर फळे पिकलीत कींवा नाही तपासण्यासाठी चांगली आहे. मात्र ज्या वेळी मोठ्या प्रमाणात पिकलेली फळे वेगळी करायची असतील, तर प्रक्रिया उद्योगामध्ये असा प्रश्न कायम असतो. त्या प्रश्नाचे उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी शोधले आहे. त्यांनी फळांचे पिकलेपण तसेच फळाचा वास ओळखण्यासाठी वेगवान इलेक्ट्राॅनिक पद्धत विकसित केली आहे.
फळ पिकत असताना त्यामध्ये अनेक बदल घडत असतात. या बदलांना नेमकेपणाने ओळखण्यासाठी विशेषतः खरबूजासाठी कॅलिफोर्निया विद्यापीटातील संशोधिका डाॅ. फ्लोरेन्स नेग्रे- झ्खारॅव यांनी इलेक्ट्राॅनिक घाणेद्रीय विकसित केले आहे. याचा वापर काढणी पपश्चात
तंत्रज्ञानामध्ये करून चांगल्या प्रकारचे उत्पादन आणि प्रक्रियेतून अधिक चांगले पदार्थ तयार करणे शक्य होणार आहे. सध्या फळांचे पिकलेपण तपासण्यासाठी गॅस क्रोमॅटोग्राफी या प्रक्रियेचा वापर केला जातो. मात्र या प्रक्रियेमध्ये नमुना तपसाणी करण्यासाठी एक तासापेक्षा अधिक वेळ लागतो. तसेच प्रयोगशाळेची आवश्यकता असते. हे टाळण्यासाठी संशोधिका डाॅ. नेगरे झ्खारॅव आणि त्यांच्या
सहकाऱ्यांनी अधिक वेगवान अशी इलेक्ट्राॅनिक पद्धत विकसित करण्यासाठी संशोधन केले आहे. संशोधनाबाबत माहिती देताना डाॅ. नेरे झ्खारॅव यांनी सांगितले, की या पद्धतीमध्ये गणितीय प्रणालीचा वापर करून गॅस क्रोमॅटोग्रीफी अत्यंत वेगाने करण्यात येते. या पप्रक्रियेसाठी एक
मिनिटाएवढ्या वेळामध्ये फळांचे पिकलेपण कळते. ही पद्धत वेगवान आहेच, त्या बरोबर सोपी आणि कार्यक्षमही आहे. अनेक प्रकारचे अन्य वास सभोवताली असतानाही फळांच्या पिकलेपणाचा वास ओळखण्यासाठी या पद्धतीच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा