कणामध्ये कृत्रीम बुद्धीमत्ता विकसित करण्यामध्ये संशोधकांना प्राथमिक यश
------
वाळूच्या खोक्यामध्ये आपण एखादी वस्तू ठेवली आणि काही वेळानंतर त्या वस्तूची मोठ्या आकारात माॅडेल वाळूमध्ये तयार झाल्याचे दिसल्यास आपण चकीत होऊन जाऊ. एखाद्या जादूच्या खेळामध्ये किंवा सिनेमामधील एखादा प्रसंग पाहत आहोत की काय असे वाटेल. मात्र एमआयटी च्या संगणक शास्त्र आणि कृत्रिम बुद्धीमत्ता प्रयोगशाळेत सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पामध्ये यावर संशोधन केले जात असून भविष्यात वरील चित्र खरे ठरण्याची शक्यता आहे. या संशोधनाचे मे महिन्यामध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल काॅन्फरन्स आॅन रोबोटिक्स अॅण्ड अाॅटोमेशन मध्ये या हुश्शार वाळू चे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
सध्या विविध आकाराच्या वाळूबाबत चाचण्या घेण्यात येत आहेत. 10 मीलीमीटर एवढ्या मोठ्या आकाराचे कण वापरण्यात आले असून त्यामध्ये मायक्रोप्रोसेसर आणि चारही कडांना चुबकांची रचना केलेली आहे. त्यामुळे त्यांना दिलेल्या आज्ञांप्रमाणे ते विविध आकार धारण करू शकतात. संगणकांकडून मिळालेल्या आज्ञानुसार ते एकमेकांना चिटकून त्रिमितीय पदार्थ तयार करू शकणार आहेत.
...याला म्हणतात भिन्न स्थानिय बुद्धीमत्ता
प्रत्येक कणामध्ये बुद्धीमत्ता विकसित करणे या प्रकाराला भिन्न स्थानिय बुद्धीमत्ता (डिस्ट्रूबुटेड इन्टेलिजन्स) असे म्हटले जाते. त्यामध्ये प्रत्येक कणांमध्ये योग्य ती माहिती साढवणे , तिचा वापर एकमेकांशी संपर्कासाठी करणे यासाठी संख्याशास्त्राची मदत घेण्यात येते. अर्थात हेच स्रवात आव्हानात्मक काम होते. एमआयटी मधील संशोधिका डॅनियेला रूस व त्यांच्या विद्यार्थिनी केल गिलपिन यांनी या वाळूमागील तत्त्व विषद केले.
असे आहे संशोधन
- संशोधनासाठी प्रत्येक कण हा घनाकार असल्याचे गृहितक धऱून तिच्या आजुबाजूला असणाऱ्या आठ शेजारी कणांशी असलेले संबंध कसे असतील, यावर विचार करण्यात आला. त्यातील सर्वात टोकावर असलेल्या कणांना एक किंवा दोन शेजारी असणार नाहीत. एकदा या कणांची जागा निस्चित झाली की ते आपल्या शेजारी किती कण असतील, त्यांची जागा कोणत्या बाजूला असले, यावर नियंत्रण ठेवू शकतील. त्यामध्ये मुळ आकाराच्या किती पटीमध्ये माॅडेल तयार करायचे, हेही निश्चित केले जाईल.
- या कणांच्या प्रत्येक बाजूस इलेक्ट्रोपरमनंट मॅग्नेट या प्रकारचे चुंबक वापरण्यात आले आहेत. त्यामुले विद्यूत प्रवाहाच्या नियंत्रणाने चुंबकीय प्रभाव कमी किंवा वाढवणे शक्य असते. मात्र खरी स्मार्ट वाळू ही 10 मिलीमीटरपेक्षा लहान असलेले कणांचीच असणार आहे. त्याबाबत सांगताना हार्वर्ड विद्यापीठातील संशोधक राॅबर्ड वूड म्हणाले, की लहान आकारातून अनेक शक्यता तयार होतात. त्याचबरोबर हे कण शेजाऱ्यांशी संपर्क साधू शकतील, योग्य ती गणिते करून आपली जागा ठरवू शकतील. या साऱ्या संशोधनासाठी अभियांत्रिकी ज्ञानाच्या कक्षा अनेक प्रकारे रुदावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भविष्यात वाळूपासून एखादे शिल्प आपोआप तयार झाल्याचे दिसल्यास आश्चर्य राहणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा