उत्तर अरिझोना विद्यापीठातील संशोधन
उत्तर ऍरिझोनामध्ये गेल्या दशकापासून गवताच्या वाढीवर तापमान वाढीच्या दुरगामी परीणामाचा अभ्यास करण्यात आला आहे. छायाचित्रात गवत कमी होत गेलेले दिसून येत आहे. (स्रोत- ऍरिझोना विद्यापीठ) |
ओझोनच्या थरावर विविध मानवी प्रदुषणामुळे परीणाम होत आहेत. तापमानात वाढ होत असून हवामानातही अनेक विपरीत बदल होत आहेत. हवामानावर आधारीत असलेल्या अनेक वनस्पती, झाडे, जंगले आणि पर्यावरणावरही त्याचे परीणाम होत आहेत. हवामान बदलाचे वनस्पतीवर काय परीणाम होतात, याबाबत उत्तर अरिझोना विद्यापीठामध्ये संशोधन करण्यात आले आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे गवताच्या काही प्रजाती सुरवातीच्या काळात हिरव्या होत असल्या तरी त्यांच्या वाढीचा वेग मंदावत असल्याचे आढळून आले आहे. या संशोधऩाचे निष्कर्ष नेचर क्लायमेट चेंज या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित कऱण्यात आले आहे.
मानवी हव्यासामुळे पर्यावरणामध्ये प्रदुषण वाढत असून, जागतिक तापमानात वाढ होत आहे. त्याचे विविध प्राणी, वनस्पती यावर विपरीत परीणाम होत आहेत. त्याबाबत झालेल्या संशोधनाची माहिती देताना संशोधक झुवाॅटिंग वू यांनी सांगितले, की वातावरणामध्ये होत असलेल्या बदलात सुरवातीच्या काळामध्ये वनस्पतीच्या वाढीला वेग मिळत अशला तरी पुढच्या काळामध्ये वाढीचा वेग मदावत असल्याचा पॅटर्न दिसून आला आहे.
असे झाले संशोधन
- उंचावर वाढणाऱ्या चार प्रकारच्या गवताच्या प्रजातीची लागवड ही मुद्दाम कमी उंचीवर केली. त्यांच्यामध्ये होत असलेल्या बदलांचा उंचीवरील गवताशी तुलणात्मक अभ्यास केला.
-अधिक काळापर्यंत उष्ण वातावरणामध्ये असलेल्या गवताच्या स्थानिक प्रजाती नष्ट होत असल्याचे आढळून आले.
- सुरवातीच्या काळात उष्ण वातावरणामुले नत्राची उपलब्धता वाढल्याने गवताच्या वाढीचा वेग वाढला. त्याचबरोबर हवेत नत्र वायूचे उत्सर्जनही वाढले, तसेचपावसाच्या पाण्याबरोबर नत्र वाहून गेल्याने पुढील काळामध्ये गवताच्या वाढीवर विपरीत परीणाम झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा