सौर ऊर्जेचे रूपांतर सरळ द्रवरूप इंधनामध्ये करण्यासाठी बायोरिअॅक्टर विकसित
-------
फोटोव्होल्टाईक ेसलपासून मिळवलेल्या ऊर्जेचे रूपांतर द्रवरूप इंधऩामध्ये करण्यासाठी वापरण्यात आलेला बायोरिअॅक्टर (स्रोत - हान ली) |
सौर ऊर्जेपासून विद्यूत ऊर्जा उपलब्ध होऊ शकते, हे माहिती आहे. मात्र सौर ऊर्जेपासून सरळ गॅसोलिनसारखे द्रवरूप इंधन मिळवणे शक्य असल्याचे संशोधन लाॅस एन्जेलिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक जेम्स लियो यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी जनुकीय सुधारीत सुक्ष्म जीवांचा वापर केला आहे. त्यामुळे सौर ऊर्जा आणि द्रवरूप इंधनाचा वापर करणारे हायब्रीड बायोइलेक्ट्रीक यंत्रणा राबवणे शक्य होणार आहे.
विद्यूत ऊर्जेचे रूपांतर द्रवरूप इंधनामध्ये करण्यासाठी लियो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मातीमध्ये आढळणाऱ्या सूक्ष्म जीवांवर लक्ष केंद्रित केले होते. हे सूक्ष्म जीव स्वतःच्या वाढीसाठी ऊर्जा म्हणून हायड्रोजनचा वापर करून कार्बन डायआॅक्साईड तयार करतात. अनेक औद्योगिक प्रकल्पामध्ये विविध प्रक्रिया करण्यासाठी या प्रकारच्या सूक्ष्म जिवांचा वापर गेल्या काही वर्षापासून वाढला आहे. लियो यांनी वापरलेल्या बायोरिअक्टरमध्ये जनुकीय सुधारीत सुक्ष्म जीव आर, इट्रोफा (R. eutropha), कार्बन डाय आॅक्साईड आणि हायड्रोजन असते. त्यामध्ये इलेक्ट्रोडच्या माध्यमातून विद्यूत ऊर्जेचे वहन केले जाते. या वाहत्या विद्यूत ऊर्जेमुळे रासायनिक क्रिया घडण्यास सुरूवात होतात. त्यासाठी कार्बन डायआॅक्साईडच्या अणूचे हायड्रोजनच्या अणूशी नवे आयन तयार होते. या हायड्रोजन,फाॅरमेट, आयनाचा वापर आर. इट्रोफा त्यांच्या वाढीसाठी करतात. त्यातून कर्ब वायू व ब्युटेनाॅल इंधन तयार होते. या कर्बवायूवर पुनरप्रक्रिया करण्यात येते.
9 टक्के सौरऊर्जेचे रूपांतर शक्य
या संशोधनाबाबत माहिती देताना लियो म्हणाले की, या बायोरिअॅक्टरमध्ये सौर ऊर्जेपासून मिळालेल्या विद्यूत ऊर्जेचा वापर केला जातो. या बायोरिअॅक्टरमध्ये सुमारे 80 तासामध्ये प्रति लीटरमध्ये 140 मिलीग्रॅम ब्युटेनाॅल उपलब्ध होते. सध्या हे प्रमाण कमी असले तरी याचा उपयोग द्रवरूप इंधऩाबरोबरच अन्य रसायने मिळवण्यासाठी होऊ शकतो.
सध्या सुर्यप्रकाशापासून केवळ 0.2 टक्के एवढीच ऊर्जा उपलब्ध होते. सर्वसामान्यपणे फोटव्होल्टाईक सेलमुळे 15 टक्के सुर्यप्रकाशाचे रुपांतर ऊर्जेमध्ये होते. या इलेक्ट्रोफ्युएल बायोरिअॅक्टर मधून 9 टक्केपर्यंत सुर्यप्रकाशाचे रुपांतर उर्जेमध्ये करणे शक्य आहे.
सौर ऊर्जेपासून द्रवरूप इंधन मिळवण्याच्या प्रकल्पाचे कल्पना चित्र |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा