सी डॅक संस्थेने विकसित केले संगणकिय प्रारूप------
पोल्ट्रीतील अंड्याची साठवणीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने तापमानाचे व्यवस्थापन अचूक करण्याची आवश्यकता असते. त्याचवेली अंड्याचे तापमानाबाबतचे अंदाज मिळण्याचीही आवस्यकता असते. हे अंड्यांच्या तापमानाचा अंदाज उपलब्ध करण्यासाठी सी-डॅक या संस्थेने संगणकीय प्रारुप विकसित केले आहे. त्यामुळे अंड्यामध्ये वाढणाऱ्या हानीकारक जिवाणूंची वाढ रोखणे शक्य होणार आहे.
कोंबड्यांनी अंडी घातल्यानंतर त्याची साढवणूक करताना त्याचे तापमान 7 अंश सेल्सियस ठेवण्यात येते. या तापमानाला सॅलमोनेलासारख्या हानीकारक जिवाणूंना रोखणे शक्य होते. मात्र देशामध्ये अंडी साठवणीच्या सुविधा फारशा उपलब्ध नसल्याने अंड्यांची साठवणूकीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
साठवणूकिमध्ये अंड्याचे तापमानाचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने सी- डॅक या संस्थेने अंड्याच्या तापमानाचा अंदाज आणि त्यावेळी त्यामध्ये होऊ शकणाऱ्या जिवाणूंच्या प्रादुर्भावासंदर्भात माहिती देणारे प्रारुप विकसित केले आहे. या प्रारूपाला काॅम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स माॅडेल असे नांव देण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना सी- डॅकमधील समन्वयक विकास कुमार यांनी अॅग्रोवनशी बोलताना सांगितले, की अंड्याच्या तापमान व्यवस्थापन करताना हवेचा वेग, हवेचे तापमान तसेच अंड्यांच्या अंतर्गतचे तापमान अशा अनेक प्रकारच्या प्राथमिक माहितीची आवश्यकता असते. या प्राथमिक माहितीवर गणिती प्रक्रिया करून अंड्यांच्या आतील भागातील तापमान मिळवण्यासाठी या प्रारूप उपयुक्त ठरणार आहे. तसेच या तापमानाला होऊ शकणारा संभाव्य जिवाणूचा प्रादुर्भावही ओळखणे शक्य होणार आहे. त्यामुळे अंड्यांच्या साठवणूकीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे प्रारूप महत्त्वाचे ठरणार आहे.
हे संशोधन अमेरिकन कृषि विभागाच्या अन्न सुरक्षितता आणि निरीक्षण सेवा (FSIS) या प्रकल्पासाठी नेब्रास्का विद्यापीठाशी संलग्नपणे करण्यात आले असून जर्नल आॅफ फूड इंजिनियरींग या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
----
हे संशोधन जरी अमेरिकेतील परिस्थितीनुसार करण्यात आले असले तरी भारतातही याचा वापर करणे शक्य होणार आहे. भारतात अंड्यासाठी साठवणीसाठी सध्या शास्त्रीय साठवणगृहे उपलब्ध नाहीत. मात्र अंडी साठवणीच्या दृष्टीने योग्य तापमान व्यवस्थापन करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. सध्या अंडी हाताळणी व साठवणीच्या पद्धती याबाबत भारतामध्ये कडक कायदे नाहीत. या प्रारुपामुळे सुरक्षित अंडी ग्राहकांना उपलब्ध होण्यास मदत होणार असून अंड्यामार्फत होऊ शकणाऱ्या विविध प्रकारच्या विषबाधा टाळणे शक्य होणार आहे.
-----
संपर्कसाठी ईमेल- vikask@cdac.in
विकास कुमार- 020-25704175
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा